Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, शहरातील दिव्यांची दुरुस्ती व देखभाल, दफनभूमी सुरक्षा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या प्रकल्पांसाठी टाकणे, तसेच महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी खर्च यासह मनपा हद्दितील मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिलांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना मनपाच्या कर संकलन विभागाच्या मंजूर दराने मानधन देण्याबाबतच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. या सोबतच “मुख्यमंञी – माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलामार्फत भरून घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे महिला आर्थिक विकास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने पदभार त्यांच्याकडे सोपविण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी दिले आहेत. डॉ. सूर्यवंशी हे २००६ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी पीएच.डी. (व्यवस्थापन), एमबीए (मार्केटिंग), एलएलबी आणि बीएससी (फिजिक्स) असे शिक्षण पूर्ण केले आहे. ९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर…

Read More

अडथळा निर्माण झाल्यास पिंपरी चिंचवड शहर अंधारात जाण्याची शक्यता?.. आयुक्तांच्या निदर्शनास आणली बाब… पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बिजलीनगर ते रुपीनगर दरम्यान महावितरणच्या उच्च क्षमतेच्या टॉवर लाईनखाली उंच झाडांची लागवड करण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य तथा शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. याबाबत सौंदणकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘प्राधिकरण परिसरातील काच घर चौक ते भक्ती शक्ती चौक या दरम्यान महावितरणची उच्च क्षमतेची…

Read More

प्रधान सचिव – कामगार विभाग आय. ए.कुंदन यांच्याशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुंबई येथे काल आझाद मैदानावर घरेलू कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार आज महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधानसचिव आय ए कुंदन यांचे सोबत पोलिसांनी शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली यावेळी निवेदन देऊन झालेल्या चर्चा नंतर केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार घरेलू कामगारांना लाभ देण्यात येतील असे आश्वासन प्रधानसचिव यांनी आज दिले. दरम्यान घरेलू कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ईएसआयसी योजना, सामाजिक सुरक्षा, नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया, मंडळास निधी यावर सविस्तर चर्चा करण्यात…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत विधान परिषदेत आमदार उमा गिरीश खापरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांवर होणारी कोंडी, अपघातांचा धोका आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याकडे आमदार उमा खापरे यांनी सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरू असून आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम अदा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळातील (‘पीएमपीएमएल’) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०% हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये  त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरक देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली होती. यापूर्वी पहिल्या हप्त्याचे वितरण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून पूर्ण झाले होते, मात्र दुसऱ्या हप्त्याबाबत विलंब झाला होता. याबाबत भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या वतीने संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी अंतिम सामन्यात अहिल्यानगर येथील नेप्ती पॉलिटेक्निकच्या संघाने १९ गोल केले तर पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या (पीसीपी) संघाने १० केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक उपविजेत्या मुलांच्या फुटबॉल संघात अनिकेत खोसे, राजवीर आखाडे, रवीतेज यादव, सागर माळगी, यश नगरे, हर्ष गंगावणे, सर्वेश धनावडे, परीक्षित पोवार, जय क्षेत्री आणि क्षितिज पवार यांचा समावेश होता. विजयी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) यांच्या वतीने “इन्स्पायर २०२६” या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. परिषदेत “शाश्वत जागतिक भविष्यासाठी व्यवसायिक नव संकल्पनांचा मार्ग”(“Responsible Business Innovation: Driving Change for Sustainable Global Future”) या महत्त्वपूर्ण विषयावर देश विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. परिषदेचे उद्घाटन उद्योजक डॉ. प्रशांत पानसरे यांच्या हस्ते होणार आहे. भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फिलिपिन्स, थायलंड, लेबनॉन आणि दुबई आदी देशांतील संशोधकांनी…

Read More

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यदिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन स्वाती मॅडम यांनी केले. कार्यक्रमामध्ये उर्मिला मॅडम यांनी मराठी भाषण करून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील महान कार्याची माहिती दिली. समृद्धी मॅडम यांनी इंग्रजी भाषणातून महिला सशक्तीकरणाचे महत्त्व सांगितले, तर मनोरमा मॅडम यांनी हिंदी भाषणातून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे पिंपळे गुरव जैन श्रावक संघ आणि जय आनंद महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘आदर्श माता सन्मान समारोह’ उत्साहात पार पडला. जैन स्थानकाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात समाजातील आदर्श मातांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार अश्विनी जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोककुमार पगारिया, जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया, कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड, दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, पिंपळे गुरव संघाचे अध्यक्ष राजेंद्रजी कर्नावट, माजी अध्यक्ष प्रा. सुरेशजी धारिवाल, डॉ. निलेश भंडारी आदी…

Read More