- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप पाठींबा देत; नाना काटे यांची माघार चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांचे बंड शमविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही यश आले आहे. त्यामुळे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज (दि. ४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुतीतील बंडखोर उमेदवार नाना काटे हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार का, याबाबत अनेक तर्क- वितर्क लावण्यात येत होते. दुपारी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढविणाऱ्या वाकडमधील स्थानिक उमेदवाराने वाकड गावच्या विकासासाठी काहीही केले नाही. याउलट त्यांच्यामुळे अनेक वर्ष गावातील विकासकामांना खीळ बसला होता. मात्र स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकासाकामांमुळे या वाकड गावचा कायापालट झाला. त्यामुळे गावचा विकास अखंडितपणे सुरू राहावा यासाठी यावेळीही आम्ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी असल्याची भावना; वाकडमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय (आठवले) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज वाकड परिसरातील विविध वस्त्या आणि सोसायट्यांना भेट देऊन स्थानिक…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या मोशीतील प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. समाविष्ट गावांच्या विकासासाठी ज्याने पुढाकार घेतला. त्या महेश लांडगे यांना आम्ही साथ देणार, असा निर्धार यावेळी मोशीकरांनी केला. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या टप्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. रविवारी सुट्टीचे निमित्त साधत समाविष्ट गावात प्रचार केला. मोशी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, बोराटेवस्ती येथे निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हजारे वस्ती, वाघजाई मित्र मंडळ, बनकर वस्ती, टेकाळे, आल्हाट, खिराडी, पुणे-नाशिक हायवे, गणेशनगर, स्वामी समर्थ कॉलनी…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – परिवर्तन करायचे, बदल घडवायचा हे एका दिवसात ठरलेले नाही. अनेक दिवसांचा हा संघर्ष आहे. भैरवनाथ महाराजांना स्मरून भोसरीकरांनी ठरवले, गेल्या दहा वर्षात सुरू असलेला भ्रष्टाचार, दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने संघर्षाची भूमिका घेतली तीच भूमिका भोसरी विधानसभेमध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी घेतलेली आहे. आता भोसरी विधानसभेची निवडणूक ही माझ्या एकट्याची राहिलेली नाही. ही निवडणूक संपूर्ण भोसरीकरांनी हाती घेतलेली आहे. त्यामुळे आता आपला विजय कोणी रोखू शकत नाही असा विश्वास हजारो नागरिकांच्या साक्षीने श्री. वाघेश्वर महाराजांच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या नुकताच माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यात एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा सिंह, संपदा कुलकर्णी, सौरभ बेदमुथा, संतोष पुजारी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रा. अजित पाटील आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी मागील २५ वर्षांचा आढावा घेत महाविद्यालयाने केलेली उत्तुंग…
करदाते आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविण्याचे राहुल कलाटेंचे आश्वासन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमचे दूरदृष्टी नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जागतिक दर्जाचे आयटी हब येथे आणले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणामुळे आयटीची वाट लावली. करदाते आयटीयन्स विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. यातून महाविकास आघाडीच सर्वांची सुटका करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी नागरिकांना आश्वासन दिले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी पृथ्वीराज साठे मित्र परिवाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील मित्र परिवारासाठी काळेवाडी येथील इंदू लॉन्समध्ये दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवाद साधताना कलाटे बोलत होते. या मेळाव्याला काँग्रेसचे…
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणूकीला गट-तट, नाराजी विसरून महाविकास आघाडी एकदिलाने सामोरे जाऊन तीनही जागांवर विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांनी केला. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला उद्धव ठाकरे पक्षाला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. ३) पिंपरीत संयुक्त बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजच्या युगात माझी ताई एक कर्तृत्ववान स्त्री झालेली मला बघायचे आहे. शिक्षण ही त्या कर्तुत्वाची पहिली पायरी आहे. तुला आवडत्या विषयात भरपूर शिक्षण घेता यावे. चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता यावा. त्यांची तजवीज करणे, ही भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे, असा संकल्प भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी रविवारी (दि.3) केला आहे. भाऊबीज सणाच्या दिवशी चिंचवड विधानसभा मतदार संघातील असंख्य महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाखो महिला भगिनींचे आभार मानत वरील संकल्प करायचे ठरविले आहे. शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक १/११/२०२४ रोजी दिवाळी फराळ आणि चाय पे चर्चा अर्थात स्नेह मेळावा शहरातील पत्रकार बांधव सह आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर जेष्ठ पत्रकार विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार दादाराव आढाव, अनिल वडघुले,महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज च्या लीना माने, जेष्ठ पत्रकार गणेश हुंबे, जेष्ठ पत्रकार महावीर जाधव, पत्रकार संतोष गोतावळे, विजय सोनवणे,रमेश साठे, पुण्यनगरीचे महेश मंगवडे अनिल बडगुजर, सागर सूर्यवंशी, संतोष जराड पत्रकार बांधव उपस्थित होते. परिसरातील काम करणाऱ्या तमाम अभ्यासू पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला. सुमारे दोन तास…
महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांशी अण्णा बनसोडे यांची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती मधील घटक पक्षांची देखील शहरात ताकद वाढली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे म्हणाले. महायुती मधील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत आपण सर्व एक दिलाने काम करत असून महायुतीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, घटक पक्षांना आगामी महापालिका तसेच इतर निवडणुकांमध्ये चांगल्या जागा मिळाल्या पाहिजेत. घटक पक्षांची देखील शहरात ताकद वाढली…
