चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

नागरिकांनी ठरवलंय परिवर्तन करायचे, एकाधिकारशाही मुळापासून संपवायची- रोहित पवार

Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – परिवर्तन करायचे हे नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते. फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे असे आमदार रोहित पवार भोसरी येथे म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार भोसरी येथे गुरुवारी बोलत होते. अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी रोहित पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेले माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांची भेट घेतली. शिवसेनेचे रवी लांडगे यांच्याशी रोहित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली भोसरीतील राजकीय समीकरणे, मिळत असलेला प्रतिसाद ज्येष्ठ जुन्या पदाधिकाऱ्यांशी रोहित पवार यांनी चर्चा केली. यानंतर भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.

यावेळी रोहित पवार म्हणाले, भोसरी मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला जो ऑन ग्राउंड होता. सोशल मीडिया तसेच कॉलिं चा आधार घेऊन करण्यात आला होता. ज्यामध्ये अजित गव्हाणे यांचे नाव पुढे आले आहे. सुसंस्कृत उच्चशिक्षित म्हणून अजित गव्हाणे यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळत आहे. भोसरीतील आमदारांच्या एकाधिकारशाही, आपल्याच लोकांना पुढे करत महानगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, ठेके मिळवण्यासाठी दबाव पद्धती याला सर्व कंटाळले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण परिवर्तनाच्या मनस्थितीत आहे.

मतदारसंघातील अडचणी लक्षात न घेता सामान्य लोकांच्या गरजा लक्षात न घेता केवळ आपल्या हिताचे पाहिले जात आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून नागरिकांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे. ज्याला भोसरी परिसरातील प्रत्येक घटकाची साथ मिळत आहे.सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी एक चांगला प्रतिनिधी म्हणून अजित गव्हाणे एक चांगला पर्याय आहेत. त्यांच्या पाठीमागे लोक उभे राहतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची साथ महत्त्वाची

भोसरी मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाची साथ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याबद्दल सुलभा उबाळे, रवी लांडगे तसेच तमाम शिवसैनिकांचे मनापासून आभार रोहित पवार यांनी व्यक्त केले. भोसरी मतदारसंघांमध्ये प्रत्येक जण मन लावून काम करत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे. असे देखील रोहित पवार म्हणाले.

गरीब माणसासाठी काय करता ते दाखवा – रोहित पवार

कुठेतरी उत्तर प्रदेशचा प्रभाव महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांवर झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र एक पुरोगामी विचाराची भूमी आहे. महाराष्ट्र धर्म आपल्याला जपायचा आहे . बटेंगे कटेंगे अशी जी काही वक्तव्य येत आहेत ती गुजरात, उत्तर प्रदेश वरून आलेली वाक्य आहेत. हे गुजरातशाही महाराष्ट्रावर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या नेत्यांना आम्हाला एवढेच सांगायचे आहे. आम्ही मराठी माणसे आहोत. ही संतांची भूमी आहे. आमचे विचार पुरोगामी आहेत. आजच्या भाजपच्या याच धर्माच्या चक्रव्यूहामध्ये गरीब माणूस अडकलाय. त्या गरीब माणसाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याबद्दल तुम्ही काय करता ते दाखवा असे रोहित पवार म्हणाले.

 

” माझ्या मूळ स्वभावावर मी येईल” अशी वक्तव्य भाजपच्या उमेदवारांनी करणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या तोंडून लोकांना सांगताय की तुमचा मूळ स्वभाव काय आहे. मुळात आम्ही सगळे परिवर्तनाची भूमिका समोर ठेवून एकत्र आलेलो आहोत. आज केवळ मी उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात नाही.तर आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे. माझा प्रत्येक सहकारी, पक्षातला पदाधिकारी हा परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे. ज्या पद्धतीने त्यांनी काल भाषण केले ते लोकांना आवडणारे नाही. विरोधकांची वक्तव्य पराभवाच्या नैराश्यातून पुढे येत आहेत. त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतील.

अजित गव्हाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button