Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगताप कुटुंबात आनंदच वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून कलह असल्याचं बोललं जात होतं. यावर अश्विनी जगताप यांनी पडदा टाकत आमच्या दोघांमध्ये कुठलाही कलह नसल्याचं स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांना तिकीट न देता, त्यांचे दिर शंकर जगतापांना तिकीट देण्यात आलेलं आहे. उमेदवारी निवडीबाबत शंकर जगताप यांची प्रतिक्रिया म्हणाले, आमच्यामध्ये कौटुंबिक किंवा…

Read More

विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार करा – विवेक सावंत पीसीयू मध्ये आंतरराज्य मुख्याध्यापक संवाद, संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनात आयसीटीचा वापर केला पाहिजे. आता शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय भूमिकेवर लक्ष केंद्रित करून २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार केला पाहिजे असे आवाहन पीसीयू व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विवेक सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी त्यांनी एआय आधारित लर्निंग सोल्यूशन्समध्ये शिक्षणाच्या आणि वैयक्तिक शिकण्याच्या संधींचे प्रात्यक्षिक सादर केले.   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अंतर्गत साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) येथे ‘प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह २०२४’ चे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – शहरी मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन जनजागृती करावी तसेच मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा मतदासंघातील निवडणुक कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील बापूजी बुवा सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना अनिल पवार बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक…

Read More

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जाहीर पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. *विधानसभा…

Read More

– भाजपाकडून महायुतीची अधिकृत उमेदवारी घोषित पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी मला २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून दिले. त्यावेळी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे या मुद्यांवर मी निवडणुकीला सामोरा गेलो होतो. तत्कालीन प्रस्थापितांविरोधात शहरवासीय व भूमिपुत्र माझ्यासोबत राहीले. त्यामुळेच मी आजवर यशस्वीपणे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले आहे, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे भोसरीतून पुन्हा एकदा आमदार लांडगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून २०१७…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विजयाचा निर्धार – माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह ग्रामस्थांची वज्रमूठ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘‘जन्मदाती आईनंतर जास्त प्रेम देते, आपुलकीने जपते, जगायला शिकवते ती मावशी म्हणूनच भोसरी माझी आई; तर चऱ्होली माझी मावशी आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये चऱ्होलीकरांनी कायम साथ दिली. माझे जीवाभावाचे सहकारी यांच्या सोबतीने चऱ्होलीतील ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज यांचा आशिर्वाद घेतला आणि निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ‘‘जब साथ हो मेरे दोस्त…तो संघर्षपथपर विजय निश्चित हैं..! ’’ याची अनुभूती येते आहे. अत्यंत सकारात्मक- मंगलमय वातावरणात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे’’, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  सिविल, स्पेन येथे दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर पार पडलेल्या लिगा जागतिक होमिओपॅथिक कॉन्फरन्सच्या कार्यक्रमामध्ये भारतातील होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर अमरसिंह निकम यांचे हृदयविकारावरील ‘होमिओपॅथी इन क्रिटिकल कार्डियाक डिसीजेस’ पुस्तक प्रकाशित केले गेले. होमिओपॅथी मध्ये हृदयविकारावर पुस्तक लिहून ते स्पॅनिश भाषेमध्ये मध्ये प्रकाशित झालेले डॉक्टर अमरसिंह निकम हे पहिलेच भारतीय होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. या कॉन्फरन्स मध्ये सुमारे पाचशेहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर जगभरातून आलेले होते. यामध्ये विशेषतः अमेरिका, चायना, टर्की, जपान, जर्मनी, इंग्लंड, इटली या देशांतून जास्त होमिओपॅथिक तज्ञांचा समावेश होता. होमिओपॅथिक शास्त्राचा वापर हा त्वचेचे विकार ऍलर्जीज अस्थमा आणि जुनाट रोगांवर्ती जास्तीत जास्त केला…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज अखेर आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे आणि चिंचवड मधून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या पहिल्याच यादीत  भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे आणि चिंचवड मधून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रदेश भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना…

Read More

‘एकता पॅनल’चे उमेदवार सुरेश कर्डिले आणि कांचन मांढरे यांच मतदारांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगर पथ विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या रविवारी (दि. २०) रोजी या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. पथ विक्रेता एकता समितीच्या ‘एकता पॅनल’कडून सर्वसाधारण पुरुष गटातून सुरेश मारुती कर्डिले आणि सर्वसाधारण महिला राखीव गटातून कांचन महेश मांढरे हे निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांचा प्रचाराचा जोमात सुरु आहे. ‘हातगाडी’ या चिन्हासमोर शिक्का मारून आम्हाला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकात उमेदवार सुरेश कर्डिले यांनी म्हटले आहे की, पथारी व्यवसायिक बंधू-भगिनी यांचे जीवनमान कसे सुधारेल व…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध जारी केले आहेत. विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका दंडाधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने वरील कृत्य करण्यास बंदी घातली आहे. हा आदेश…

Read More