- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत आणखी दोन उपकेंद्रांनी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. पिंपरी विभागातील गणेशम् स्विचिंग स्टेशन व म्हाडा उपकेंद्राने मानांकनाचे निकष पूर्ण केल्याबद्द्ल मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक श्री. नंदकुमार देशमुख यांच्याहस्ते या उपकेंद्रांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आतापर्यंत पुणे परिमंडलातील नऊ उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविले आहे. मोरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात या दोन्ही उपकेंद्रांना ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांची उपस्थिती होती. ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंते दिवाकर देशमुख, भुजंग बाबर, विश्वास भोसले, नितीन गायकवाड, सहायक…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथे महानगरपालिकेच्या वतीने वाहन-मुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिंपरी मार्केटमधील संपूर्ण रस्ते दोन दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामधील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्रामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील, प्रतिनिधी डब्बू आसवानी, मराठी अभिनेते अभिज्ञा भावे, दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी नीरज चावला, पुरुषोत्तम बोधवानी तसेच शहरविकास तज्ज्ञ प्रसन्न देसाई, आशिक जैन यांच्यासह स्थानिक दुकानदार व नागरिकांशी चर्चा केली. यामध्ये दुकानदार संघटनांनी महापालिकेच्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कर्करोग , ट्युमर, हाडांचे गंभीर आजाराचे देशभरात निदान रुग्णावर वेळेवर न झाल्यामुळे अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येते. योग्य वेळीच रुग्णांनी तपासणी केली तर तज्ञ डॉक्टरांना योग्य उपचार पद्धती ठरविण्यास मदत होते. शरीराच्या विशिष्ट भागाची बायोस्पी झाल्यानंतर त्यात कर्करोग निदान झाले तर, पुढील टप्प्यात उपचारासाठी पेट ( पीईटी ) स्कॅन अनिवार्य ठरतो. रुग्णांचे अचूक निदान आणि त्वरित उपचारासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असते . म्हणूनच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्करोग, ट्युमर, हाडांचे गंभीर आजारापासून शहरवासीयांना वेळीच त्वरित निदान व्हावे , तज्ञ डॉक्टराकरवी उपचार मिळावे ,यासाठी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ शैलेश शर्मा , डॉ…
महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही ! आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पावरती मांडले मत ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची बचत,राज्यात “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना. नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर-इनोव्हेशन सिटी.मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे. तिच्या सक्षमीकरणासाठी तिचा स्वतःवर विश्वास हवा. नवीन कायद्याची माहिती झाल्यास आजची आधुनिक स्त्री अधिक सक्षम होईल असे मत पुणे, शिवाजीनगर न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) अमृत बिराजदार यांनी व्यक्त केले. पीसीइटी एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पीसीयू मधील स्कूल ऑफ लॉ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त “लिंग आधारित हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नवीन गुन्हेगारी कायद्याद्वारे महिला सक्षमीकरण” या विषयावर आयोजित केलेल्या “पीसीयू लेक्स इम्पेरियम २०२५” या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी परिषदेस कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. दुर्गा दत्त, त्रयमा लीगलचे संस्थापक ललित कुमार झुंझुनवाला,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रीडा क्षेत्रासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य, एकाग्रता, ध्येय निश्चिती आणि समर्पण भावनेने दिलेले शंभर टक्के योगदान या चतुसूत्रीचा वापर करावा असा गुरु मंत्र खो-खो चे राष्ट्रिय प्रशिक्षक अरविंद करवंदे यांनी दिला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भारतीय खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा खुडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान विभागाचे योगेश वाळुंज, रेडिओ जाॅकी अक्षय, पीसीबीच्या प्राचार्य डॉ. विद्या बॅकोड, पीसीईटीचे सोशल मीडिया प्रमुख डॉ. केतन देसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंतन आणि साधनेचे महत्त्व सांगणाऱ्या काळ सारावा चिंतने.. एकांतवासी गंगास्नाने.. या अभंगावर ह.भ.प. सागर महाराज शिर्के यांचे सोहळ्यातील दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कीर्तन झाले. काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥ देह समर्पीजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जग्दगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे सांगत ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी संत तुकाराम महाराजांचे चरित्र कथा स्वरूपात मांडले. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये रोज दुपारी संत तुकाराम महाराज चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे प्रमुख आयोजक हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महाराष्ट्र शासनाचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी त्यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारच्या धोरणांचे विश्लेषण केले. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या भविष्याचा रोडमॅप पहायला मिळतो, असेही ते म्हणाले. औद्योगिक प्रगती, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्राचा विकास आणि सामाजिक कल्याण या चार स्तंभांवर राज्याचा अर्थसंकल्प उभा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख विचारांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचे नमूद केले. उद्योग व रोजगार: शंकर जगताप यांनी नमूद…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ठाम भूमिका घेत मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या लेखी मागणीनुसार ही बैठक मंत्रालयात पार पडली. आमदार शंकर जगताप यांनी मुळशी धरणातून महानगरपालिकेसाठी पाणी आरक्षित करण्याची गरज अधोरेखित करत ठोस भूमिका मांडली. या वेळी आमदार महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, पाटबंधारे विभागाचे…
