पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशच्या अध्यक्षपदी ॲड.पांडूरंग शिनगारे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनची सन २०२४-२५ ची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सदर निवडणुकेचे निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांनी काम पाहिले. तसेच विविध पदांसाठी १३ फॉर्म आल्याने निवडणूक अधिकारी यांनी सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा नेहरूनगर कोर्ट आवारात केली.
कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.पांडूरंग विठ्ठल शिनगारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून ॲड. अजय रामसुमेर यादव, सचिव म्हणून ॲड. संदिप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव ॲड. पदमावती लक्ष्मण पाटील , खजिनदार पदी ॲड. विशाल आसाराम पोळ , हिशोब तपासनीस पदी ॲड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच सदस्य पदी ॲड. विजय धोंडिराम भोंडे, ॲड. अक्षय कमलाकर चौधरी, ॲड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, ॲड. पौर्णिमा भगवान मोहिते, ॲड. रूपाली रामचंद्र पवार , ॲड. सुषमा सुदर्शन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
वकिलांच्या विविध समस्या, मोशी येथील जागेत कोर्टाचा भूमिपूजन सोहळा पार पडला असून ,मंजूर असलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व सत्र न्यायालय लवकरात लवकर चालू करणे कामी नविन कोर्टाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष. ॲड पांडुरंग विठ्ठल शिनगारे यांनी दिले आहे.