Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची आपल्या प्रचार तंत्रातील शेवटचे ब्रह्मास्त्र वापरून आज संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. या अगोदर भाऊसाहेब भोईर यांनी सकल धनगर समाज, सकल मातंग समाज, अपना वतन संघटना, यंग फ्रेंड सर्कल, अखिल भारतीय गौरक्षा परिषद, शिवशाही व्यापारी संघ, ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल, प्रजाशक्ती पक्ष, आर. पी. आय (कांबळे गट), आर. पी. आय (निकाळजे गट) अशा अनेक संघटना पाठींबा दिला असून आज पूनावळे येथे घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – आमदार महेशदादा लांडगे हे सर्वांच्या संपर्कात असतात लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवतात. आपुलकी या शब्दाचा खरा अर्थ महेशदादा लांडगे असा असल्याचे प्रतिपादन माजी महापौर राहुल जाधव यांनी येथे केले. माजी महापौर जाधव म्हणाले की, आमदार महेशदादा लांडगे यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांसाठी त्यांनी केलेले काम यापूर्वी कोणीही केले नव्हते. तळवडे ते दिघी पर्यंत असलेल्या समाविष्ट गावांचा त्यांनी विकास केला. सन १९९७ ते २०१७ पर्यंतचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला. ज्या गावाची जी गरज आहे, ती गरज तो विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तळवडे येथे बायोडायव्हर्सिटी प्रकल्प आणला. चिखली…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ख्रिश्चन बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. पिंपरी गाव येथील जीजस इज लॉर्ड चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवांनी आमदार बनसोडे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यावेळी केनेथ सिल्वे, सकायना सिल्वे, निक्सन थॉमस, रूबन लॉरेन्स, राजेश कदम, नरेश दायमा, राजेश नायर आदी उपस्थित होते. आमदार अण्णा बनसोडे यांनी ख्रिश्चन समुदायाला नेहमी सहकार्य केले आहे. आमदार बनसोडे हे कामाचा माणूस आहेत. आम्ही माणसाला पाहून मत देणार आहोत. सर्व ख्रिश्चन बांधव अण्णांच्या पाठीशी उभा आहे, असे यावेळी सांगण्यात आले. ख्रिश्चन बांधवांना जे सहकार्य लागेल ते आपण करू. आजवर अनेक ख्रिश्चन बांधव…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण मतदारसंघात भव्य महाबाईक रॅली काढण्यात आली. या महाबाईक रॅलीच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघातील नागरिकांना अभिवादन केले. लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून या महाबाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही रॅली पिंपळे गुरव मेन बस स्टॉप मार्गे सृष्टी चौक, पिंपळे गुरव – सुदर्शन नगर चौक, पिंपळे गुरव – स्वराज्य चौक – काटे पेट्रोलपंप – महादेव मंदिर, पिंपळे सौदागरनंतर रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार…

Read More

निर्भयपणे मतदान करा – अर्चना यादव    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  –  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघा करिता दि. २०/११/२०२४ रोजी मतदान होणार आहे, मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर ओळखीचे पुरावा ग्राह्य धरले आहेत. मतदार केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतात परंतु मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक,  आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,…

Read More

मतदान अधिकारी कर्मचारी यांना केंद्रनिहाय साहित्य वाटप होणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड ऑटोक्लस्टर मधील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी करणेत येणार आहे. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ या जागे मध्ये होणार आहे. साहित्य…

Read More

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे अन्‌ संघटनेचे सर्व सहकारी, कामगारांची साथ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजक संघटनेेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. संघटनेचे नोंदणीकृत सदस्य उद्योजक ४ हजार २०० हून अधिक आहेत. लघु उद्योजक आणि कामगार असा सुमारे ४० हजाराहून अधिक जनसमुदाय आमदार लांडगे यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार लांडगे यांची ताकद आणखी वाढली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांना पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “आवर्जुन मतदान करणारा तोच खरा सुजाण नागरिक आहे. साहित्यिक काव्य जागर करत मतदानाबद्दल जागृती वाढवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मतदारांच्या उदासीनतेमुळे चुकीचे प्रतिनिधी निवडले जाऊ शकतात. कुठल्याही प्रलोभनांना किंवा फेक नरेटिव्ह ला बळी न पडता सर्वांनी मतदान हे केलेच पाहिजे. मतदान न करणाऱ्याला व्यवस्थेवर आणि प्रशासनावर टीका करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. प्रौढ मतदानावर आधारित लोकशाहीमध्ये लोकांना हवे ते राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार आहे. मतदानावर देशाचे आणि राज्याचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर रिकामे यांनी केले. पिंपरी चिंचवड साहित्य मंच ने आयोजित…

Read More

   भव्य दुचाकी रॅलीतून भाऊसाहेब भोईर यांचा प्रचार   चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब भोईर यांच्या मनीषा स्मृती निवासस्थानापासून दुचाकी रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर दुचाकी रॅली थेरगांव, रहाटणी, वाल्हेकरवाडी काळेवाडी फाटा चौक, चाफेकर चौक, चिंचवड, वाकड, कस्पटेवस्ती वस्ती करत डांगे चौक या ठिकाणी रॅली सांगता करण्यात आली. याप्रसंगी चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, गणेश लोंढे, राजाभाऊ गोलांडे, सिद्धिक शेख आणि शेकडो दुचाकीधारक उपस्थित होते.   निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ २ दिवस शिल्लक असल्याने या अंतिम टप्प्यात भाऊसाहेब भोईर यांच्याकडून प्रचार रॅली, सभा,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी आज दापोडी ते निगडी दरम्यान आपली प्रचार रॅली आयोजित केली होती. तुफान प्रतिसाद असलेल्या या रॅलीने अखंड पिंपरी विधानसभा मतदारसंघात झंझावात निर्माण केला. ही रॅली पाहून मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर या हमखास निवडून येणार त्यांनी पिंपरीचे रण मारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सुलक्षणा शिलवंत धर यांनी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून दापोडी येथून प्रचार रॅलीस प्रारंभ केला. यावेळी शेकडो…

Read More