Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आण‍ि पेठ क्रमांक ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात आले होते. यासंबंधी पात्र आण‍ि अपात्र ठरलेल्या अर्जाची प्रारुप यादी बुधवारी (दि.१ जानेवारी रोजी) पीएमआरडीएच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर ७ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्र. १२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गामधील ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिकांचा समावेश आहे. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी १५ ड‍िसेंबर २०२४ पर्यंत अर्ज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खेळ ज्याप्रमाणे खेळाडूंना शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना शिकवते त्याचप्रमाणे चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्म-अभिव्यक्तींना प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांना वाव देण्यासाठी वेळोवेळी मंच उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, त्यातून उद्याचे कलाकार उदयास येतात, असे मत उपआयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या  क्रीडा विभागाच्या वतीने २ जानेवारी २०२५ रोजी निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान (दुर्गादेवी टेकडी) येथे शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे  उद्घाटन उपआयुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी,…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डुडी हे 2016 च्या बॅचचे सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. ते मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. त्यांची सुरुवातीला झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव म्हणूनही काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे. ते सध्या सातारा येथे जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते. त्यांच्या पत्नी पोलिस दलात आयपीएस अधिकारी आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – आगामी महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर निर्विवाद वर्चस्व होते. भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. आता अजित पवार हेच महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र की स्वबळावर लढणार याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर भाजपने पडदा टाकला आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये रांगोळी प्रदर्शन, मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन, उत्कृष्ट बचतगट आणि स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, एकपात्री नाट्यप्रयोग, शाहिरीचा भव्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसंवाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा…

Read More

…अन सभागृहात अवतरल्या शेकडो सावित्रीबाई! पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – महात्मा फुलें, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रीनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री-ज्योति यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी झाले. अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री-ज्योतिचा जागर अशा स्वरूपात शेकडो महिला सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरल्या! डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून आयोजक महात्मा फुलेंच्या पेहरावात आल्याने सभागृहात जणू सावित्रीबाई, ज्योतिराव आल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती. भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील आयसीयु व एनआयसीयु बेडची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अर्थातच रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली (ICU) अतिदक्षता बेड कमी पडत असल्यामुळे रुग्णांना वेटिंग वर ठेवले जात आहे. परिणामी सिरीयस असलेल्या रुग्णांना लवकर ICU मधील उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवाने रुग्ण दगावले जातात . महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फक्त पिंपरी चिंचवड हद्दीतील रुग्ण असतातच परंतु आसपासच्या व बाहेर गावाहून देखील रुग्ण येत असतात.…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपळे सौदागर परिसरात याही वर्षी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सन २०२५ चे स्वागत २०२५ रोप वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच , भारतीय स्त्री शिक्षणाचा अधिकार जागृत करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ०१ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या वर्धापनदिनाचे औचित्य देखील या रोप वाटपाला होते. पिंपळे सौदागर येथील स्व.बाळासाहेब कुंजीर मैदान , शिवार चौक , कोकणे चौक , गोविंद यशोदा चौक या ठिकाणी नागरिकांना रोप वाटप करण्यात आले. नवीन वर्षाच्या प्रसन्न सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी रोप घेत , नव्या वर्षाचा…

Read More

उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ हजार ६९२ तरुणांना मिळाली संधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस यांच्या माध्यमातून कौशल्यम उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून वर्ष २०२४-२५ मध्ये डिसेंबरपर्यंत १ हजार २०४ युवकांना रोजगार मिळाला आहे. कौशल्यम उपक्रमाची सुरुवात २०२१ मध्ये झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ७५ टक्के रोजगार संधीमध्ये वाढ झाली आहे. या अंतर्गत ३ हजार ६९२ युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी २ हजार ७५५ युवकांना रोजगार मिळाला आहे. शहरातील ११ केंद्रांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमात रिटेल, आयटी, आरोग्यसेवा (हेल्थकेअर), उत्पादन व्यवसाय (मॅन्युफॅक्चरिंग) आणि क्रिएटिव्ह…

Read More

आदिवासी क्रांतीकारकांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आदिवासी समाजाला संविधानात्मक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी समाजाचे मजबूत संघटन होणे आवश्यक आहे. तसेच समाजातील तरुण-तरुणींनी पारंपरिक उत्पन्नाचे स्त्रोत, आपली संस्कृती याची जपवणूक करून उच्च शिक्षणाचा मार्ग अवलंबून त्यातून नवीन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे तरच आदिवासींचा विकास होईल असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे कायदेशीर लढा लढणारे अभ्यासक डॉ. संजय दाभाडे यांनी केले. धानोरी, येथे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आदिवासी क्रांतिकारक संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण भालचीम यांच्या हस्ते आदिवासी…

Read More