Author: maharashtrabreakingnews.com

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, शेकाप व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी चिखली परिसरात काढलेल्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी नागरिकांनी केलेली गर्दी, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी आणि गव्हाणे यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि परिवर्तनाचा एकच नारा देत हजारो नागरिक उत्स्फूर्त प्रतिसादात पदयात्रेत सहभागी झाले. या नागरिकांच्या गर्दीने परिवर्तनाचा नारा दिला आणि भोसरी विधानसभेत बदल घडवायचा असे चित्र या पदयात्रेत दिसून आले. टाळगाव चिखली कमानी पासून पदयात्रेला सुरुवात झाली. अजित गव्हाणे यांनी सर्वप्रथम गणेश…

Read More

जनता आ. लांडगे यांना पुन्हा संधी देईल आणि हॅट्रिक होईल पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे म्हणजे विधायक कामाचे बादशहा आहेत. जी कामे वर्षानुवर्ष प्रलंबित होती ती कामे त्यांनी मार्गी लावली असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केले. सुरेश म्हेत्रे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनधिकृत बांधकामांना शास्ती कर लावण्यात आला. शास्ती कराचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आमदार महेश दादा लांडगे यांनी मार्गी लावला. मोशी येथे कचऱ्याचा डोंगर झाला होता. विद्युत प्रकल्प सारखे विविध प्रकल्प राबवून तिथल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ जाहीरनाम्याचे प्रकाशन दापोडी, फिरंगाई मंदिर येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशित होणार आहे. त्यानंतर दुपारी ११:३० वाजता पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रचार…

Read More

– राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल : शहराच्या मानगुटीवरील भूत उतरवले..! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता असताना आम्ही शास्तीकर आणि साडेबारा टक्के परताव्याच्या प्रश्नासाठी मोठा पाठपुरावा केला. पण, खऱ्या अर्थाने भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या मानगुटीवरून शास्तीकराचे भूत उतरवण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले, असे गौरोवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांनी काढले. तसेच, गेल्या १० वर्षांत खऱ्या अर्थाने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महेश लांडगे यांनी केले, असा दावाही बहल यांनी केला आहे. भाजपा- शिवसेना- एनसीपी- आरपीआय महायुतीचे भोसरी विधानसभा…

Read More

ताई तुम्ही नक्की निवडून येणार मतदारांनीच व्यक्त केला विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गाव व पिंपरी कॉलनी परिसरात आपली प्रचार मोहीम आखली होती. यावेळी सर्वसामान्य मतदारांनी डॉ सुलक्षणा शीलवंत यांना शुभेच्छा व्यक्त करत यावेळी विधानसभेमध्ये तुमच्यासारखी उच्चशिक्षित महिला नक्की विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी गावातील वैभव नगर तपोवन मंदिर परिसर वाघेरे कॉलनी माळी आळी नव महाराष्ट्र विद्यालय तसेच पिंपरी कॉलनी परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रामुख्याने शिवसेनेचे नेते माजी महापौर संजोग वाघेरे पाटील माजी उपमहापौर…

Read More

-बाईक रॅली, पदयात्रा, मेळाव्यातून प्रचाराची रंगत वाढणार! भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने बुधवारी (दि.६) चिखली येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, बाईक रॅली मधून चिखलीमध्ये मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा झंझावात निर्माण करणार आहेत. अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान चिखली गावामध्ये पदयात्रा होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे (उबाठा) उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून यासाठी सीजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माझा जनसंपर्क, आजवर केलेली कामे, राबवले समाजोपयोगी उपक्रम आणि महायुतीचा पाठिंबा या जोरावर मी पुन्हा निवडून येईन, अशा विश्वास राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना आमदार अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. उमेदवारी माघारी घेतलेल्या 21 जणांपैकी 19 उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील रेशन दुकानदारांनी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला. दुकानदारांच्या अडचणीच्या काळात आमदार अण्णा बनसोडे कायम सोबत राहिले आहेत. त्यामुळे आम्ही जाहीरपणे अण्णा बनसोडे यांना पाठिंबा देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. यावेळी विजय गुप्ता, कपिल चौधरी, लजपत मित्तल, नरेश अगरवाल, अजय जाधव, एस एन कांबळे, अलका जगताप, रेखा गायकवाड, राजू कर्णावट, विष्णू चंचलानी, व्ही एन मिसळ, गणेश कांबळे, हरेश मुलाणी, जय उणेचा, प्रशांत नानेकर, शकील सुदुस, श्रीमती कापसे, चंद्रकांत वाघेरे, महेश शिंदे, अनिल वाघेरे, श्री माऊली आदी उपस्थित होते. रेशन दुकानदारांना येणाऱ्या अडचणींमध्ये दुकानदार हक्काने आमदार अण्णा बनसोडे यांना…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे. या सभेला चिंचवड विधानसभा…

Read More

चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार- अजित गव्हाणे -चऱ्होली एक झाली; परिवर्तनाची घोषणा दुमदुमली भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या आहेत. गावठाणाबरोबरच वाढत असलेल्या सोसायट्यांमुळे या भागामध्ये पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे त्यामुळे प्राधान्याने चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ चऱ्होली येथून झाल्यानंतर काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांनी ठिकठिकाणी नागरिकांकडून मिळणारे स्वागत स्वीकारत गावाचा पाणी प्रश्न तातडीने निकालात काढण्यात येईल असे आश्वासन दिले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे…

Read More