- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या ‘१०० दिवसांचा ‘कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘व्यवसाय सुलभता’ (Ease of doing Business) संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. उद्योग सुविधा कक्षाचा उद्देश महानगरपालिका व स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहराच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. *‘उद्योग सुविधा कक्षाची’ प्रमुख उद्दिष्टे -* • औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे. • व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी सक्तीची कार्यवाही डिसेंबर २०२४ पासून सुरू सातत्याने सुरु आहे. यापूर्वी शहरातील बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र प्रकारातील १०५७ मालमत्तांवर जप्तीची कार्यवाही करणेत आली. १०५७ जप्त मालमत्ता धारकांपैकी ५६७ थकबाकीदारांनी त्यांचे मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्याने थकबाकीदारांची मालमत्ता सील काढण्यात येऊन संबंधित मालमत्ता मालमत्ताधारकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. तदनंतर दिनांक २० मार्च रोजी शहरातील सर्व वर्तमानपत्रामध्ये उर्वरीत ४९० बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांची लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेत आली. यापैकी १२ मालमत्ताधारकांनी ६३ लाखांचा भरणा केला असून २४ मालमत्ताधारकांनी ३८ लाखांचा अशंत: भरणा केला असून…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूतीची नव्हे तर सक्षम बनविण्याची गरज आहे. यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे, भविष्यात हेच दिव्यांग खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून शहराच्या नाव लौकीकात भर पडतील असा सार्थ विश्वास महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व साई संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथील कृष्णानगर स्वामी विवेकानंद क्रीडांगण येथे आयोजित महापालिका परिसरातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आलेले होते,त्याचे उद्घाटन उप आयुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते झाले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील ज्या वकिलांची भारत सरकारतर्फे नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नोटरीच्या कामकाजाबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर आज पिंपरी न्यायालयाच्या पुरुष बार रूम येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ॲड. मकरंद गोखले त्याचप्रमाणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे व नोटरी असोसिएशनचे सेक्रेटरी ॲड. अशोक वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी ॲड. मकरंद गोखले यांनी नोटरी कायदा त्यातील तरतुदी यावर विशेष मार्गदर्शन करीत असताना नोटरी हा व्यवसाय नसून एक प्रोफेशन आहे, आपण सर्वांनी आपल्याला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर अशी दरवर्षी घेण्यात येणारी ६० किलोमीटर सायकलिंग राईड चे आयोजन करण्यात येते सदर वर्ष नववे वर्ष आहे , संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व सहभागी सायकल स्वार सोबत सकाळी 5 वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. उद्योजक अण्णारे बिरादार, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. सर्व सभासद भक्ती शक्ती निगडी – नाशिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात आली आहे. शहरात हे लसीकरण अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. शहरातील आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ही प्रभावी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत २५ मार्च २०२५ पर्यंत २ लाख ७ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळे कॉलनीमध्ये आळंदी नगरपरिषदेच्या वतीने चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.वारंवार पाणी सोडण्याच्या वेळाही पाणीपुरवठा अधिकारी बदलत आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकारी श्रद्धा गर्जे यांचे कोणतेही पाणीपुरवठ्यासंबंधी नियोजन नाही. शिवाय नागरिकांचा फोन उचलत नाहीत,नागरिकांना माहिती देत नाहीत, नागरिकांना स्वखर्चाने टंँकरने पाणी विकत घ्यावे लागते ,शिवाय नगरपरिषदेकडे टँकर उपलब्ध नाही म्हणून त्या नागरिकांना सांगत असतात. यामुळे नागरिक आमच्याकडे दररोज पाण्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येत असल्याचे नगरसेवक अँड सचिन काळे यांनी सांगितले,नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून खुप मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे.असाच पाणीपुरवठा विस्कळीत राहिला तर मी व सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समितीने नागपूर अधिवेशन तसेच मुंबई मंत्रालयासमोर काढलेल्या मोर्चास यश आलेले असून कामगार मंत्र्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे. मात्र ही फसवी योजना असून १०,१५,२० वर्षे अशी अट न लावता व दिशाभूल न करता सलग पाच वर्षे नूतनीकरण करणाऱ्या व वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांना सरसकट दरमहा ८ हजार रुपये पेन्शन (निवृत्तीवेतन) द्या अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे पेन्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, संघटक विनोद गवई,भास्कर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय मध्ये ज्येष्ठ साहित्यिक रमेश तांबे यांचे मार्गदर्शन पर वाख्यान आयोजित करण्यात आले होते. तांबे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विविध कथा रंजनात्मक गोष्टी व कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव,सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, कोर कमिटी सदस्य मनीषा जाधव , छाया ओव्हाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर मोमीन यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनी मानले.
वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे आमदार सुनिल शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुनिल शेळके यांचा अनुभव आणि भुमिका सुनिल शेळके हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, मागील काही वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागातील भौतिक सुविधा रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबवले जातील, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांन कडून त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे रोजगार हमी योजनेला नवी दिशा मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी…
