- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीसीसीओइ सेंटर फॉर इनोव्हशन इनक्युबेशन अँड लिंकेजेस फोरमच्या (पीसीसीओइ – सीआयआयएल) यांच्या वतीने “इनोव्हेट-एक्स” ही तीन दिवसीय स्टार्टअप कल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी १५ मार्च रोजी, सकाळी १० वाजता, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पीसीइटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पीसीसीओइचे संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समिती बैठकीत निर्णय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- “क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी समितीच्या वर्षभराच्या उपक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात येईल, तसेच समितीच्या सर्व उपक्रम किंवा कार्यक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केले जाईल. हे धोरण समितीतील सर्व सदस्यांच्या सहमतीने निश्चित करून त्याच आधारे आगामी काळात समितीचे कामकाज आणि विविध कार्यक्रम राबविण्यात येतील’’, अशी माहिती क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे समितीचे…
फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील फेरीवाले मुंबईत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबईतील आझाद मैदान येथे आज महाराष्ट्रातील फेरीवाल्यांनी आपल्या हक्कांसाठी जोरदार एल्गार केला. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. मुंबईसह राज्यातील विविध शहर आणि उपनगरांमधून आलेल्या फेरीवाल्यांनी जोरदार घोषणा देत फेरीवाला कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. आंदोलनामुळे आझाद मैदान परिसर घोषणांनी दणाणून गेला. महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, सरकार एखादा कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी काही दिवसांत परवानगी देते; मात्र सर्वसामान्यांच्या…
नवीन आठ ठिकाणी ‘बॉक्स स्ट्रक्चर’ उभारणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते मामुर्डी या पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी मागणी केलेल्या नवीन आठ ठिकाणी ‘बॉक्स स्ट्रक्चर’ (अंडरपास) उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्याबाबतची तांत्रिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह , किवळे , रावेत, पुनावळे, ताथवडे, आणि वाकड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या भागातील गंभीर वाहतूक समस्या मांडली. वाकड ते मामुर्डी दरम्यान गेल्या काही वर्षांत आयटी पार्क, शैक्षणिक संस्था…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील काळेवाडी-विजयनगर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून नागरिकांना दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी-विजयनगर, पद्मानगर, आदर्शनगर, काळेवाडी स्मशानभूमी परिसर, आश्रयी कॉलनी, सहकार कॉलनी, आजाद कॉलनी, काळेवाडी गावठाण परिसर तसेच ज्योतिबानगर या भागांमध्ये दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक तक्रारी समोर येत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना ताप, उलटी, जुलाब यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका…
यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. १२) त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचणाऱ्या या महान नेतृत्वाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना आवले-डंबे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी केलेली वैचारिक पायाभरणी आणि घालून दिलेली प्रशासकीय शिस्त आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहे.”…
– ‘पीएमआर’मधील उद्योजकांसाठी उपाययोजना करा – ‘पाईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून केली मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योजकांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. इराण, इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्चा माल, इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्टयातील लघु उद्योजक मोठ्या संकटात आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठोस उपायोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. लघु उद्योजकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने विरांगणा महिला महासंघाच्या पुढाकारातून विशेष महिला सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सुमारे ७५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात महिलांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती आणि सहाय्य देण्यात आले. तसेच महिलांसाठी उपयुक्त असलेल्या ई-श्रम कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, मनरेगा योजना, बीओसीडब्ल्यू (BOCW) कामगार कार्ड, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना, आयुष्मान भारत कार्ड,…
पीसीयू मध्ये “अनंतम २०२६” महोत्सवात तरुणाईचा जल्लोष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी, यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये अनंतम सारखे सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात अशा सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यक्त होण्याची संधी मिळते. यातूनच नवीन नेतृत्व, नव संकल्पना आणि आत्मविश्वास विकसित होतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) “अनंतम २०२६” या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या मजुरी तसेच कातकरी समाजाच्या घरकुल योजनांशी संबंधित विविध समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. बैठकीत आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना मजुरी मिळण्यात होणारा विलंब, दुर्गम भागातील अडचणी तसेच कातकरी समाजाच्या घरकुल योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित समस्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस आमदार स्नेहा दुबे, आमदार उमा खापरे, आमदार निरंजन डावखरे तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आदिवासी घरकुल योजनांचा लाभ दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत…
