Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड शहर सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांची भेट घेत त्यांना पाठींब्याचे पत्र दिले. याप्रसंगी भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेविका सुनीता तापकीर, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, सकल ब्राम्हण समाजाचे समन्वयक परीक्षित कुलकर्णी, डॉ. शर्वरी येरगट्टीकर, अनिल शर्मा, रोहन जोशी, अभय ओरपे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ब्राम्हण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना समन्वयक कुलकर्णी म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 9) संत तुकाराम नगर, लांडेवाडी, महात्मा फुले नगर, वल्लभनगर परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला संत तुकाराम नगर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी योगेश बहल, सदाशिव खाडे, यशवंत भोसले, जितेंद्र ननावरे, सुजाता पालांडे, श्याम लांडे, ज्ञानेश्वर कांबळे, फजल शेख, निलेश अष्टेकर, बबन गाढवे, राखी धर, अश्विनी शेलार, नेहा अढवळे, रूपाली धाडवे, पल्लवी कांबळे, राजेश वाबळे, नरेश केकाडे, पुरुषोत्तम वायकर, राज काची, ज्ञानेश लोहार, नारायण बहिरवडे, किरण सुवर्णा, माधव अडसुळे, दीपा मुरकुटे, संगीता खरात, सोनी शेवाळे,…

Read More

भोसरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वर्षभराचे साधारण ८ हजार चारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यातून दिघी गावाला किती निधी मिळाला. आज दिघीमध्ये खेळाचे मैदान, जलतरण तलाव, उद्यान, कुस्तीचा आखाडा, बैलगाडा घाट अशी एकही सुविधा न पुरवणाऱ्यांना दिघीमधील नागरिकांकडून मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही असे अजित गव्हाणे म्हणाले. आगामी काळात दिघीमध्ये या सर्व सुविधा पुरवण्याची ग्वाही यावेळी अजित गव्हाणे यांनी दिली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 9) दिघी परिसरात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारुती भैरवनाथ मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – यंदाची विधानसभा निवडणूक ही फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास या एकाच ध्येयाने मी लढत आहे. मागील दहा वर्षात स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सोसायट्यांमधील समस्या सोडविण्यात आम्हाला बऱ्याच अंशी यश आले आहे. तरीही आगामी काळात सोसायट्यांच्या उर्वरित समस्याबाबत विधानसभेत आवाज उठवत त्या समस्या मार्गी लावून  सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अभिमान वाटेल असा विकास करून दाखविणार, असे आश्वासन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिले. भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील रूणवाल क्लासिक सोसायटीमध्ये…

Read More

महायुतीच्या मेळाव्यात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अण्णा बनसोडे यांनी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला. त्यामुळे अण्णा बनसोडे हे सामाजिक भान जपणारा नेता आहेत, असे गौरव व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन देखील केले. काळभोरनगर…

Read More

चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि निलेश काटे युवा मंचचा उपक्रम पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि निलेश काटे युवा मंच यांच्या वतीने शनिवारी (दि. ९) रोजी ‘दीपोत्सव २०२४’ आणि ‘दिवाळी फराळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६:३० से ७:३० या दरम्यान संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन, सामजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे, विकास सक्सेना आणि नितीन वाटकर आहेत. विशेष आकर्षण म्हणून मराठा बटालियन यात सहभागी होणार आहे. आपला देश, आपली सेना आणि आपल्या धर्मासाठी या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चॅलेंजर…

Read More

निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत.. सर्वोच्च न्यायलयाने थेट हस्तक्षेप करावा.. शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची मागणी… पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारक म्हणवणारे भाजपचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री महोदय यांचा सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा उद्योग सुरु आहे. पक्षाच्या प्रचारासाठी येतात आणि खर्च मात्र, शासकीय यंत्रणांच्या माथी मारण्याचा पराक्रम यांच्याकडून होत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर याचा अधिकचा भार पडत असून महाराष्ट्र कर्जबाजारी होत आहे. राज्याची जनता या भ्रष्ट नीती जोपासणाऱ्या भाजप सरकारचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधारी भाजपवर केला आहे. पत्रकात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कसरतीने कमावलेली शरीरयष्टी, धिप्पाड देहबोली, रुबाब असा की नुसत्या नजरेने समोरचा गारद होईल. पण आज पुन्हा एकदा या भोसरीच्या पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या हृदयातला हळवा कोपरा कार्यकर्त्यांनी अनुभवला. “माझ्या कार्यकर्त्याला, जपलेल्या माणसांना, धक्का जरी लागला तर माझ्यातला महेश लांडगे जागा होईल”असे दादा तुम्ही जेव्हा भरगच्च व्यासपीठावरून, हजारो नागरिकांच्या समोर निक्षून सांगितलं. तेव्हा कार्यकर्ते म्हणून आमचा उर भरुन आला. कार्यकर्त्यांची डोकी फुटली तरी राजकारणच करू पाहणाऱ्या ”सुसंस्कृत” लोकांना दादा तुम्ही आरसाच दाखवला, अशा भावना माजी नगरसेवक विकास डोळस यांनी व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेचे दिघी येथे…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – परिवर्तन करायचे हे नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते. फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे असे आमदार रोहित पवार भोसरी येथे म्हणाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार भोसरी येथे गुरुवारी बोलत होते. अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी रोहित पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी तरुणांमध्ये जोश निर्माण केला. उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असे म्हणत रोहित पवार यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस: चिन्हासमोर बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.८) युवा नेते रोहित पवार यांनी मतदारसंघातील भोसरी, धावडे वस्ती चक्रपाणी वस्ती, त्यानंतर सायंकाळी निगडी, यमुनानगर हा भाग अक्षरशः पिंजून काढला. तरुणांना…

Read More