पिंपरी चिंचवड कॉलेज आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स रावेत येथे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रावेत आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोस्टर मेकिंग, निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धांचा बक्षी वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड मधील विविध महाविद्यालयांतील ११० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित पाहुणे डॉ. आबासाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. स्मृती पाठक, कार्यक्रम समन्वयक प्रा. देवेंद्र देसाई, प्रा. सुप्रिया कुलकर्णी आणि एस. बी. पाटील सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रावेतचे प्राचार्य संदीप पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोस्टर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुवर्णा शिंदे, अश्विनी साळवे, निबंध लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. शेळके, प्रा. अमृता दीक्षित आणि वकृत्व स्पर्धेसाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. रोहित वरवंडकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रा. इशप्रीत कौर, सूत्रसंचालन प्रा. देवेंद्र देसाई व आभार प्रा. सुषमा पिंपळखरे यांनी मानले.
विजेत्यां विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, रोख बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखेचे सहकार्य मिळाले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.






