- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा गुणांच्या जोरावर पराभव करत हर्षवर्धनने ६८ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक विशेष म्हणजे, या विजयासोबतच हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला असून नाशिक जिल्ह्याला त्याने दुसऱ्यांदा मानाची गदा मिळवून दिली. एकाच तालमीचे दोन वाघ समोरासमोर अंतिम लढत केवळ दोन पैलवानांमधील नव्हती, तर ती एकाच गुरुच्या दोन शिष्यांच्या कौशल्याची कसोटी होती. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरस पाहायला…
बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा – डॉ. प्रशांत पानसरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संतुलित विचार आणि जबाबदार कृती या मूल्यांचा उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयोग केल्यास उत्तम व्यवसाय स्थापित करता येऊ शकतो. जग जागतिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असून भूराजकीय पुनर्रचना घडत आहेत. जसे की चीनने पुरवठा साखळी व्यवस्थापनात मोठी प्रगती केली असली तरी भारतासारख्या विकसनशील देशांसाठी उत्पादन क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत असे प्रतिपादन उद्योगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पानसरे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “इन्स्पायर २०२६ शाश्वत पद्धती, नवोपक्रम आणि जबाबदार…
कोरिया उद्योग समन्वयासाठी एक खिडकी योजना “पीसीयू – कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” ची स्थापना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोरियन उद्योजक आणि गुंतवणूक प्रतिनिधी हे महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसर ऑटोमोबाईल व उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून उद्योग उभारणी करण्यास सकारात्मक आहेत. पुणे औद्योगिक परिसर कोरियन गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे. या परिसंवादात ४० पेक्षा जास्त कोरियन कंपन्यांनी आगामी काळात जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. तसेच एमआयडीसी च्या धोरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कौशल्यसंपन्न मनुष्यबळ, संशोधन सहाय्य आणि नवोन्मेषी उपाययोजनांद्वारे या परिसंस्थेला सक्रिय योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील महानगरांमध्ये, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शैक्षणिक व आयटी हबमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना, स्पा व्यवसायासाठी पुढील ३ ते ४ महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. ‘आली धाड, गेला मालक’ हा लपंडाव थांबवा! सभागृहात बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, महाराष्ट्र हे विद्येचे माहेरघर आहे, मात्र आज पुण्यासारख्या शहरांत शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर (गावठाण) येथील महापालिका दवाखान्यास ‘माता रमाई आंबेडकर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा दवाखाना अत्यंत महत्त्वाचा आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असून, त्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देत समाजकारणात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या त्याग, संयम आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्या आजही प्रेरणास्थान मानल्या जातात. या दवाखान्यास त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल, तसेच परिसरातील…
पिंपरी येथे “शहीद भगत सिंग आणि आर्य समाज” विषयावर व्याख्यान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद भगत सिंग यांच्या तीन पिढ्यांना बलिदानाचा इतिहास आहे. २७ सप्टेंबर १९०७ साली भगत सिंग यांचा जन्म झाला. बालपणी त्यांच्यावर गुरुगोविंद सिंग, आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत प्रभाग क्रमांक ०८, इंद्रायणी नगर येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत देऊन १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याच ठिकाणी आरोग्य…
महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा…
रश्मी गुजराथी लिखित ‘निसर्गाचा खजिना’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ”निसर्गाचा खजिना’ बालकुमारांच्या मनाला भावणारा आणि त्यांचे भावविश्व समृद्ध करणारा आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे काढले. ज्येष्ठ बालसाहित्यिका रश्मी गुजराथी लिखित आणि यशोदीप पब्लिकेशन्स निर्मित ‘निसर्गाचा खजिना’ या बालकुमार कथासंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ बालसाहित्यिका प्रा. डॉ. नीलिमा गुंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ बालसाहित्यिक डाॅ. दिलीप गरुड, बाळकृष्ण बाचल, शिवाजी चाळक, प्रकाशिका प्रा. रूपाली अवचरे, निखिल लंभाते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आस्मानी गुजराथीची गणेशवंदना, दीपप्रज्वलन आणि…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ” जल के बिना तो भैया काम ना चले”हे पाणी जपून वापरा असा संदेश देणारे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ . वैशाली चौधरी,दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे सहभागी झाले होते. याप्रसंगी शिवाजीराव शिर्के, तानाजी एकोंडे, श्रीकांत चौगुले, अरुण पवार, बाळासाहेब साळुंके,पांडुरंग…
