Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी या शाळेच्या १९८० – ८१ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थी स्नेहमेळावा आणि शिक्षक सन्मान या कार्यक्रमाचे रूपांतर नकळत दहावीच्या वर्गात झाले आणि तत्कालीन शिक्षकांसह सर्व माजी विद्यार्थी तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रममाण झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते अध्यक्षस्थानी होते; तसेच सुभाष कुलकर्णी, बाळकृष्ण घोरपडे, विजय दीक्षित, सुभाष गाडोते, विद्यमान प्राचार्य पी. डी. पाबळे, संस्था सचिव सुभाष जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद आणि संस्थापक जयवंत जगताप यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी लोक संस्कृतीचा कलाविष्कार पाहण्याची संधी मिळाली. हा ठेवा अनुभवणे म्हणजे सामाजिक परंपरा, संस्कृतीचे जतन करणे देशाच्या ऐक्यासाठी नितांत गरजेचे आहे हे स्पष्ट झाले. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची भूमिका महत्त्वाची होती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओरिसा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सवाचा शनिवारी (२२ मार्च) प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांना संधी दिल्यास त्या राष्ट्रपतीपदाची देखील जबाबदारी सांभाळू शकतात. सुनीता विल्यम सारख्या अंतराळवीर आपल्या जिद्द व चिकाटीने जागतिक रेकॉर्ड देखील करू शकतात. अशा महिलांना योग्य संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. विश्वभारतीय संस्थेने जुही मेळाव्याच्या माध्यमातून महिला साहित्यिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. असे उपक्रम गौरवास्पद आहेत. महिलांनी अशा कार्यक्रमात पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. विश्वभारती संस्था अहमदाबाद, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ आणि पुणे गुजराती केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे रविवारी (दि.२३ मार्च) भारतीय लेखिकांचा सहभाग असणारे संमेलन “जुही मेळावा…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सर्वांनी निर्धार केल्यास आपण कोविडप्रमाणेच १०० दिवसात क्षयरोग घालवू शकतो. असे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी येथे केले. सध्या शहरातील ५५% लोक महापालिका रुग्णालयात सेवा घेतात. हा आकडा ८० टक्के पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. गोफणे बोलत होते. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली डोणे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरके भोसरी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉक्टर वैशाली भामरे, सारिका…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या ज्ञानाचे क्षेत्र असलेली शाळा ही एक अशी पुण्यनगरी आहे जेथे मोठे मोठे ज्ञानी व्यक्ती होऊन गेले. ज्ञानदान हे श्रेष्ठदान आहे. या ज्ञानासाठी जागा हवी, इमारत हवी असते. या शाळेत आज भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले यात मी धन्य धन्य झालो. स्वामी विवेकानंदांसारखे विद्यार्थी या भारतभूला लाभले हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे असे शांतीब्रह्म हभप मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी या भूमिपूजनास शुभाशीर्वाद दिले. भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग, महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन रविवारी (दि. २३ मार्च) शांतीब्रह्म गुरुवर्य हभप मारोती महाराज…

Read More

राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील संघटनांचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -देशभरातील लाखो ऑटो, टॅक्सी, बस ट्रक चालकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक वर्ष लढा दिला जात आहे. राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. देशभरातील चालकांसाठी कल्याणकारी बोर्ड निर्माण करून त्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा म्हातारपणी पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवरती बंदी आणली पाहिजे टू व्हीलर टॅक्सीला देशभरामध्ये बंद केली पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण ठरवताना पूर्वीचे वाहन वरती कोणतीही बाधा येणार नाही यासाठी सर्व संघटनांना विश्वासात घेण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी नुकतेच दिल्ली येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असंघटित कामगारांना कामाची हमी नाही ,कधी काम मिळते तर कधी मिळत नाही, मिळालेल्या कामांमध्ये किमान आणि समान वेतनाची अंमलबजावणी होत नाही, कामगारांना आजही किमान वेतनासाठी झगडावे लागत आहे किमान वेतनात १० % वाढ करायचं म्हटलं तर शासन करत नाही आणि केंद्र सरकार खासदारांच्या वेतनात तब्बल २४ % वाढ केली असल्याची अधिसूचना कालच जाहीर करण्यात आली. त्यामुळे असंघटित कामगार वाऱ्यावर ; खासदारांची वेतन वाढ २४ टक्क्यावर अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले . केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे अनेक दिवसापासून आम्ही किमान आणि समान वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी करीत…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वेद स्पर्श क्लिनिक व वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने देशाचे शूर वीर असे भगत सिंह,राजगुरू,सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. 23 मार्च शहीद दिवस या दिवशी या देशाचे शूर वीर असे भगत सिंह,राजगुरू,सुखदेव,हे तीन सुपुत्र देशासाठी शहीद झाले या तीन शहिदांना हा देश ,जनता कधीही विसरणार नाही व त्यांची प्रेरणा घेऊन अनेक जन आज देशप्रेमाची व्याख्या समजून घेतात. वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या वीर देशपुत्रांना पुष्प वाहून विनम्र आभिवादन केले.डॉ. गीतांजली क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर वूई टुगेदर सचिव,आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांनी या वीर जवानाविषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशश्री महिला मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला. महिला मंडळामध्ये एकूण १०० सभासद आहेत. मंडळाच्या २५ वर्षांच्या कामकाजा बद्दल अध्यक्षा अलका धोकटे यांनी माहिती दिली. मंडळाची स्थापना ते आता पर्यंत ज्या सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक यांनी सहकार्य केले अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक उत्तम केंदळे, सुमन पवळे, कमलताई घोलप, शशीकिरण गवळी, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते, दत्त मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग पालांडे व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपस्थीत होते. “मंडळाची २५ वर्ष“ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली, त्याला सभासदांनी उदंड प्रतिसाद दिला आणि विजेत्यांना बक्षीसही देण्यात आले. जुन्या हिंदी मराठी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी पोलीस स्टेशनतर्फे भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अ‍ॅड. मंगेश खराबे हे कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत भारतीय न्याय संहिते मधील गुन्हे म्हणजेच बलात्कार, मॉब लिंचिंग, देशविरोधी कृत्यांसाठी कडक शिक्षा, हिट-अँड-रन प्रकरणांवरील कठोर कारवाई, ई-एफआयआर आणि डिजिटल तपास प्रक्रिया, साक्षीदार संरक्षण आणि डिजिटल पुराव्यांना अधिकृत मान्यता यांसारख्या नवीन तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पंकज महाजन, दीपक कांबळे, गणेश देशमुख, तसेच पोलीस हवालदार…

Read More