- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज इंदोर महानगरपालिका महापौर पुष्यमित्र भार्गव, आयुक्त शिवम वर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी इंदोरच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी इंदोरच्या भूमीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी म्हणत त्यांना प्रथम प्रणाम केला आणि या शहराशी असलेले आपले आत्मीय नाते व्यक्त केले. महापौर अॅंड.भार्गव यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत येथे झालेले आहे. अॅडव्होकेट जनरल म्हणून देखील त्यांनी काम केलेले असून त्यांचा सायबर क्राइम मध्ये अभ्यास आहे. त्यांना कायद्याच्यासंदर्भात अधिक काम करायचे असल्यांबाबत देखील भार्गव यांच्यासमवेत चर्चा झाली असल्याचे डॉ.गोर्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर मध्यप्रदेशात लाडक्या बहिणी…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलाेमीटर रस्त्यासाठी 82 कोटींची निविदेच्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी भ्रष्ट अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील टेल्काे रस्त्यावरील भाेसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चाैकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्यावत पध्दतीने विकसित करणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने मार्गिका, वाहनतळ, सायकल ट्रॅक, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शाैचालय उभारणार आहे. या कामासाठी तब्बल 81 कोटी 77 लाख 55 हजार 556…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप (इएसव्हीसी) ३००० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) टीम सोलरियमने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मार्च ते एप्रिल २०२५ दरम्यान ग्रेटर नोएडा येथे पार पडली. २०१६ मध्ये स्थापन झालेली टीम सोलरियम ही पीसीसीओईची अधिकृत सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनांची टीम आहे. शाश्वत वाहतूक तंत्रज्ञानात नाविन्य आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही टीम आज राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. सातत्यपूर्ण मेहनत, तांत्रिक कौशल्य आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत टीम सोलरियमने देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांशी स्पर्धा करत खालील सन्माननीय पारितोषिके पटकावली – पीपल्स…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत होता. याप्रश्नी महानगरपालिकेच्या निष्क्रिय, निद्रिस्त पाणीपुरवठा विभागाला जाग आणण्यासाठी भाजपा नेते सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ प्रभाग कार्यालय वर शुक्रवारी ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा या भागातील सर्व नागरिकांनी दिला होता. मनपा ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत देसाई आणि कनिष्ठ अभियंता साकेत पावरा यांनी सचिन साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी भेट देऊन तेथील नागरिकांसोबत बैठक घेतली यावेळी माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, अशोक बालवडकर, रवींद्र काटे, आनंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, काळूशेठ नांदगुडे, नागेश जाधव, पंडित गराडे, साहेबराव नांदगुडे, महेंद्र बिराजदार,…
खेलो इंडिया प्रकल्पात युवा खेळाडूंनी सहभागी व्हावे- पद्मश्री मुरलीकां पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक मध्ये पदके मिळवायची असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “खेलो इंडिया” या प्रकल्पातून जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी सहभाग घेऊन आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे. यातून पुढे आलेले खेळाडू जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळून अनुभव मिळवतील. हा अनुभव, सराव आणि योग्य प्रशिक्षक, मार्गदर्शकाच्या सल्ल्याने खेळाडूंना नक्की यश मिळेल. पै. विजय नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला जागतिक विक्रम इतर खेळाडूंना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी केले. गुरुवारी (दि. १० एप्रिल ) रहाटणी, ता. हवेली, जि. पुणे येथील भैरवनाथ तालीम येथे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने सरसटक अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध भंगार दुकाने हटवण्यात आली. त्यात काही लघु उद्योजकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक 40 प्लॉट क्र. टी. 201 येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करावे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक 40 प्लॉट क्र. टी. 201 येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. सदर कामाला दि. 16 जून 2008 रोजी कार्यादेश देण्यात आला आहे.…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणेला ‘नॅक’कडून NAAC (National Assessment and Accreditation Council) पहिल्याच चक्रात पुढील पाचवर्षांसाठी ‘अ’ (A) (सीजीपीए ३.११ पैकी ४.० स्केल) दर्जा मिळाला आहे. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या गुणवत्तेवर उमटलेली ही अभिमानास्पद मोहर आहे, अशी भावना विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता मंगेश कराड (Executive Director Dr.Sunita Mangesh Karad) यांनी व्यक्त केली. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डॉ.कराड बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस., प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस. यावेळी म्हणाले, एमआयटी एडीटी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालकांसाठी नवीन रिक्षा परवाना (परमिट) आरटीओ प्रशासनाकडून २०१७ पासून सुरुवात करण्यात आली. यानंतर काही कालावधीनंतर रिक्षा चालकांनी खुले परमिट बंद करण्याची मागणी वारंवार केली. मात्र ती न करता आजपर्यंत ही खुले परमिट सुरूच आहेत. यामुळे ज्यांना गरज नाही अशानीही रिक्षा घेतले जे सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापनात काम करतात अशांचे परमिट ३० एप्रिल पर्यंत परत करण्याचे आवाहन आरटीओ ने केलेले आहे, मात्र परवाने देतानाच आरटीओ प्रशासनाने याची खात्री करणे अपेक्षित होते त्यामुळे इतके हजारों परमिट परवाने वाटप करताना त्यांच्या लक्षात का आले नाही? आरटीओ प्रशासन झोपले होते का ? असा सवाल कामगार नेते…
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची येथे होणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला आहे. परंतु, दुःख दूर करण्याचा उपाय बाहेर नसून आपल्या आतच आहे. व्यक्तिने आपल्या जीवनात ध्यान जोडल्यास तो शांती प्राप्त करू शकतो आणि यातूनच शांतिमय विश्वाची निर्मिती केली जाऊ शकते. ध्यानयोग केल्याने शरीरभाव कमी होऊन आत्मभाव वाढण्यास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक कल्पना सुचतात, परंतु या कल्पना वास्तवात रूपांतरित होतातच असे नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती जोपासत त्यातून भविष्यातील संभाव्य संधीचा लाभ घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाने ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, असे मत औद्योगिक ऑटोमेशन आणि व्यवसाय वृध्दीतील तज्ज्ञ महेश लोटके यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते मावळ येथे ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कल्पनांचे वास्तवात रूपांतर करणे’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी…
