- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे. या पेजवरून चुकीचा संदेश, पैशांची मागणी झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन बारणे यांनी केले आहे. एखाद्याचे फेसबुक अकाऊंट, पेज हॅक करून नंतर मित्र परिवाराला पैसे मागण्याच्या घटना अनेकदा घडतात. सुपरीचीत व्यक्तींचे फोटो वापरून त्यांचे बनावाट खाते तयार करण्याचे प्रकार अलिकडच्या काळात सातत्याने समोर येत आहेत. या हॅकींगचा फटका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना बसला आहे. खासदार बारणे यांचे फेसबुकवर Shrirang Appa Barne या नावाने पेज आहे. हे पेज हॅक करण्यात आले…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शब्दरंग’ हा कलेतील सर्व रंग एकत्रित करणारा साहित्य कट्टा आहे!’ असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्त्या स्वाती देशपांडे यांनी मनोहर निगडी काढले. शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेच्या चवथ्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती देशपांडे बोलत होत्या. शब्दरंगच्या अध्यक्षा ज्योती कानेटकर, प्रियंका आचार्य, चंद्रशेखर जोशी, सुभाष भंडारे, आनंद मुळूक, अशोक अडावदकर यांची व्यासपीठावर तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, सामाजिक कार्यकर्त्या सरिता साने, बाळा शिंदे, नागेश चव्हाण, सतीश सगदेव, रमेश वाकनीस, सुरेश भंडारे आदी मान्यवरांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नटराज पूजन आणि गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्योती कानेटकर यांनी…
अभियानाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेबाबत जागरुकतेचा संदेश देहू,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी श्रीक्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत आज सकाळी ६ ते ८ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीतअवघ्या दोन तासांत श्रीक्षेत्र देहू परिसर , मंदिर परिसर,ईंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता. श्रीसदस्यांनी सुमारे १६ टन कचऱ्याचे संकलन केले. यामध्ये २ टन ओला कचरा आणि १४ टन सुका कचरा संकलित करण्यात आला. यावेळी गाथा मंदिर ते मुख्य कमानपर्यंत दुतर्फा रस्त्याची व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. भारताचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथे नुकताच मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यातील प्रशिक्षणार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाची अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चाळीस सदस्य सहभागी झाले होते. इतिहास संशोधक मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच याठिकाणी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधने, विविध राजसत्तांची पत्रे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख आणि मोडीतील कागदपत्रांची माहिती आणि महत्त्व विषद केले. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना होऊन ११५ वर्षे झाली आहेत. केवळ मराठ्यांच्याच नव्हे तर भारतीय इतिहासातील अनेक दुर्मिळ अभ्यासाची साधने याठिकाणी अभ्यासकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. इंद्रायणी साहित्य परिषदेचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रावेत आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोस्टर मेकिंग, निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धांचा बक्षी वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड मधील विविध महाविद्यालयांतील ११० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित पाहुणे डॉ. आबासाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. स्मृती पाठक, कार्यक्रम समन्वयक प्रा. देवेंद्र देसाई, प्रा. सुप्रिया कुलकर्णी आणि एस. बी. पाटील सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रावेतचे प्राचार्य संदीप पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोस्टर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुवर्णा शिंदे,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थिनींचा आणि समाजातील वंचित घटकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निर्भय कन्या अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले पाहिजे. यामुळे महिलांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्या सक्षम नागरिक म्हणून काम करतील, हाच निर्भय कन्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे असे एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने एसबीपीआयएम येथे “निर्भय कन्या अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ संबंध व्यवस्थापक दिपाली महाजन, सह प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. रूपाली कुदरे आदी उपस्थित होते. पहिल्या सत्रात…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना पुन्हा क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२५ (वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली आहे. संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयडी या तीनच संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे. या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शाहीर परिषद व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा बालशाहीर पुरस्कार व महिला शाहिर पुरस्कार नुकताच संत तुकाराम मंदीर,संत तुकाराम नगर, पिंपरी येथे बाल शाहीर आदित्य चव्हाण ,बालशाहीर अनिकेत कांबळे,बालशाहीर कु.आदिती फिसके,महिला शाहीर सौ.संगिता आव्हाड याना उद्योजक श्री. दीनानाथ जोशी यांच्या हस्ते देण्यात आला युवाशाहीर सिद्धी कापसीकर हिने हारमोनियम वादन करून जागतीक स्तरावर नोंद केली त्या बद्दल तिची आई शाहीर शीतल कापसीकर यांना विशेष सन्मानित केले. या प्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषदचे अध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. नंदु कदम, संजीवनी महिला शाहिरी पथकच्या अध्यक्ष सौ. वनिता मोहिते,,…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाची कारवाई पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात हवा प्रदूषणाची पातळी वाढली असून, ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, वाकड परिसरात हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या दोन आरएमसी प्लँट चालकांना नोटीस बजावली आहे. तसेच, संबंधित प्लँक कायमस्वरुपी बंद करण्याचा इशारा दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील हवा प्रदूषणाच्या मुद्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना आमदार महेश लांडगे यांनी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी वाकड-ताथवडे- पुनावळे आणि हिंजवडी परिसरातील आयटीएन्सनी हवा प्रदूषणाच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सजीवांसाठी धोकादायक पातळीजवळ आहे. याबाबत महानगरपालिकेच्या पथकाने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील ओढ्यात अनधिकृत पद्धतीने सांडपाणी सोडले जात असल्याने ओढ्याचे पाणी दूषित होत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, साथीचे आजार आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या गांभीर्याची दखल घेत युवा नेते श्री. विशाल भाऊ वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुचिता पानसरे यांना पत्र देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. श्री. वाकडकर यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, वाकड येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळले जात असल्याने भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबळ वस्ती, सौंदर्या गार्डन दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात ओढ्याचे पाणीप्रदूषण वाढत आहे. परिणामी,…
