- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रूपगंधा हा काव्यसंग्रह प्रकाशित होऊन ज्यांनी कमी वयामध्ये साहित्यात प्रगती केली आणि महाराष्ट्रात नावाजले जाऊ लागले त्यानंतर एल्गार, रंग माझा वेगळा, झंजावात इत्यादी संग्रह प्रकाशित झाल्यानंतर प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार सुरेश भट हे नाव आजारावर झाले . उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..! हे मशाली पेटवून सामान्य नागरिक वंचित आणि कामगारांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे काम सुरेश भट यांनी केले असे मत कामगार नेते काशिनाथ यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे गझलकार सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, सलीम डांगे,सुनील भोसले,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार महाराष्ट्राचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे- रविराज इळवे यांनी उपस्थित कामगार तसेच पालक यांना संबोधित करतांना म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले आहे.१९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत नवीन विधेयक सुचवले होते जे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेत, कामाच्या तासांच्या संदर्भात द्यावयाच्या किमान वेतनाशी संबंधित होते.हे विधेयक १९४८चा कायदा बनला आहे आणि त्याला सध्या किमान वेतन कायदा, १९४८ असे संबोधले जाते. कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले की जर तुमच्याकडे दोन रुपये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमध्ये बहुतांश आयटी क्षेत्रातील कर्मचारी घर खरेदी करतात. हे खरेदीदार आपल्या जीवनभराच्या कमाईतून घर घेतात आणि खरेदी करताना शासनाचा सर्व आवश्यक कर भरतात. मालमत्ता कराची पावती हे महत्त्वाचे दस्तऐवज असूनही, बिल्डर किंवा पालिकेकडून यासंदर्भात कोणतीही माहिती दिली जात नाही. या पावतीवर खरेदीदाराचे नाव असणे खूप गरजेचे असते. देविदास (आप्पा) तांबे यांच्या अथक प्रयत्नांमुळे रहाटणी परिसरातील असंख्य सोसायट्यांतील रहिवाशांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून हस्तांतरण शुल्क माफ करून आपली मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित करुन घेतली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल अनेक रहिवाशांनी त्यांचे मनापासून आभार मानले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिपत्रक क्रमांक कर/मुख्य/9/कावी/98/2022, दिनांक 01/04/2022 नुसार मालमत्ता हस्तांतरण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आरटीओच्यावतीने गणवेश सक्ती करण्यात आली असून गणवेश न घालणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात असे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाला विरोध करणार नाही, पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकांनी, गणवेश घालावा व व्याज लावावे असे आव्हान देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. ” गणवेश नकोय अशी भूमिका आम्ही यापूर्वी अनेकदा घेतली होती, परंतु त्या पाठीमागे व्यापक विचार होते. रिक्षा चालकांवरती अनेक बंधन लागले जातात आणि एक नियम व अटी लावल्या जातात. परंतु त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, अपघाती विमा, मुलांना शिक्षण, म्हातारपणी पेन्शन आधी कोणत्याही सुविधा मिळत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचा चौथा दिवस अभूतपूर्व उत्साहात, विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित या पर्वाने शहरवासीयांना प्रेरणादायी विचार, सृजनशील कलाविष्कार आणि समाजजागृती यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळाली. चौथ्या दिवसाची सुरूवात “धम्मपहाट” या शास्त्रीय संगीताने सजलेल्या कार्यक्रमाने झाली. यामध्ये ख्यातनाम गायक डॉ. मधुकर मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुद्ध व भीमगीतांचा समावेश असलेल्या सुमधुर रचना सादर केल्या. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भीमरावांचा जीवनप्रवास आणि धम्मसंस्कृतीचा गौरव त्यांनी रचनांमधून अधोरेखित केला. यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक-संगीतकार…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तनिषा उर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जुळ्या बाळांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यासह माणुसकीचा हात दिलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोन जुळ्या बालिकांसाठी सूर्या हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय उपचारच नाही, तर माणुसकीचा हात दिला. त्यांचे संगोपन, काळजी आणि भिसे कुटुंबाला दिलेला मानसिक आधार यातून सूर्या हॉस्पिटल व तेथील स्टाफने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने सूर्या हॉस्पिटलला विशेष…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये भरघोस वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने रेशन दुकानदारांना दिले होते. आता पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कमिशन वाढीसाठी लढा देणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळावा, यासाठी ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे, स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली. कमिशन वाढीसह विविध समस्या लवकर सुटाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
संभाजीनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “रामकथा ही आरशासारखी असून आपण कोण आहोत, आपण कशासाठी जगले पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरे रामायणातुन आपल्याला मिळतात. अन्याय, अधर्म, अनीती यावर मात करत संस्कार आणि संस्कृतीचे धडे देत मानवतेच्या धर्माची पुनर्स्थापना करण्याचे सामर्थ्य प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात आहे. कौटुंबिक नात्यांमधील समन्वय साधत रामायण समाजामध्ये जागृती निर्माण करते. आजच्या काळात माणसातील अवगुणांना दूर करत त्याला माणूस बनवण्यासाठी रामायण महत्वाचे आहे.” असे प्रतिपादन ह.भ.प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांनी केले आहे. बलभीम बिराजदार मित्र परिवार व स्वा. सावरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राम नवमी ते हनुमान जयंती असा रामकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तापोनिधी पंचायती दशनामी आनंद…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय घटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचारमूल्य आणि संविधानामुळे देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव असून त्यांनी दिलेली विचारधारा ही आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी आहे. असे सांगून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले व्यापक विचार आणि समता व बंधुभावाची शिकवण सर्वांनी जोपासावी, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी तसेच एच. ए क़ॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारतीय समाजाचे महान नेते भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या योगदानाद्वारे तत्कालीन समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले. त्यांच्या मते, “ज्या व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते तो समाजापासून वंचित असतो.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला. त्यांची जयंती देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केले जाते. त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या सन्मार्थ ‘जय भीम’चा नारा देतात. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, तसेच भीमराव आंबेडकर हे एक महान नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी…
