- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सर्व विभागप्रमुखांना तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्याचे आदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवून एकूणच पायाभूत सुविधांची पुर्तता करून राहणीमान सुधारण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, व नागरिकांना या सेवांमुळे मिळणारे समाधान आणि महानगरपालिकेचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व जोपासण्यासाठी, महानगरपालिकेने सर्वसमावेशक यंत्रणा सुरू करुन स्मार्ट सारथी तक्रार निवारण प्रणालीमध्ये सकारात्मक बदल केले आहेत. यापुढे सारथीवर आलेल्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही झाल्याबाबत तक्रारदारालाच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करण्यात येणार आहे. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून निवारण करून ती बंद केल्यानंतर त्याबाबत संबंधित तक्रारदाराचे समाधान झाले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचा आणि साहित्य साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापर करावा असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सीएसआर सक्षम उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कुत्रिम अवयव व साहित्य वाटप आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सस्टेनेबिलिटी अँन्ड गव्हर्मेंट रिलेशन्स तथा सीएसआर प्रमुख राकेश बावेजा यांच्यासह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) शैक्षणिक समूहातील संस्थेमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी, संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे मत दक्षिण कोरियाच्या क्वांगवून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉ. सुंगवू बेंजामिन चो यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे पीसीईटी येथे कोरियन भाषा केंद्र, अल्प…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मानवी हक्क जागृती संस्था पुणे यांच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थांचा पुणे येथील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन व कला दालन घोले रोड पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मेधा पाटकर व जिल्हा सत्र व न्यायमूर्ती महेंद्र महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर या संस्थेला विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती मेधाताई पाटकर यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाते याचे तोंड भरून कौतुक केले.अशा सामाजिक संस्था निर्माण होणे काळाची गरज आहे…
निवृत्त आयपीएस अब्दुल रहमान व माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समुदायांच्या घटनात्मक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमातीच्या वतीने शुक्रवारी चिंचवड येथे संविधान सुरक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे. चिंचवड येथील मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल, द क्लोअर बँक्वेट हॉल, (डी मार्ट शेजारी) येथे शुक्रवारी (दि.१३ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन निवृत्त आयपीएस अधिकारी जेष्ठ विचारवंत अब्दुर रहमान यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार व संविधान तज्ञ ॲड. जयदेव गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर नॅशनल कॉन्फरन्स…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जागतिक मानवधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती व जाधवर ग्रुप तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहलाल नेहरू घोले रोड येथे जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त जिल्हा सत्र न्यायमूर्ती महेंद्र के.महाजन व जेष्ट समाजसेविका मेधाताई पाटकर, घटना तज्ञ उल्हास बापट यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ,संविधान देऊन *मानवधिकार कार्यकर्ता* पुरस्कार आण्णा जोगदंड यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश महिंद्र के. महाजन म्हणाले की या संस्थेचे काम खूप चांगले आहे. संस्थेच्या कार्याचा अभ्यास करून मी अध्यक्षपद स्वीकारले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने १२ हजार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, यापैकी गुरुवारी पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील २ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. माळीन, फुलवाडे व बोरघर (ता. आंबेगाव) येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या २ हजार विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल, कापडी पिशवी, कॅलेंडर, परीक्षा पॅड, भारताचे संविधान, तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित संच आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, की देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या आठवणींनी उजाळा दिला. जनतेच्या हितासाठी कार्य करणारे आणि पक्षाचे आचार विचार घरोघरी पोहचविणारे लोकनेते म्हणून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांनी आपला ठसा उमटवला. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार भाजपा पदाधिकारी यांनी केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यसभा…
पंडित संजीव अभ्यंकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी, बेला शेंडे, शाहीद परवेझ, पं.राजस उपाध्ये, पं.विजय घाटे यांचा घडणार संगीत आविष्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे. याबाबतची माहिती…
शहर वासियांना या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्याचे शत्रुघ्न काटे यांचे आवाहन पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी रविवारी दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०५ वाजता यशदा रियालिटी ग्रुप,नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने “पिंपरी चिंचवड हाल्फ मॅरेथॉन २०२४” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयोजकांमार्फत हि स्पर्धा यशस्वीरीत्या राबवली जात असून हे या स्पर्धा आयोजनाचे ४ थे वर्ष आहे . सदर मॅरेथॉन ५ किमी ,१० किमी आणि २१ किमी अश्या तीन कॅटेगरी मध्ये घेण्यात येणार आहे . कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पासून ही मॅरेथॉन…
