शरद पवारांनी आयटी पार्क आणले पण सत्ताधाऱ्यांनी वाट लावली
करदाते आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविण्याचे राहुल कलाटेंचे आश्वासन
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमचे दूरदृष्टी नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जागतिक दर्जाचे आयटी हब येथे आणले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणामुळे आयटीची वाट लावली. करदाते आयटीयन्स विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. यातून महाविकास आघाडीच सर्वांची सुटका करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे
यांनी नागरिकांना आश्वासन दिले.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी पृथ्वीराज साठे मित्र परिवाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील मित्र परिवारासाठी
काळेवाडी येथील इंदू लॉन्समध्ये दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवाद साधताना कलाटे बोलत होते. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, अभिमन्यू दहीतुले, बाबू नायर, सजी वर्की व शाम अगरवाल, मनोज कांबळे, कौस्तुभ नवले, सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे,
सायली नढे, नरेंद्र बनसोडे, राहुल ढाले, वीरेंद्र गायकवाड, शंकर ढोरे, अमित जगदाळे, शयान अन्सारी, तेजस पाटील, बाबा गायसमुद्रे, स्वाती शिंदे, समिता गोरे, अशोक मंगल, रोहित शेळके, जय ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आयटीयन्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलाटे पुढे म्हणाले, साहेबांच्या आग्रह आणि पुढाकारामुळे आयटी पार्क झाले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह देशातील लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाले. लाखो भारतीय येथे स्थायिक झाले. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, रहाटणी, वाकड, थेरगाव हा परिसर म्हणजे आयटीयन्सची वसाहत झाला आहे. शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देखील यांचाच जातो. मात्र, राज्य कर्त्यांच्या अनास्थेमुळे आयटीयन्सना आजवर केवळ मनस्तापच सहन करावा लागला आहे. अनेक आयटी कंपन्या हिंजवडीतुन काढता पाय घेत आहेत. आता कोणीही हवालदिल होऊ नये ज्याप्रमाणे साहेबांनी आयटी पार्क केले त्याचप्रमाणे आयटीशी निगडित सर्व समस्या सोडविण्याची जबाबदारीही आमचीच आहे.
सध्या आयटी व लगतच्या परिसराला गंभीर वाहतूक समस्येसह अन्य समस्यांनी ग्रासले आहे. ज्याप्रमाणे दूरदृष्टी ठेवून आयटी पार्क आणले जाऊ शकते त्याचप्रमाणे आयटीतील व आयटीशी संबंधित सर्व समस्यातून केवळ शरद पवार साहेबच सुटका करू शकतात. त्यामुळे पवार साहेबांचे तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट कारण्यासाठी तुमची साथ हवी आहे.
– राहुल कलाटे
उमेदवार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजी पवार पक्ष
हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना
गेल्या दोन-तीन निवडणूकात विविध आश्वासने देण्यात आली. मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. कोट्यावधी महसूल देऊन आमची फरफट कायम आहे. मात्र, राहूल कलाटे हे आमच्या समस्या जवळून जाणतात त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्या त्यावर कायमचा तोडगा काढायचा असेल तर राहुल दादांशिवाय पर्याय नाही
– दत्तात्रेय देशमुख
अध्यक्ष हौसिंग सोसायटीज फेडरेशन