- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागात बनसोडे यांची भव्य प्रचार रॅली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की ‘आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’ त्यामुळे विकासाची पालखी वाहण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची चिंचवड दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागाची प्रचार फेरी “प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम” यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. राम मंदिरापासून रॅली सुरू झाली राम मंदिर, पंचजन्य टाटा शो रूम, दत्त नगर, शंकर नगर, बाबर वजन काटा, विद्या नगर, परशुराम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि.११) गांधीनगर, खराळवाडी, कामगार नगर, आनंदनगर, मोरवाडी, लालटोपी नगर या परिसरात पदयात्रा काढत गाठीभेटी घेतल्या. या पदयात्रेला स्थानिक महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या. खराळ आई मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. परिसरातील गणपती मंदिर, भगवद्गीता मंदिर, मारुती मंदिर, नवयुग तरुण मंडळ, स्वामी समर्थ मंदिर, मैत्री बौद्ध विहार, दत्त मंदिर, अशा विविध मंदिरांना भेटी देत आमदार अण्णा बनसोडे यांनी काही घरांना भेटी दिल्या. महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर तरुणांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे फटाक्यांच्या…
आता टीका केली म्हणता, तुम्हीही टीका करूनच निवडून आले; आमदारांना टोला भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पालिका टू पार्लमेंट आम्हाला सत्ता द्या. सगळे प्रश्न सोडवतो असा भाजपचा दावा होता. 2014 ते 2024 आम्ही यांना सत्ता दिली. मात्र गेल्या दहा वर्षात रेड झोनचा प्रश्न सुटला नाही. जागोजागी टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. भोसरी गावाला अक्षरशः बकालता आली आहे. भोसरीतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे हे त्यांनाच माहीत नाही. ‘नाराजीचे हे गळू मोठ्या प्रमाणात ठसठसत आहे’ कधी फुटेल सांगता येत नाही अशी घणाघाती टीका बाळासाहेब गव्हाणे यांनी केली. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे गेल्या 18 वर्षापासून भाजपमध्ये…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून पुढे एक पाऊल टाकत त्यांनी काकडे पार्क, चिंचवडगाव येथील स्वतःचे जनसंपर्क कार्यालय देखील भोईर यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी दिले आहे. कोऱ्हाळे यांचे हे कार्यालय अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचे चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालय असेल. सदरील कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५.०० होणार आहे. अशी माहिती अनंत कोऱ्हाळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाऊसाहेब भोईर यांच्या उमेदवारीमुळे चिंचवड मतदार संघातील निवडणुकीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक समाजासाठी विशेषता मुस्लिम समाजासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी महायुतीला ताकद दिली पाहिजे, त्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी अल्पसंख्यांक समाजाने उभे राहावे असे आवाहन आमदार व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी अल्पसंख्याक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.…
– महाविकास आघाडीचे धोरण महिला विरोधी : चित्रा वाघ भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी ही वंदनीय आहे. हा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे याच तत्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या , महिलांना सशक्त व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महेश लांडगे यांच्या हॅट्रिक साठी महिला शक्तीने पुढे यायचे आहे असे आवाहन देखील चित्रा…
महायुतीच्या तीनही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाज “व्हिजन महाराष्ट्र २०२८” साठी भाजपा महायुती सोबत असून, पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे महायुतीचे तीनही उमेदवारांना उत्तर भारतीय समाज भरघोस मतांनी विजयी करेल, असा विश्वास दिल्ली भाजप अध्यक्ष तथा खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक २०२४ महायुतीचे चिंचवड विधानसभा अधिकृत उमेदवार शंकर जगताप, भोसरी विधानसभा महेश दादा लांडगे, पिंपरी विधानसभा अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेता तथा खासदार मनोज तिवारी (दिल्ली भाजपा अध्यक्ष) यांची मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या . विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचीही पार्थ पवार यांनी भेट घेतली. ज्येष्ठ नेते नंदू कदम, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पिल्ले, प्रदेश युवा मोर्चाचे अनुप मोरे,माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, जितेंद्र ननावरे, शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी यांच्या जनसंपर्क कार्यालयांना व निवासस्थानी पार्थ पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली. व चर्चाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष फजल शेख, चंद्रकांत गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, रवी काची, अजित भालेराव, देवदत्त लांडे, पंकज…
पिंपरीत महायुतीचा विजय निश्चित आमदार अण्णा बनसोडे यांचा विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंची गर्दी होईल. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी लाखोंची जनता करेल, असा विश्वास पिंपरीचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे जाहीर सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुण्यातील टिळक रोडवर असलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (दि. 12)…
वेगवेगळ्या समाज घटकांचा भाऊसाहेबांना पाठिंबा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आतापर्यंत आमच्या समाजाला सर्व पक्षांनी गृहीत धरले आहे. मात्र भाऊसाहेब भोईर हे एकमेव असे नेते आहे की त्यांनी आमच्या समाजाला प्रत्येक वेळी मदत केली असून सहकार्याची भावना ठेवली आहे. असे मत सकल धनगर समाज व सकल मातंग समाजाने व्यक्त केले. अजंठा नगर येथील संत बाळू मामा मंदीरात नुकतीच सकल धनगर समाज व सकल मातंग समाजाची बैठक पार पडली. या प्रसंगी चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी धनगर समाज व मातंग समाज बांधव यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्द राहणार असल्याचे सांगून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी व मातंग…
