Author: maharashtrabreakingnews.com

नवनिर्मिती व्दारे सामाजिक समस्यांचे निराकरण व्हावे – डॉ मणीमाला पुरी पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग वास्तविक जगातील समस्यांचा विचार करून नवनिर्मिती केली तर सामाजिक समस्यांचे निराकरण करणे शक्य होईल.   ‘समाज विकासासाठी समाज’ या मूलमंत्रावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने (पीसीयु) विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, विचारांना चालना देण्यासाठी ‘आयडियाथॉन – २४’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीसीईटी शैक्षणिक समूहातील शाळांमधील दीडशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. पीसीयुच्या ‘नाविन्यपूर्ण संशोधन आणि…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे काळेवाडीकरांवर विशेष प्रेम होते. काळेवाडीतील नागरिकांनीही नेहमीच आम्हाला खंबीरपणे साथ दिली. काळेवाडी प्रभागाचाही इतर गावांप्रमाणे आमूलाग्र विकास करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे त्यांनी पाहिलेले काळेवाडीच्या सर्वांगीण विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यावेळी मला तुमचा आशिर्वाद हवा आहे, असे आवाहन शंकर जगताप यांनी नागरिकांना केले. चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा काळेवाडी येथे झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात ठिकठिकाणी नागरिकांनी गुलाब पुष्पवृष्टी करून तर महिलांनी औक्षण करून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभेची जागा तुतारीलाच सुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. पिंपरी विधानसभेत तुतारी वाजणार की मशाल पेटणार? यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक अफवांचा बाजारही काहीजण पसरवत होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे‌. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णा बनसोडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत अशी थेट लढत…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  येथील प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजचे प्रा.रोहित आकोलकर आणि प्रा.अनिता विश्वकर्मा यांना वाणिज्य क्षेत्रातील स्मार्ट मार्केटिंग मॅनेजमेंट असिस्टंट या विषयावर पेटंट प्राप्त झाले आहे. यामध्ये अमरावती येथील श्रीमती केसरबाई लाहोटी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आशिष मेहता व डॉ.रचना राठी यांचा सुद्धा सहभाग आहे. या संशोधनाने मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन अधिक सुलभ करता येईल. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष महत्त्व आहे, जितके अधिक संशोधन आणि नाविन्य असते,  तितके शिक्षण व्यवस्थेत अधिक योगदान होते. संशोधनाच्या या यशाने…

Read More

नवमतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ;  महापालिकेचा मतदार जनजागृती कार्यक्रम   पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-   “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ  चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात नवमतदार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक  २५/१०/२०२४       रोजी विहित वेळेत चौथ्या  दिवशी एकुण १४ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी  नोंदविलेल्या माहितीचा  तपशील :- सचिन मनोहर गायकवाड (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), मिना यादव खिल्लारे (महाराष्ट्र लहुजी सेना), भारती चंद्रकांत चांदणे ,  मंगाल भिकाराम कांबळे , स्वप्नील दादाराव कांबळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट), भाऊ रामचंद्र अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), सुरेश मधुकर लोंढे , नरसिंग ईश्वरराव कटके, मनोज भास्कर गरबडे, श्री.अनिल श्रीपती सोनवणे, श्री.डॉ,सिद्धांत अनिल सोनवणे,…

Read More

पीसीईटी आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  जपान ने तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपान मधील आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विकास तसेच संस्कृती अभ्यासण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी ही उन्हाळी शिबिरे उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जपानच्या एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे हे तिसरे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथे भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मंडल अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांकडून जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. तसेच ‘विकसित महाराष्ट्रासाठी माझी आयडिया’ अभियान जास्तीत जास्त युवांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामान्य युवांपर्यंत जाऊन कशाप्रकारे संवाद झाला पाहिजे, याविषयी चर्चा झाली. यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतरचा कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष श्री.अनूप दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामंत्री श्री.वैभव सिंग यांना सादर केला. तसेच शहर जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रीय मीडिया प्रभारी  अमनदीप, प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष  अमृत मारणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निवेदिता एकबोटे,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सामाजिक बांधिलकी जपत गावातील एकोपा अबाधित राखणारे गाव अशी आमच्या किवळे  गावची ओळख आहे. २५ वर्षांपूर्वी आमचे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. किवळेतील १८ मीटर डीपी रस्त्यांसह अंतर्गत स्त्यांचा प्रश्न  शंकरभाऊंनीही पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यामुळे गावाचा अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आणि एकदिलाने शंकर जगताप यांच्यासोबत राहू, असे आश्वासन किवळे ग्रामस्थांनी दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त किवळे गावातील…

Read More

पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; एकूण 1337 सदनिकांची लॉटरी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यास प्रत‍िसाद म‍िळत आहे. यात २४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दोन हजार नागर‍िकांनी प्राथम‍िक नोंदणीची प्रक्रिया संबंध‍ित संकेतस्थळावर केली आहे. पीएमआरडीएअतंर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील EWS (१ RK) प्रवर्गात ३४७ सदनिका तसेच LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार…

Read More