Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २२/१०/२०२४ रोजी विहित वेळेत पहिल्या दिवशी एकुण २९ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण ५९ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे. आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, सचिन महीपती सोनवणे (वंचित बहुजन आघाडी), चंद्रकांत महादेव लोंढे (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस), युवराज भगवान दाखले (शिवशाही व्यापारी संघ), मनोज विष्णू कांबळे (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस),दादाराव किसन कांबळे (लोकसेवा पत्रकार असो.),अनिकेत धोडींबा सोनवणे, नवनाथ चंद्रकांत शिंदे, रांजेद्र मानसिंग छाजछिडक , (भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी,…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत १४ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण ३५ नामनिर्देशन पत्रे खरेदी केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून १४ व्यक्तींनी एकूण ३५ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी २०५ चिंचवड मतदारसंघाच्या थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या तसेच स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या आदी संबंधित अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहे. एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, तळ मजला, थेरगाव याठिकाणी संपर्क साधावा, असेही…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले होते. त्यानुसार चिंचवड मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी ५ प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. तालेरानगर चिंचवड येथील मतदान केंद्र…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा थेरगांव येथील स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे रविवार, दिनांक २० ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सभासदांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे होते.             संघटनेचे सरचिटणीस श्री. अभिमान भोसले यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन केले व सर्व विषयांना सभासदांची बहुमताने मंजुरी घेण्यात आली. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचा-यांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती देण्यात आली. तसेच मे. राजकिशोर ऍ़ण्ड असोसिएटस् यांनी सादर केलेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे आणि नुकताच पक्ष प्रवेश केलेले रवी लांडगे हे तीव्र इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभेत मोरेश्वर भोंडवे यांनी देखील दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलून पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊन वेगळी भूमिका घेऊ असा सूर या बैठकीत सर्वांचाच होता. शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ निष्ठावंत पदाधिकारी यांना डावलून पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्यास भोसरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यासंदर्भात शिवसेना संपर्कप्रमुख यांना देखील याबाबत…

Read More

शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर होताच स्वयंस्फूर्तीने एकवटले ग्रामस्थ पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेली कित्येक वर्षे स्व. लक्ष्मणभाऊ असतील, अश्विनीताई असतील किंवा आता शंकरभाऊ असतील हे सक्रिय राजकारणात असूनही त्यांनी कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. आपल्या पिंपळे गुरव परिसराचा आमूलाग्र कायापालट करणारे आणि नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या शंकर जगताप यांना यावेळी  संधी मिळाली आहे. आणि या संधीचे पुन्हा एकदा सोने करून आमच्या या हक्काच्या माणसाला विधानसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असा निर्धार पिंपळे गुरवमधील सर्व ग्रामस्थांनी केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बहल यांनी मंगळवारी (दि.२२) पत्रकार परिषद घेत आमदार बनसोडे यांच्यावर तोफ डागली. बहल म्हणाले, पक्षाकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही अजित पवार चर्चा करत आहेत. कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, सर्वांशी चर्चा करण्याची माझ्याकडे जबाबदारी दिली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनची सन २०२४-२५ ची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सदर निवडणुकेचे निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांनी काम पाहिले. तसेच विविध पदांसाठी १३ फॉर्म आल्याने निवडणूक अधिकारी यांनी सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा नेहरूनगर कोर्ट आवारात केली. कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.पांडूरंग विठ्ठल शिनगारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून ॲड. अजय रामसुमेर यादव, सचिव म्हणून ॲड. संदिप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव ॲड. पदमावती लक्ष्मण पाटील , खजिनदार पदी ॲड. विशाल आसाराम पोळ , हिशोब तपासनीस पदी ॲड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच…

Read More

पथारी ,हातगाडी,टपरी धारकाने दाखवलेला विश्वास सार्थ करणार – काशिनाथ नखाते पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक २० ऑक्टोबर रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत शाळांमध्ये झाली यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यांचे अभिनंदन करत काल रात्री जल्लोष केला . पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थापनेपासून आजपर्यंत आयुक्ताच्या नियुक्तीने समितीचे सदस्य नियुक्त करण्यात येत होते मात्र पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच…

Read More