- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशाची असून, भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. भारतातील हे पहिले ‘संविधान भवन’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरभर अभिवादन फ्लेक्स लावले असून, या फ्लेक्सच्या माध्यमातून भारतीय संविधानाबाबत पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात जनजागृती देखील केली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व आंतरराष्ट्रीय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराची कुस्ती पंढरी असणाऱ्या भोसरीमध्ये यंदा श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या लक्षवेधी कुस्तीने गाजणार आहे. यंदा कुस्ती मैदानात “भैरवनाथ केसरी” किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत होणार असून, या लढतीकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कुस्ती आखाडा होणार आहे. भोसरीचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी ४ वाजता आखाडा पूजन करुन लढतींची सुरूवात होईल. कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात कै. ह.भ.प. रामचंद्र बाबुराव लांडगे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. शिका व संघटित व्हा! हा बाबासाहेबांचा विचार अंगीकारून त्त्यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली व शालपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. वूई टुगेदर फाउंडेशन कायमच असे विविध लोकपयोगी व गरजुना निस्वार्थी मदतीचा हात देणारे उपक्रम घेत असतात.जे जे श्यक्य होईल ते ते करण्याचा प्रामानिक प्रयत्न असतो तो पुढेही कायम राहील आम्ही सर्व मान्यवर एक कुटुंब म्हणून कायम एकीने निस्वार्थी काम करीत असतो आदी आपल्या भावना व्यक्त करीतफाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. सल्लागर रवींद्र सागडे,खुशाल दुसाने,जयंत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने व आमदार शंकरभ जगताप यांच्या संकल्पनेतून भाजपा कायदा आघाडी संविधान विधी सेवा सल्ला मोफत केंद्राचे उद्घाटन सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भाजपा कायदा आघाडी अध्यक्ष ॲड.गोरक्षनाथ झोळ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, ॲड. रोहित चिंचवडे, ॲड.बालाजी पवार, ॲड. वैशाली मुळीकर, ॲड. ओंकार देशपांडे भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, रवींद्र प्रभुणे, मधुकर बच्चे, शिवाजी राऊत, हरिभाऊ मोहिते, मंगलदास खैरनार, सुभाष पंडित, विजय अरक, मधुकर कुलकर्णी, उत्तम विटूले, सर्जेराव कोळी आदी उपस्थित होते. सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दर रविवारी सकाळी १०…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (ICEM) तर्फे “नेक्स्टजेन टेक्नोलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर (NTAI-2025)” या विषयावर १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेसाठी एकूण ३४५ संशोधन प्रबंध प्राप्त झाले होते. त्यापैकी ११६ संशोधन प्रबंधांचे सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण १६ समांतर सत्रांमध्ये, हायब्रिड पद्धतीने पार पडले. या परिषदेमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन, जे इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षपदाच्या मनोनीत डॉ. तरीता शंकर, मुख्य सल्लागार व अध्यक्षा, इंदिरा ग्रुप ऑफ…
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतपरंपरेच्या पावन भूमीत, श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो भक्तांनी आत्मिक शांततेचा व आध्यात्मिक जागृतीचा अद्वितीय अनुभव घेतला. या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयीन महर्षी, आध्यात्मिक सदगुरू व हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराचे प्रणेते श्री शिवकृपानंद स्वामीजींनी केले. स्वामीजींनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या विश्वधर्म, आत्मधर्म आणि आत्मानुभूती या सूक्ष्म तत्त्वज्ञानाचा साक्षात अनुभव भक्तांना दिला. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने देशभरातून आणि विदेशातून समर्पण ध्यानाचे साधक उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या रूपात खालील दिग्गजांनी आपली उपस्थिती नोंदवली. या प्रसंगी सुप्रसिद्ध आयकर सल्लागार तथा चांगुलपणाची चळवळ अध्यक्ष राज देशमुख, आळंदी देवस्थान विश्वस्त राजेंद्र उमाप,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन याठिकाणी “कृती प्रकृती कला प्रदर्शन”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी या प्रदर्शनात लहान मुलांनी काढलेल्या विविध अश्या अतिशय सुंदर आणि मनमोहक पेंटिंगचे भरपूर कौतुक केले आणि त्या लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा म्हणून केलेल्या या प्रयत्नांसाठी आयोजकांचे देखील आभार व्यक्त केले. आपली कला जगासमोर मांडण्याची उर्मी असलेल्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी “कृती प्रकृती कला प्रदर्शन”च्या माध्यमातून या पुढाकार घेतला. असे कला प्रदर्शन कलाकारांना त्यांच्या कामाची ओळख करून देण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची संधी देते. या प्रदर्शनातून मुलांना विविध…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती काळेवाडी येथे पवना हेल्थ क्लबच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मागील सलग दोन-तीन वर्षांपूर्वी क्लबच्या वतीने ग्रंथालय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस मदत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन महामानवांची जयंती साजरी केली होती. यावर्षी क्लबच्या वतीने सकाळी सात ते नऊ असे सलग दोन तास पुस्तक वाचन करून महामानवांना अभिवादन करण्यात आले यावेळी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.. आजच्या युगामध्ये हल्ली मुले पुस्तकाकडे दुर्लक्ष करीत आहेत.प्रत्येक महापुरुषाची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करावी असा संदेश समाजात देण्यात आला. वाचाल…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रक जारी करत माहिती दिली आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहितेचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टने या पत्रकात म्हटले आहे. देवस्थान संस्थानकडून मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या ५ मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हे पाचही देवस्थान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात अनेक अडचणी, समस्या येतात. परंतु त्याकडे सकारात्मकपणे पाहिले तर नवीन संधी दिसते. या संधीतून नवनवीन संकल्पना उदयास येत असतात त्यांचे वास्तवात रूपांतर करून त्या आत्मसात करा आणि त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘टेक्नोव्हेट २०२५’ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. राजेंद्रकुमार शर्मा आणि संगीता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विविध तांत्रिक व सर्जनशील प्रकल्प सादर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्रो कोड, एरर ४०४, ब्रिजिंग माईंड्स, कॅड…
