- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेशदादा लांडगे यांनी कामे करताना व्हीजन डोळ्यासमोर ठेवून व कोणताही दुजाभाव न ठेवता कामे केली असे प्रतिपादन माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले. भालेकर म्हणाले की, भोसरी मतदारसंघ विकासापासून वंचित होता. गेल्या दहा वर्षाचा आमदार महेशदादा लांडगे यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अतिशय निस्वार्थीपणे व कोणताही दुजाभाव न ठेवता व्हीजन डोळ्यासमोर ठेवून विकास कामे केल्याचे दिसते. आमदार महेशदादा यांनी तळवडे येथे जैवविविधता प्रकल्प (बायोडायव्हर्सिटी) प्रकल्प आणला. अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे लोकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. संविधान भवनची संकल्पना आमदार लांडगे यांनी…
महाविकास आघाडीच्या अजित गव्हाणेंवर वारकरी सांप्रदायाचा संताप संतपीठा संचालकांच्या पात्रतेवरून वाद पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जळगाव चिखली येथील संतपीठ चा अपप्रचार करून संतपीठाच्या संचालकांचे, शिक्षक व पर्यायाने सर्व व्यवस्थेचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या यंत्रणांकडून केला जात आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या श्रीक्षेत्र टाळगाव चिखलीचे नाव बदनाम होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या चिंतन समिती सदस्य व श्रीक्षेत्र टाळगाव चिखलीच्या ग्रामस्थांनी संतपीठाविषयी आत्मियतेच्या भावना नोंदवत संतपीठाचा अपप्रचार करणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी भोसरीतील एका प्रचार सभेमध्ये महविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या यंत्रणांकडून आमदार आणि महायुतीचे उमदेवार महेश लांडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी- चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न केवळ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच मार्गी लागला आहे. मोशीत भव्य न्याय संकुल उभारले जात आहे. याशिवाय देशातील पहिले संविधान भवनही चिखलीत साकारत आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा भाजप उमेदवार महेश लांडगे यांना असल्याचे भोसरी विधानसभेतील विधीक्षेत्रातील उपस्थित तज्ञांनी जाहीर केले आहे. कायद्याचे अभ्यासकही सोबत आल्याने आमदार लांडगे यांचे बळ वाढले आहे. भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त विधी व न्याय फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीमध्ये वकीलांसाठी व्याख्यानमाला व स्नेह मेळावा आयोजित केला होता. यास ४०० वकिलांनी सहभाग नोंदविला होता. या प्रसंगी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी श्रमिक कामगार वर्गाला डॉ सुलक्षणा शिलवंत या आपल्या समस्या सोडू शकतील असा आधार वाटतो आहे, असा विश्वास कामगार हिताय बांधकाम कामगार श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ मेहत्रे यांनी व्यक्त केला आहे. कामगार हिताय बांधकाम कामगार श्रमिक सेनेने पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात आकुर्डी येथे श्रमिक व कष्टकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांना पाठिंब्याचे पत्र कष्टकरी श्रमिक सेनेच्या संस्थापक अध्यक्ष दीपक मेहत्रे यांनी राष्ट्रवादी शरद…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जाधववाडीतील अनेक लोकांनी माझ्या कानावर अनेक गोष्टी घातल्या. इथे भूमिपुत्रांच्या जमिनी महापालिकेतील विविध आरक्षणे, रस्ते तसेच प्रकल्पांसाठी ताब्यात घेतल्या गेल्या. उर्वरित जागांचा विकास व्हावा अशी माफक अपेक्षा नागरिकांची असताना विविध कारणांनी दडपशाही केली गेली. मंजूर केलेले रस्ते ‘शिफ्ट ‘करण्यात आले. शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करण्याची दडपशाही सध्या सुरू आहे. मात्र आता अशी दडपशाही चालू देणार नाही नाही. या दडपशाही विरोधातच नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत असल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मंगळवारी सांगितले. या परिवर्तनातून मतदार संघाचा विकास होणार असल्याचे देखील अजित गव्हाणे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यावर भाऊसाहेब भोईर यांनी जोर दिला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा वाकडमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून संवाद साधला. यावेळी वाकड मधील लोकांनी भोईर यांचे जंगी स्वागत केले. भाऊसाहेबांसारख्या सुसंस्कृत आमदाराची चिंचवडला गरज असल्याच्या भावना लोकांनीं व्यक्त केल्या. नागरीकांच्या मनातील आमदार निवडून देण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी मतदारांना केले. मतदारांना आवाहन करीत असतांनाच भेटी दरम्यान अनेक विविध गोष्टींवर नागरिकांशी संवाद साधला. नागरिक…
-शरद पवारांचे पिंपरी चिंचवडवर विशेष प्रेम भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. राज्य आम्हीही चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल येथे म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराच्या वाटण्या करून, शहराची वाट लावणाऱ्यांना अद्दल घडवा.अजित गव्हाणे यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला संधी द्या असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप -शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील पदयात्रेत नागरिकांच्या उपस्थितीने ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा उच्चांक मोडला. काळेवाडी परिसरात मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहून विजयाची माळ जगताप यांच्याच गळ्यात पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारानिमित्त काळेवाडी येथे पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर या भागात झंझावाती प्रचार दौरा पार पडला. यावेळी वाल्हेकरवाडी येथे चक्क बैलगाडीतून शंकर जगताप यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे “हा प्रचार दौरा आहे की; भव्य विजयी मिरवणूक”? असा प्रश्न बघणाऱ्यांना पडला असेल. शंकर जगताप यांच्या प्रचार दौऱ्याला चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथून सुरूवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच जागोजागी नागरिकांनी जगताप यांच्यावर पुष्प वर्षाव केला. सदर पदयात्रा पुढे इंदिरा नगर, दळवी…
शरद पवारांचा झंजावात उद्या भोसरीच्या आखाड्यात..! शेवटच्या टप्प्यात ‘वस्तादा’चा डाव भाजपला गारद करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राजकारणाच्या आखाड्यात वस्ताद समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (दि.१३) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी सभा होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील शरद पवार यांच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भोसरीतील भाजप विरोधात फिरलेल्या वातावरणात ‘ वस्तादांचा ‘ डाव भाजप उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे…
