Author: maharashtrabreakingnews.com

                                                                    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया होणार असून पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविदयालय येथे पार पाडले. हे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. दोन्ही सत्रामध्ये संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे…

Read More

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ आज (सोमवार) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती ओव्हाळ यांनी रविवारी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली. बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब ओव्हाळ, गौतम गायकवाड, शिवराज ओव्हाळ, विनोद कांबळे व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय झरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय जाधव व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर संभाजी राजे छत्रपती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी नाना काटे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आज चिंचवड मतदार संघातील कार्यकर्त्याचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये कार्यकर्त्याचे  आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला असून   नाना काटे  यांच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती. ही निवडणूक लढविताना  त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे चिंचवड मतदार संघातील बहुसंख्य नगरसेवक पदाधिकारी राहतील असे नाना काटे यांचा वतीने सांगण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, उषा काळे, निलेश डोके, शिरीष आप्पा साठे, दिलीप आप्पा काळे  शाम जगताप, सचिन काळे, नवनाथ नढे, तानाजी जवळकर, बापू कातळे ,…

Read More

स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून भव्य रॅलीद्वारे भरणार उमेदवारी अर्ज चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसूबारस दिनाचा शुभमुहूर्त साधून भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर हे उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता लोकनेते स्व.…

Read More

जगताप, बनसोडे सोमवारी अर्ज भरणार तर महेश लांडगे मंगळवारी अर्ज भरणार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.    महायुती व इतर घटक पक्ष यांच्या वतीने रविवारी चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी विधानसभेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून उद्या सोमवार (  दि. 28 ) रोजी रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.    भाऊसाहेब भोईर यांनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांनी शहराच्या दुरावस्थेस सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत आपले विचार मांडले होते. आपल्यावरील अन्यायाचा पाढाही वाचला होता काही झाले तरी लढणारच असे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर लगोलग प्रचारास लागून त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली आहे. दरम्यान लढण्याचा निर्धार कायम ठेवत उद्या सोमवारी ते आपला…

Read More

आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीत महिला मेळाव्यांचे आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयासाठी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीतील लाडक्या बहिणी सरसावल्या असून ‘अबकी बार शंकरभाऊ आमदार’चा नारा देत महाविजयाचा निर्धार केला आहे. शंकर जगताप यांच्या प्रचारानिमित्त आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी येथील सिंहगड कॉलनी, बळीराज कॉलनी आणि साई सागर कॉलनी याठिकाणी  महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला रहाटणी परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अश्विनी जगताप म्हणाल्या…

Read More

– महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे आवाहन – मंगळवारी, दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत लक्षवेधी असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे येत्या मंगळवारी ( दि. २९)  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता ही निवडणूक भोसरीचे ग्रामस्थ,  कार्यकर्ते यांनी हातात घेतली असून, उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे हे तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. २०१४ मध्ये अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आमदार महेश लांडगे यांनी संघटन, ग्रामस्थांचा एकोपा, कार्यकर्ते पदाधिकारी…

Read More

– परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा; अजित गव्हाणे यांचे आवाहन भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी ( दि 28 ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी ते ग्रामदैवत भैरवनाथ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन देखील होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे तसेच आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, ग्रामस्थ यांनी सुरू केली आहे. भोसरी मतदारसंघात वाढलेली दादागिरी, दहशतवाद, भ्रष्टाचार यांना पायबंद घालण्यासाठी नैतिकतेची ही लढाई असल्याचे अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.…

Read More

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचा उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अंध अपंग हॅंडीकॅप बंधू भगिनी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या वतीने सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली. पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, घंटागाडीवर काम करणाऱ्या ७०० पुरुष व महिला आदी सर्वांना साडी, कपडे व…

Read More