- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळी महात्मा ज्योतिबा फुले शाळा, दळवीनगर, चिंचवड या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की मी मतदान केले आहे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. आपण मतदार राजे आहात. सर्व घटकातील मतदारांनी आवर्जून मतदान करावे. असे भोईर यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकारी येणार असा ठाम विश्वास महायुतीच्या पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. आमदार अण्णा बनसोडे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी लवकरात लवकर घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. मागील 20 ते 25 दिवसांपासून सुरू असलेली रणधुमाळी संपली असून आता मतदारातले काम करणार आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येणार आहे. असा मला ठाम विश्वास असल्याचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले. आमदार अण्णा बनसोडे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. चिंचवड स्टेशन येथील कै गंगाराम बहिरवडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक – पालक – विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच राहुल गायकवाड (इंदिरा गांधी हायस्कूल) व पूजा निकम उपस्थित होते. शाळेतील विविध उपक्रम,जनजागृती कार्यक्रम,विदयार्थी पालक मेळाव्याच्या मुख्य उद्देश, महत्व,कारण,भूमिका उपस्थित पालकांना आपल्या खास प्रास्ताविकातून निशा पवार आढावा घेतला. शाळेच्या प्रगतीविषयी व पालक मेळावा आयोजना पाठीमागची भूमिका,ध्येय,उद्देश,मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आज या आधुनिकतेमुळे मुले टर्निंग पॉइंटला वेगळ्याच ट्रॅक जात आहे हे पालकांनी…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधत महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी ( दि.18) केली. नागरिकांच्या पुढाकारातून भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचा लढा उभारला. नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता नागरिकांच्या हाती निवडणूक सोपवून निवडणूक प्रचाराची सांगता केली असल्याच्या भावना अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. सोमवारी प्रचाराच्या सांगता दौऱ्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला सुरक्षा, शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार या मुद्द्यावर महिलांनी यावेळी मतदारांना परिवर्तनाचे आवाहन देखील केले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी झाली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदार केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून मतदारसंघात ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने चिंचवड येथील बॅन्क्वेट हॉलमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांचा स्नेहमेळावा आज संपन्न झाला. सदर स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ नेते आझम पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शहरातील मौलाना, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर, चिंचवड विधानसभेचे राहुल कलाटे, शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार आदी पक्षाचे पदाधिकारी व मौलाना व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. पानसरे यांच्या हस्ते भव्य मोठा गुलाब फुलांचा हार तीनही उमेदवारांना एकत्रित घालण्यात आला. यावेळी गुलामअली भालदार…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण विभागाच्या(एनएसएस) वतीने नुकतेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदानाच्या या जनजागृतीसाठी विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे स्थानक तसेच शहरातील विविध चौकांत हातात मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स घेवून जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला लोकांनीही उत्फुर्तपणे प्रतिसाद देत, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुट्टीचा आनंद न घेता आवर्जून मतदान करण्याचे वचन दिले. या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.रजनिश कौर सचदेव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औद्योगिक कंपन्या हा आर्थिक कणा आहेत, तर या शहरातील कामगार हा पिंपरी-चिंचवडचा आत्मा आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहीन, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी कामगारांना दिला. यावेळी शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही सोबत असल्याचा विश्वास कामगार बांधवांनी दिला आहे. शहरातील औद्योगिक क्षेत्राचा पाया असलेल्या टाटा मोटर्स कंपनीतील तीनही मुख्य प्रवेशद्वारांवर भाजपा-शिवसेना-एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी कामगारांशी संवाद करीत निवडणूक प्रचाराची सांगता केली. यावेळी कामगार युनियनचे प्रमुख प्रतिनिधी, कामगार आणि अधिकारी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रातील जीवनवाहिनी आणि शहराचा आर्थिक कणा…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) 6 आळंदी कार्तिकी यात्रा २०२४ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांसह प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होणार आहे. २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आणि २८ नोव्हेंबरला श्रींचा मुख्य ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात होणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. या सोहळ्याचे नियोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे मार्गदर्शनात जाहीर करण्यात आले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती…
