Author: maharashtrabreakingnews.com

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत महत्त्वाची माहिती कृष्णा नदीवर ‘कायमस्वरूपी बंधारा’ कधी बांधणार? आमदार अमित गोरखे यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न; जलसंपदा मंत्र्यांनी दिली ‘बॅरेज’ उभारण्याची ग्वाही पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर, तांबवे आणि परिसरातील १०-१२ गावांतील शेतकऱ्यांचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला सिंचनाचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे लावून धरला. आमदार गोरखे यांच्या प्रश्नाची दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या भागात कृष्णा नदीवर कायमस्वरूपी ‘बॅरेज’ उभारण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली. आमदार अमित गोरखे यांची भूमिका आमदार अमित गोरखे यांनी आपल्या प्रश्नातून मसूर परिसरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा…

Read More

८०० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात दि. १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८०० कोटी ८४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर…

Read More

सणाच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा; गुढीपाडवा व रामनवमीला मालमत्ता कर भरण्यासाठी कार्यालय राहणार खुले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू असून नागरिकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून या पार्श्वभूमीवर कर वसुलीला गती देण्यात येत आहे. नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे…

Read More

कार्यक्रमास महिला नगरसदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती समाज विकास विभागाच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते. त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते आणि माजी आमदार…

Read More

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात विकासकामांचा सखोल आढावा; नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज ) – प्रत्येक प्रभागातील नगरसदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांशी सातत्याने समन्वय राखत स्थानिक अडचणींची अचूक नोंद घेऊन त्या तत्परतेने व परिणामकारक पद्धतीने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या. नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर वेळेत कार्यवाही करणे गरजेचे असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट केल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल, असेही महापौर रवि लांडगे यांनी नमूद केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथे नागरी सुविधांबाबत आढावा…

Read More

आमदार शंकर जगताप यांची अन्नपुरवठा परिमंडल अधिकाऱ्यांसोबत बैठक पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )-  आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवून अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. “शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस टंचाई असल्याच्या चर्चांमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. काही ठिकाणी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने शहरात…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतातील घरगुती इंधन पुरवठ्यावर होऊ लागला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यभरात देखील आयात विस्कळीत झाल्यामुळे बाजारपेठेत गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, विशेषतः हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना लागणारा पाच किलोचा छोटा सिलिंडरही मिळेनासा झाला आहे. या संकटकाळात गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने रेशन कार्डावर दोन ते तीन लिटर रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्यात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, ‘सध्याच्या जागतिक तणावामुळे एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठा साखळीवर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण, स्थापत्य आणि विद्युत कामांच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेना उपनेत्या, नगरसेविका, स्थायी समिती सदस्या  सुलभा रामभाऊ उबाळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांना निवेदन देऊन सदर निविदा रद्द करून फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांच्या स्मारकाचे काम अत्यंत पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या निविदेत अनेक संशयास्पद बाबी आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील झुलेलाल मंदिरात सिंधी समाजाच्या वतीने शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सिंधी समाजातील महत्त्वाचा मानला जाणारा जनऊ संस्कार सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे दहा मुलांवर जनऊ संस्कार विधी करण्यात आला. विशेष म्हणजे हा संस्कार पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. यावेळी होम-हवन, भजन आणि कीर्तन यांचेही आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य हेमंतपुरी महाराज यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सुमारे चार ते पाच हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, विद्युत देखभाल, सीसीटीव्ही यंत्रणांची दुरुस्ती तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांना येणाऱ्या खर्चास आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित विषयांवर चर्चा करून त्यांना मान्यता देण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक-२…

Read More