- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शांती व आपल्यासारख्या अहिंसेच्या उपासक असलेल्या उमेदवारच विजयी होतील असा आशीर्वाद जैन साध्वींनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना दिले. जैन चातुर्मासाच्या निमित्ताने जैन साध्वी डॉ. राजश्रीजी म.सा., डॉ. मेघाश्रीजी म.सा. ,समीक्षश्रीजी म.सा. व जिज्ञासाश्रीजी म.सा. हे गुरुवर्य आकुर्डी येथील वर्धमान जैन श्रावक संघ येथे उपासणेसाठी आले आहेत. पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की जैन बांधव नेहमीच समाजाच्या मदतीसाठी धावून जात असतो, भगवान महावीरांच्या…
‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन च्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. तत्पूर्वी सोमवारी (दि.४ नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात सायंकाळी ५ वाजता, ‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी, पिंपरी चिंचवड मधील मागासवर्गीय जनतेसाठी विविध प्रकारच्या प्रभावी विकास योजना आणि प्रकल्प राबविण्याचा भविष्यात प्रयत्न असेल अशी ग्वाही भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली. भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. महेशदादा लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, बापू घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव, मारुती जाधव, अरुण जोगदंड, युवराज दाखले तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४०० पेक्षा जास्त मागासवर्गीय…
कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करणार; महापालिकेच्या मतदार जनजागृती मोहिमेत प्रवाशांचा संकल्प
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत वल्लभनगर येथील पिंपरी चिंचवड बस स्थानाकातील प्रवाशांशी महापालिकेच्या स्वीप कर्मचाऱ्यांनी संवाद साधला. आपल्या व आपले कुटुंब, समाज, राज्य, पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवर्जून मतदान करणार असल्याचे मत नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केले. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. महापलिकेच्या हद्दीत असलेल्या वल्लभनगर येथील पिंपरी चिंचवड बस्थानाकात महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरीतील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भिमाबाई फुगे तसेच सम्राट फुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित गव्हाणे यांची ताकद वाढली आहे. बारामती येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भिमाबाई फुगे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेवक विनायक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ (इंटक ) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे. दरम्यान कामगार वर्गामध्ये आमदार महेश लांडगे यांची क्रेझ असून, या निवडणुकीत कामगार निर्णायक मतदार ठरणार आहेत. या संदर्भात बाळासाहेब गुंड यांनी महेशदादा लांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण भोसरी विधान सभा मतदार संघामध्ये महायुती (भाजपा) च्या वतीने सन २०२४-२०२९ साठी पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहात हे ऐकून आम्हांस खूप…
– राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मतदारांसोबत संवाद वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वत्र दिवाळीची धामधूम, उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. मात्र राजकीय चर्चा मतदारसंघातील नेत्यांभोवती सुरु असताना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी दिवाळी निमित्त मतदार आणि मतदारसंघातील जुन्या जाणत्या नागरिकांच्या सदिच्छा भेटीपासून प्रचाराची सुरुवात केली आहे. चिंचवड मतदारसंघात स्थानिक आणि नोकरी उद्योगासाठी बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या नागरिक एकत्र राहतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार आणि जुने अनेक कार्यकर्ते इथे आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्ते आणि मतदार बहुंसख्येने शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे कलाटे यांनी कार्यकर्ते, पक्षाचे मतदारसंघातील जुने जाणते, मतदार यांच्या भेटी गाठी घेत…
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रचारात जोरदार आघाडी चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ रावेत प्रभागातील भाजप आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने घोंगडी बैठका आणि कोपरा सभांचा धडाका लावत प्रचारात आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शंकर जगताप यांचे नाव जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच रावेतमधील प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. रावेतमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठका आणि कोपरा सभांना स्वयंस्फूर्तीने हजेरी लावली.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्या पद्धतीचा विकास शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड या गावांचा झालेला आहे. तसा विकास अद्यापही पुनावळे गावचा झालेला नाही. मात्र आमची सर्वात मोठी कचरा डेपोची समस्या आमदार अश्विनी जगताप यांनी सोडविली. आणि त्यासाठी शंकर जगताप यांनीही ज्याप्रकारे नियोजनबद्ध पाठपुरावा केला. त्याच प्रयत्नांचे यश म्हणून आमच्या पुनावळेकरांच्या डोक्यावरून कचरा डेपोचे भूत उतरले. असाच यापुढेही आमच्या पुनावळे गावचा स्मार्ट विकास करण्यासाठी स्मार्ट व्हिजन असणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच या भागाचे आमदार असावेत आणि त्यासाठी आम्ही पुनावळेतील सर्व सोसायटी धारक एकदिलाने जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन पुनावळे गावातील सोसायटी धारकांनी दिले. भाजप…
शिवतेजनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवतेजनगर येथील स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी “स्वर चांदण्याचे” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक नामवंत कलाकारांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, लक्ष्मण टक्केकर, शिवाजी साखरे, दीपक पाटील, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरि नारायण शेळके, राजू गुणवंत आदी मान्यवर उपस्थित होते. मधुगंधर्व संस्थेचे नंदिन सरीन यांच्या संकल्पनेतून आणि साहित्यिक राजेंद्र घावटे यांच्या समन्वयातून साकार झालेल्या कार्यक्रमात सुगम संगीत, भावसंगीत आणि भक्ती संगीतातून अभिरुचीपूर्ण संगीतमय फराळाचा आस्वाद रसिकांना घेता आला. सूर नवा ध्यास नवा फेम अभयसिंह वाकचौरे,…
