- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत मौजे वाकड दत्त मंदिर रोड येथील परिसरात असलेल्या ४५ मी. रस्ता रुंदीकरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अनधिकृत पत्र्याच्या शेड व आर.सी.सी. बांधकाम असे एकुण ७९ व्यावसायिकांना दि. १४/०८/२०२४ पासुन नोटिसा बजविण्यात आल्या होत्या. ज्या जागामालकांनी नोटिस स्विकारल्या नाहित त्या नोटीसा रितसर डकविणेत आल्या. दि.०३/०१/२०२५ पासुन अतिक्रमण वाहनामधुन अनधिकृत बांधकाम व पत्राशेड काढून घेणेबाबत जाहीर आवाहन करण्यात आले, यामध्ये दि.०६/०१/२०२५ पासुन रस्ता रुंदिकरणाचे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रत्येक दिवशी सुचीत करण्यात आले. दि.०६/०१/२०२५ पासुन कारवाईला सुरुवात करण्यात येऊन पहिल्या दिवशी अंदाजे ७० पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. यामध्ये बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांचा समावेश आहे. आता एक लाखाहून जास्त रकमेच्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश संबंधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना दिला आहे. एक लाखापेक्षा अधिक रक्कम थकबाकी असणाऱ्या आस्थापनांची यादी करसंकलन विभागाने तयार केली आहे. ती यादी संबंधित विभागीय कार्यालयांना पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे. थकबाकीदारांच्या आस्थापनांबाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. या मालमत्तांवर चालू स्थितीमध्येही जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाने दिले आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील आरोग्य संवर्गामधील सर्व जाती-प्रवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यास उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश होता. त्यावरील स्थगिती बुधवारी (ता. ८) उठविण्यात आली. त्यामुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वारस नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महापालिका- नगरपालिका- नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे यांनी दिली. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील आरोग्य संवर्गामधील सर्व जाती-प्रवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्तीचा निर्णय २४ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वारस नियुक्तीस स्थगिती…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त अभीष्टचिंतनसोहळ्याचे आयोजन संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखालील संध्याकाळी चार वाजता संपन्न होणार्या या सोहळ्याचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे यांची प्रमुख अतिथी…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “गड किल्ले यांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे!” असे विचार निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘दुर्ग भटकंती : जिंजी, वेल्लोर, तंजावर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. माधवराव सानप बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, पिंपरी – चिंचवड महापालिका विज्ञान केंद्र संचालक प्रवीण तुपे, संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, परिषदेचे…
विश्वबंधुता लोकचळवळीच्या प्रेरणाशिल्पाचे लोकार्पण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “बहुधर्मीय, बहुजातीय, बहुप्रांतीय, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्षवादी राष्ट्र अशी आपल्या देशाची ओळख आहे, तर समाजसुधारकांच्या पुरोगामी आणि परिवर्तनशील सामाजिक विचारसरणीचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. ही ओळख अधिक दृढ करण्यामध्ये विश्वबंधुता लोकचळवळीचे योगदान अधिक मोलाचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांनी केले. पिंपळे गुरव येथील बंधुता भवनमध्ये साई प्रिंटर्सचे संचालक विश्वास राजवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या प्रेरणाशिल्पाचे लोकार्पण प्रा. शंकर आथरे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, लेखिका मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी गावठाण, साईनाथनगर, यमुनानगर, सेक्टर 22 या भागात पाणीपुरवठा 24 तास चालू करण्यात यावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्त यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग क्रमांक १३ निगडी , यमुनानगर, साईनाथ नगर , सेक्टर 22 , या भागामध्ये 2017 ते 2022 या कालावधीमध्ये 24 /7 सर्वे अंतर्गत अनेक ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकण्यात आल्या व जीर्ण जुन्या झालेल्या पाईपलाईन काढून टाकण्यात आल्या, प्रभागात काही ठिकाणी अजूनही 24/7 अंतर्गत पाईपलाईन टाकलेल्या नाहीत, त्या टाकण्याची अत्यंत गरज आहे. त्याचे परीक्षण व पाहणी करण्यासाठी A/2 झोन हा त्वरित 24/7 पाणीपुरवठा…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाची विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तीन तज्ज्ञ सदस्य मुल्यमापन आणि मान्यता समिती ने तपासणी केली आणि त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व निकषांच्या आधारावर ” ब ” दर्जा दिला आहे. महाविद्यालयाची स्थापना संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१० मध्ये केली.१२ विद्यार्थ्यांच्या पासून सुरु झालेल्या या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त बी ए, बी कॉम, एम ए,एम कॉम,एम बी ए,या अभ्यासक्रमामध्ये एकुण ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या नॅक मानांकन मुळे…
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत कामगार मंत्र्यांची आढावा बैठकीत दिले आस्वासन मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. मंत्रालयात मुंबई येथे दि.७जाने 2025 रोजी मा कामगार मंत्री ना अँड.आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिले आहे , त्यावेळी मंत्री ना फुंडकर बोलत होते. यावेळीभारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मुंबई व नवी मुंबई परिसर उपनगरातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये पथ विक्रेता कायद्याचे अंमलबजावणी व्हावी , कारवाई थांबवावी या मागणीसाठी मुंबई आणि इतर परिसरातील पथ फेरीवाल्यांनी वेगवेगळ्या महापालिका आणि नगरपालिका कार्यालयावर एकाच दिवशी दहा ठिकाणी तीव्र लक्षणीय मोर्चे काढण्यात आले. यावेळी विविध आयुक्त ,अधिकारी, कर्मचारी यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, कामगार एकता युनियन,शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयटक सह विविध संघटनांनी या मोर्चाचे आयोजन करत यशस्वी केले. यात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, कोकण विभाग यासह विविध क्षत्रिय कार्यालयावर हे मोर्चे…
