Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे.तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.ही घटना रात्री बार ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (वय २ वर्षे),रीनेश नितेश पवार,(वय ३० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रविवारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Read More

पेठ क्रमांक बारासह ३०-३२ साठी नागर‍िकांकडून म‍िळाला अपेक्ष‍ित प्रत‍िसाद  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात आले होते. त्यास नागर‍िकांचा अपेक्ष‍ित प्रत‍िसाद म‍िळाला असून जवळपास सव्वा तीन हजार अर्ज अनामत रकमेसह यंत्रणेकडे आले आहे. पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १५ ड‍िसेंबरपर्यंत अर्ज मागव‍िण्यात आले होते. यासाठी…

Read More

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. या मार्गिकेसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे राज्य सरकार सोबत लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत तिसऱ्या आणि चौथा ट्रॅक, लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्रात टनेल निर्माण करणे, कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे आणि तिला देहूरोड येथे थांबा देणे, पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची आणि चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करणारी भारतीय कालगणना विज्ञान आधारित आहे!” असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार आणि आयुर्वेदाचार्य डॉ. अजय अपामार्जने यांनी विश्व हिंदू परिषद कार्यालय, चिंचवड येथे व्यक्त  केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२५ या कार्यक्रमात डॉ. अजय अपामार्जने बोलत होते. विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहसंघटन महामंत्री विनायक देशपांडे, क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विनायक देशपांडे यांनी, “१९७७ – ७८ पासून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू आहे. हिंदू समाजाला जागृत…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षा निमित्त आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथून पुणे येथील कोरेगाव हेलिपॅड वरून संगमनेर येथील बोटा येथे रविवारी ( दि.22 ) हेलिकॉप्टरने हरिनाम गजरात रवाना झाल्या. पुणे ते बोटा या दरम्यान विविध मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि यजमान आदर्श सरपंच जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. देहू येथील श्री संत तुकाराम…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  संचेती हॉस्पिटल येथे शनिवारी पहिल्या जागतिक ध्यान धारणा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ध्यानधारणेचे शास्त्र आणि तंत्र यावर मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी (सरिता राठी) यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी संचेती हॉस्पिटलमधील डिजिटल प्रमुख रूपल संचेती,संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी,वरिष्ठ भूलतज्ञ डॉ.पी.एस.गर्चा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी म्हणाल्या की, मनातील विचारांचे काहूर दूर केल्यावर पुढची दिशा समजू शकते. माझ्यासोबतच असे का घडले असे विचार रूग्णालयात दाखल झालेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मावळ लोकसभा मतदारसंघात किल्ले लोहगड, तिकोना, राजमाची, विसापूर आणि ४०० वर्षे पुरातन घोडेश्वर लेणी आहे. या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. विशेष देखरेख व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घारापुरी लेणीतील शिवमंदिर सोमवारी नागरिकांसाठी खुले ठेवण्यात यावे.  घोरावडेश्वर डोंगर येथे रोप-वे मार्ग निर्माण करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार बारणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री  गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिली. खासदार बारणे म्हणाले, पुणे जिल्हा हा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निवेदन क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, मराठीतील पहिले व्यावसायिक निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सत्कार समारंभ बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.  कलारंजन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रसिद्ध कथकगुरू व संस्कार भारतीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सत्कारानंतर ‘पन्नास वर्षांतील सांस्कृतिक संचित’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील आठवणी, किस्से गाडगीळ यांच्याकडून ऐकायला मिळणार आहेत. सदर कार्यक्रम चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील शाहीर योगेश सभागृहात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – केंद्र सरकारच्या वतीने चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या एसआयएच २०२४ सॉफ्टवेअर स्पर्धेत रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरग अँड रिसर्चच्या टीम डिजिटल डॉकेट्सने सॉफ्टवेअर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. देशातील अग्रमानांकित इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक असणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे (पीसीसीओईआर) मधील टीम डिजिटल डॉकेट्सने महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या जात आणि इतर प्रमाणपत्रे ऑनलाइन जारी करण्यासाठी तात्काळ पडताळणी (रिअल-टाइम मॉनिटरिंग) करावी लागते. त्यासाठी टीम डिजिटल डॉकेट्सने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे सादरीकरण केले. राज्यात दरवर्षी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक विद्यार्थ्यांना महसूल…

Read More