Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समिती आयोजित उत्तर भारतीयांचा दोन दिवसीय छठपूजा उत्सव दिमाखात साजरा झाला. घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. भाविकांच्या ” जय छठमाता ” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते. यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील भाविकांना मतदान करण्याची शपथ दिली आणि निवडणूक जनजागृती केली. बिहारच्या दिवंगत प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, मुंबईचे राजेश जैस्वाल, शहर…

Read More

– शंकर जगताप यांच्या गावभेट दौऱ्या चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदार मतदारसंघातील भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा बुधवारी पिंपळे सौदागर भागात गावभेट दौरा झाला. यावेळी आयोजित गावभेट दौऱ्या दरम्यान पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्यने त्यात सामीलही झाले. माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न (बापू) काटे, केशव घोळवे,निर्मला कुटे, शंकर काटे, प्रकाश झिंजुर्डे, भानदास काटे, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, जगन्नाथ काटे, जयनाथ काटे, अनिल काटे, कैलास कुंजीर, शेखर कुटे, बाळासाहेब काटे, चंद्रकांत काटे, पोपट काटे, विकास काटे, दीपक नागरगोजे, गिरीश जाचक, अतुल पाटील, महेंद्र झिंजुर्डे, नानासाहेब निवृत्ती काटे,…

Read More

बोपखेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे बोपखेलवासीय मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ठरविले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा युवती प्रमुख प्रतीक्षाताई घुले यांनी व्यक्त केली आहे. आज डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी बोपखेल परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती. यावेळी मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या प्रचारफेरी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रतीक्षा ताई घुले म्हणाल्या की, डॉ. सुलक्षणा शिलवंत या विजयी झाल्यानंतर…

Read More

काळेवाडी, थेरगाव परिसरातून नागरिकांचा पाठिंबा ! चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज काळेवाडी –  थेरगाव – रहाटणी या भागात वैयक्तिक गाठीभेटी करून प्रचार केला. यावेळी त्यांनी मा. नगरसेविका ज्योती भारती, विमल काळे, विजया सुतार, विनोद नढे, संतोष कोकणे,  नेताजी नखाते, संजय नरळकर, शंकर नढे, बाळासाहेब नढे, सुरेश नढे, संभाजी नढे, उषा काळे, रवी नांगरे,  दिनेश नडे, प्रवीण पाटील आधी मान्यवर व्यक्तींना ते भेटले. तसेच थेरगाव आणि रहाटणी परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या घरी त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. वैयक्तिक भेटी-गाठी आणि जनसंपर्कावर सध्या भाऊसाहेबांनी जोर देवून मतदार संघातील जनतेशी संवाद साधत आहेत. भोईर…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी सांगवीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बंधू – भगिनी आणि सर्व सामान्य जनता ही कायम माझ्या हृदयात आहे. आणि त्यांचे स्थान कायम तसेच राहील. त्यांच्या या विश्वासामुळेच लढण्याची ताकत मला मिळाली आहे. त्यांनी प्रेमाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात माय – बाप जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले. सकाळच्या सत्रात…

Read More

महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालट केला – नितीन काळजे यांचे प्रतिपादन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा प्रचंड कायापालट केला आहे. दहा वर्षांपूर्वीची गावे आणि आत्ताची गावे याची तुलना केली तर आमदार लांडगे यांनी समाविष्ट गावांचा केलेला विकास डोळ्यात भरतो असे प्रतिपादन माजी महापौर नितीन काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केले. काळजे म्हणाले की , दहा वर्षांपूर्वी समाविष्ट गावे विकासापासून वंचित होती. एकही आरक्षण विकसित झाले नव्हते. २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून नवीन गावांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली. विकास आराखड्यातील रस्ते झाले. च-होली, डुडुळगाव या भागात ५२ किलोमीटरचे रस्ते झाले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी मतदार संघात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात घरे उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी फुगेवाडी येथे दिले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फुगेवाडी, कुंदन नगर परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारत नगर बुद्ध विहार येथे तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका उषाताई वाखारे, संध्याताई गायकवाड, माई काटे, किरण मोटे , संजय नाना काटे, प्रशांत फुगे…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – तळवडे परिसरातील मूलभूत समस्या गेली दहा वर्ष ‘जैसे थे आहेत. रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा समस्यांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. जाणीवपूर्वक या भागाला सुविधांपासून वंचित ठेवले असल्याची तक्रार प्रत्येक जण करत आहे. या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे म्हणाले. तळवडेकरांचा हा वनवास आगामी काळात संपवणार असल्याचा विश्वास यावेळी गव्हाणे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) काँग्रेस तसेच…

Read More

– ग्रामस्थ म्हणतात… “आमच्या भविष्यासाठी तुम्ही आमदार होणे महत्त्वाचे” – महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या पदयात्रेला प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित होत असल्यामुळे एकीकडे निसर्गाचे मूळ स्वरूप अबाधित राहणार आहे. शिवाय या प्रकल्पातून तळवडे आणि आसपासच्या गावांचे आर्थिक परिमान बदलणार आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर गावची ओळख निर्माण होणार आहे. अशा प्रकल्पातून गावाची उन्नती, प्रगती आणि भरभराट करून देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा असल्याचा विश्वास तळवडे ग्रामस्थांनी व्यक्त केला. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली…

Read More

– दिघीकर मतदार महेशदादांना भरभरून मते देतील – ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड यांची भावना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अनधिकृत बांधकामांवर लादलेला शास्तीकर सरसकट माफ केल्यामुळे आणि दिघी परिसराची पुणे, पिंपरी-चिंचवडशी ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवल्यामुळे विद्यमान आमदार तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे यांच्या पाठिशी दिघीकर मतदार ठामपणे राहतील आणि पुन्हा एकदा त्यांना विधानसभेत आमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवतील, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड हे दिघीतील ज्येष्ठ नेतृत्व त्यांनी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नगरसेवक व शहर शिवसेनाप्रमुख अशा अनेक पदांवर काम केले आहे. १९७५ पासून…

Read More