Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज चिंचवड येथील आलमगीर शाही मस्जिदला भेट देवून मुस्लिम समाजातील बांधवांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. मुस्लिम बांधवांच्या अडी – अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन. त्याच बरोबर वेळोवेळी मुस्लिम समाजाला मदत करण्यासाठी माझे सहकार्य असेल असे आश्वासन भाऊसाहेब भोईर यांनी दिले. या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की चिंचवड मतदार संघात निवासी असलेल्या मुस्लिम बांधवांचे समाजासाठी असलेले योगदान वाखणण्याजोगे आहे. हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव समाजात एकोपा जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. चिंचवड मतदार संघ सर्वधर्म समभाव जपत असून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत.…

Read More

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचे दापोडीकरांनी रेकॉर्ड ब्रेक स्वागत केले. डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज दापोडी परिसरात प्रचार फेरी काढली होती. यावेळी न भूतो न भविष्यती असे दापोडीकरांनी त्यांचे स्वागत केले. फुलांचा प्रचंड वर्षाव आणि शेकडो ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा वर्षाव व राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज दापोडीतील फिरंगाई देवी चौकातून आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली होती. यावेळी हजारो नागरिक तेथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कंटेनर भरून फुले आणून…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – आमदार महेशदादा लांडगे सार्वजनिक कामांबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या वैयक्तिक अडचणीच्या वेळी धावून जातात. कोणात वाद असतील तर ते वाढविण्यापेक्षा मिटविण्याचे काम महेश दादांनी नेहमीच केले. यातून माणसे जोडत गेली. या प्रचंड जनसंपर्काच्या बळावर आणि केलेल्या विकास कामांची पावती म्हणून यावेळी तिसऱ्यांदा महेशदादा आमदार होतील असा विश्वास चिखली येथील जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितू यादव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यादव म्हणाले की, सन २०१४ मध्ये आमदार महेशदादा लांडगे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांचे व्हिजन आणि लोकांना मदत करण्याची मानसिकता यावर आम्ही तरुण मंडळी आकर्षित झालो. त्यावेळी चिखलीत आम्ही अतिशय कमी कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी…

Read More

अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला कासारवाडीत उदंड प्रतिसाद पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन प्रचार फेरी सुरुवात करण्यात आली. या प्रचार फेरीत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक श्याम लांडे, माऊली थोरात, स्वाती उर्फ माई काटे, किरण मोटे, उल्हास शेट्टी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वर्षा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आमदार अश्विनी जगताप यांनी काळेवाडी परिसरात गाठीभेटी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोपरा सभा, महिला बचत गटांच्या भेटीगाठी, स्थानिकांसह ‘डोअर टू डोअर’ मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मतदारसंघातील विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभाग घेत, मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी शंकर जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार काळेवाडी ग्रामस्थांनी केला. आमदार अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यात विजयनगर मेनरोड, अजिंक्य कॉलनी, सहकार कॉलनी १-२-३,…

Read More

– माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल, तर २० तारखेनंतर बघा! पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विरोधकांनी आरोप करताना अक्षरशः पातळी सोडली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाटते की मी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावे. पण, मी पातळी सोडून बोलणार नाही. मी आरोपांना उत्तर देणार नाही माझ्याकडे पुरावे आहेत मी काम मांडत राहणार विरोधकांना त्यांचे उत्तर मिळेल. पण, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देणार असेल, तर माझी विरोधकांना विनंती आहे की, माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. माझ्या माता-भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी ‘‘धारकरी’’ आहे, हे लक्षात ठेवा, असा…

Read More

महाविकास आघाडीकडे बोलायला मुद्दाच नाही म्हणून आरोप महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारात तोफ डागली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या १० वर्षांत समाविष्ट गावांमध्ये अनेक कामे करून दाखवली आहेत. ही कामं केल्यानंतरही केवळ विरोधाला विरोध आणि राजकारणात टिकायचे म्हणून टीका करायची. “याला पाडा त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. ‘‘अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला. महायुतीच्या भोसरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही संस्था येत्या काही दिवसात दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेत आहे. छोट्या छोट्या विभागांना साहित्य शाखा ही संस्था देत नाही. त्यामुळे पिंपळे गुरव सांगवी शाखा व्हावी म्हणून यापूर्वी मी एक उपोषण केले होते. आता दिल्लीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद जात आहे त्याचा आनंद आहे.पण छोट्या छोट्या विभागांना साहित्य संस्था देत नाही म्हणून पिंपळे गुरव सांगवी शाखेच्या मागणीसाठी दिल्लीत ज्यावेळेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल त्याचवेळी मी पुन्हा एकदा उपोषण करणार आहे. असे सुरेश कंक म्हणाले. मोठ्या बाता मारतील तिथं दिल्लीत पण गल्लीत काय आहे याची जाणीव करून…

Read More

गवळण भारुडाचे सादरीकरण सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  -+सांगवी पोस्ट ऑफिस मधील सर्व महिला एजंट दिवाळीत एकत्र झाल्या. पोस्ट खात्यात जनतेने पैशाची बचत करावी यासाठी वर्षभर या महिला काम करतात. दिवाळीत सांगवी पोस्टातील या महिलांनी पोस्ट कार्यालय पणत्या लावून उजळले. भक्तीगीते, गवळण, भारुड सादरीकरण केले. बचतीचा संदेश दिला. यावेळी जयश्री गुमास्ते यांनी “मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडा गं” ही गवळण सादर केली. दिपाली कुर्लेकर यांनी भारुड सादर केले. यावेळी महिला एजंट यांचा सन्मान करण्यात आला. दिवाळी फराळ देण्यात आला. सौ आश्विनी खळदकर, सुधा कोकाटे, लीना बोरोले, ज्योती शिनकर,वर्षा नागवडे, साधना जगदाळे, सुषमा चौधरी सहभागी झाल्या होत्या. सांगवी पोस्ट ऑफिस येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ”विद्यार्थी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन कळसाईत यांनी मुलांना मार्गदर्शन केले, सहशिक्षक प्रज्ञा शिरोडकर, डिंपल काळे, हेमा सिंग यांनी विद्यार्थी दिनाचे महत्व सांगितले. अरुण चाबुकस्वार सरांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना असे सांगितले, “७ नोव्हेंबर १९०० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी प्रतापसिंग हायस्कूल जि. सातारा इथे प्रवेश घेतला. तो हा दिवस विद्यार्थी…

Read More