Author: maharashtrabreakingnews.com

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात काही आर्किटेक आणि मध्यस्थी व्यक्ती नागरिकांना परस्पर भेटून तुमची कामे आम्ही करून देतो असे सांगून दिशाभूल करत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली कामे थेट संबंधित विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात येत आहे. पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत असतात. यात प्रामुख्याने बांधकाम परवानगी, जमीन मालमत्ता आणि अनधिकृत बांधकाम विभागासह इतर ठिकाणी नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात. मात्र काही आर्किटेक, अन्य मध्यस्थी व्यक्ती जागा मालकाला परस्पर गाठून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून त्यापोटी आर्थिक मागणी करत…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या एनएच-४८ महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) विकास करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय प्रकल्प हाती घेत आहे. हा प्रकल्प वाढत्या वाहतूक समस्यांचे निराकरण करण्यासोबतच कनेक्टिव्हिटी सुधारणे, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करणे आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या या रस्त्यावरील शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील एनएच-४८ महामार्गाच्या बाजुने असणारा सध्याचा रस्ता १२ मीटर रुंद आहे. आता या रस्त्याचा १२ मीटर विस्तार करून एकूण रुंदी २४ मीटर करण्यात येणार आहे. एनएच-४८ हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने पुनावळे, भूमकर चौक, हिंजवडी…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व वाहतूक शाखा पुणे लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने 50 महिलांसाठी व 50 पुरुषांसाठी असे एकूण शंभर हेल्मेट वाटण्यात आले. बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे ठिकाण बाटा शोरूम पुणे कॅम्प येथे संपन्न झाले.कार्यक्रमाचे आयोजन मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल मोदीखाना पुणे कॅम्प यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी व रस्ता सुरक्षा प्रबोधन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने माननीय जयवंत पोळ, मोटार वाहन निरीक्षक पुणे व राणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने व प्रामाणिकपणाने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या लौकिकात भर पडली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे माहे जानेवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण २० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या कार्यक्रमास जनता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी, 11.30 वाजता करसंवादाचे ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.            नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात येईल. यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनेल व सोशल मीडियावर अकाऊंटवर आपले प्रश्न विचारून आपल्या शंकाचे तात्काळ निरसन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. कोट – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याचे विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. सध्या…

Read More

  ‘एमआयटी डब्लूपीयू’ला स्पर्धेत दुसरे तर स.प. महाविद्यालयाला तिसरे स्थान पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२५ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल १४ सुवर्ण व १८ रौप्यपदकांसह पदकतालिकेतील वर्चस्वासह आपले विजेतेपद राखले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण ११ सुवर्ण व ६ रौप्य पदकांसह दुसरा तर सर परशूराम महाविद्यालय (स.प.) संघाने ६ सुवर्ण व ३ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. एमआयटी एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही वर्चस्व गाजविताना विजेतेपद पटकाविले होते. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत १४०+ अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह…

Read More

पिंपरी,   (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  देशभरातील सर्वोत्तम तरुण प्रतिभावंतांना नावीन्यता आणि त्यांच्या कौशल्याचे स्पर्धात्मक सादरीकरण करण्यासाठी रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च मधील रोबोहॉक क्लबद्वारे “राष्ट्रीय रोबोराष्ट्र २के२५” टेक फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे सोमवारी (दि.३ फेब्रुवारी) ही स्पर्धा केले आहे. या स्पर्धेत यंत्रोउत्सव, रेस्क्यू ऑलिंपिक्स या दोन विभागात होईल. यात नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय रोबोटिक प्रोजेक्ट्स सादर  करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगचा उपयोग करून समस्यांचे निराकरण कसे करता  येईल हे दाखवले जाईल. रेस्क्यू चॅलेंजवर आधारित ही स्पर्धा आहे, ज्यामध्ये  स्पर्धकांना त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करायचे आहे. संघांचे सहकार्य, रणनीती, आणि नवकल्पनांची चाचणी घेतली जाईल. या स्पर्धेसाठी देशभरातून  ९० पेक्षा जास्त संघ आणि आणि ३०० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.   पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, मित्सुबिशी इलेक्ट्रिकचे जनरल मॅनेजर सुनील  मेहता आणि सहाय्यक जनरल मॅनेजर राजेंद्र महाजन, पीसीईटीचे उपाध्यक्ष  पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -” स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग महत्वाचा होता. त्यांनी क्रांतीकारकांना विविध प्रकारे मदत करत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागृत ठेवले. सावरकरांचे विचार, वकृत्व , लेखनी आणि विरश्रीपूर्ण काव्य यांच्या मधून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली . म्हणून सावरकर हे क्रांतीकारकांचे मेरूमणी होते.” असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक अँड. अरविंद वाडकर यांनी केले. शिवतेजनगर येथील शिवतेज मित्र मंडळाने गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या शिवतेज व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना “स्वा. सावरकर यांचे स्वातंत्र्या साठी योगदान” या विषयावर ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते बालाजी कानवटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे , साहित्यिक राज अहेरराव, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गंगावणे, बाबा भोजकर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गुलियन बॅरो सिंड्रोमची (जीबी सिंड्रोम) लागण झालेल्या पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय व्यक्तीचा संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला जीबी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यांची नर्व कंडक्शन चाचणी २२ जानेवारीला सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली होती. यापूर्वी जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीचे वाहन चालवत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास व गिळता येत नसल्याने २१ जानेवारीला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दाखल करतेवेळी या रुग्णाला न्यूमोनिया असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. जीबीएसची लक्षणे दिसत  असल्याने वैद्यकीय…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून दिनेश यादव यांच्या कामगिरीची दखल चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्यता नोंदणीस चिखली-कुदळवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजयुमो शहर सरचिटणीस दिनेश यादव यांच्या प्रयत्नातून या संघटन पर्वात तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक सदस्यता नोंदणी करण्यात आली. या कामगिरीची दखल थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. दोन हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल दिनेश यादव यांना बावनकुळे यांनी पत्र पाठवून त्यांचे विशेष कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. लोकांप्रती असलेले बांधिलकी आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या कार्यातून अधोरेखित होत असल्याचे मत त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. संघटन पर्वात…

Read More