- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– आयुक्त शेखर सिंह, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे आता ‘सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका प्रशासन अधिकारी तथा आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता आणि खबरदारीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवन येथे आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, पर्यावरण विभागाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेची नुकतीच पुणे परिमंडळ कार्यकारणी जाहीर झाली. सेनेचे अध्यक्ष राजन भाई भानुशाली यांच्या मंजुरीने व सरचिटणीस मधुकर सुरवाडे यांच्या स्वाक्षरीने परिमंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मनोहर तुकाराम शिंदे, उपाध्यक्षपदी मनोज सैदाने, सचिवपदी गणेश जाधव, सहसचिवपदी दीपक कुलकर्णी, खजिनदारपदी राहुल गाडे, संघटकपदी सुधीर बालवडकर यांची नियक्ती करण्यात आली आहे. संघटना व व्यवस्थापन यांच्यामधील दुवा म्हणून नूतन कार्यकारिणीने काम करावे. वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांच्या समस्या मार्गी लावण्यात पुढाकार घ्यावा, अशी माहिती अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष रमाकांत सौंदणकर यांनी दिली. तसेच नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन देखील केले.
क्विक हील प्रमुख अनुपमा काटकर यांचं आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय व क्वीक हील यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा नागरिकांसाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शिक्षा फार सायबर सुरक्षा या अभियानात प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहर, रुपीनगर , तळवडे, लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालयात, भाजी मंडई, बस स्थानके येथे जाऊन सुरक्षेबाबत लोकांना, विद्यार्थीना जनजागृती व मार्गदर्शन केले. या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी विद्यार्थामधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 12 विद्यार्थ्यांचा क्वीक हील फाउंडेशनच्या प्रमुख अनुपमा काटकर, संस्थेचे मुख्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर कागदविरहत कार्यालयीन कामकाजाला प्रोत्साहन मिळणार असून प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यास आणि विभागांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाजात अधिक सुसूत्रता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे दस्तऐवज हाताळण्याच्या प्रक्रियेतील गती, अचूकता, पारदर्शकता आणि सुरक्षा देखील वाढणार आहे, असे मत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि ई-ऑफिस या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रशासनामध्ये कागदविरहीत कामकाजाचा समावेश करण्याचे ध्येय ठेवले आहे. या अनुषंगाने कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना आज दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम – डीएमएस) चे प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. सांगवी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याबाबत पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेच्या विद्रुपीकरणास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून नुकतेच पिंपरीतील रिक्षा चालकाने आत्महत्या केली. या रिक्षा चालक मृत्युप्रकरणी फेर जबाब नोंदवून आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. यावेळी राजू राजभर यांच्या कुटुंबासमवेत त्यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. तसेच या प्रकरणी फेरजबाब नोंदवून आरोपींना ताबडतोब अटक करावे, अशी मागणी केली आहे. राजू राजभर प्रकरणी संबंधित आरोपींवर योग्य कलमाअंतर्गत कारवाई करून कठोर शासन करावे. त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची मागणी आहे, असे बाबा कांबळे म्हणाले. तसेच पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना त्यांनी या बाबत निवेदन देऊन मागणी केली.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -“अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर नैतिक जबाबदारीने करावा; तसेच राजकीय नेत्यांनी आपली भाषा सुधारली पाहिजे!” अशी अपेक्षा लोकसंस्कृतीचे भाष्यकार प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी मोशी येथे रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. सदानंद मोरे यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. संदीप तापकीर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना डॉ. मोरे सरांनी दिलखुलास उत्तरे दिलीत. आई शिक्षिका आणि वडील प्रसिद्ध कीर्तनकार अन् प्रवचनकार असल्याने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (पेन्शन) लागू करण्यासह विविध विषयांस प्रशासक शेखर सिंह यांनी यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. १० मध्ये…
पीसीईटी शैक्षणिक समूहातील विद्यार्थी – प्राध्यापकांना मिळणार उच्च शैक्षणिक संधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एनझेडबीसीसीआय) यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारामुळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संशोधन, इंटर्नशिप याबरोबरच न्युझीलंड मधील पर्यटन आणि आर्थिक विकास अभ्यासाची संधी मिळाली आहे. तसेच एनझेडबीसीसीआयच्या भविष्यातील प्रकल्प, आंतरराष्ट्रीय योजनांमध्ये पीसीईटीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना सहभागी होता येईल. यामुळे रोजगारभिमुख शैक्षणिक प्रगतीला तसेच युवा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वृद्धीसाठी चालना मिळेल, असे प्रतिपादन न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष महेश बिंद्रा यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी),…
कामातील सर्व अडथळे झाले दूर, मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतलेले पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपूल बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. या उड्डाणपुलाचे सबस्ट्रक्चर चे काम ८०% पूर्ण झाले आहे उर्वरित २०% काम हे रेल्वे विभागाशी सलग्न आहे.सुपर स्ट्रक्चर चे २५% पूर्ण झाले असून मार्च अखेर पर्यंत ५५% काम पूर्ण होणार आहे. तसेच रस्त्याचे काम ६० % झाले असून उड्डाणपुल व रस्त्याचे उर्वरित काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून हा उड्डाणंपूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे कामाबाबत कार्यादेश मार्च २०२३ मध्ये देण्यात…
