Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी-चिंचवडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त २५ ते ३१ मार्चदरम्यान ४०हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन, महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त यंदा विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची भव्य मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. २५ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘अहिंसा सप्ताह’, अहिंसा रॅली, अहिंसा पुरस्कार, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा सुमारे ४०हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात २५ मार्च रोजी कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात भक्तामर पठणाने होणार असून त्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृहात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील तमारा सोसायटी येथे असलेल्या एस.टी.पी. (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) प्लॉट संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी पुढाकार घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान पर्यावरण अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा आढावा घेत स्थानिक रहिवाशांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. परिसरातील दूषित पाणी, अस्वच्छता आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली. नगरसेविका तापकीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष…

Read More

थेरगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे आयोजित उपवर परिचय संमेलन २०२६ शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज ब्राम्हणकार व राजेंद्र महालपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या संमेलनात वधू-वर तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, सुमारे २७०० समाजबांधव त्यामध्ये ९८० उपवर व उपवधू उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे व भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे , नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे, नगरसेवक माऊली जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काव्यात्मा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पिंपळे गुरव येथे लेखक श्रीकांत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इरान्ना निंबाळ (काव्य साधना जीवन गौरव पुरस्कार), निलेश शेंबेकर (गझलकार प्रकाश बनसोडे सन्मान पुरस्कार), युवा कवी उमेंद्र बिसेन (काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार), संभाजी रणसिंग (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), संदिप तापकीर (काव्यात्मा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार),संजय मलवाड (काव्यात्मा आदर्श शिक्षक पुरस्कार), संतोष खवळे (काव्यात्मा युवा उद्योगरत्न पुरस्कार), राजू जाधव ( श्रमप्रतिष्ठा पुरस्कार) या म.भा.चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी लेखक श्रीकांत चौगुले अध्यक्षिय भाषणात म्हणाले, सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे साहित्य टिकावू असते. प्रत्येकजण सूर्य होऊ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड शहरातील पवनानगर परिसरातील प्रलंबित आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, संबंधित आरक्षण उठवण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखालील सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. पवनानगरमधील आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना बांधकाम, विकास आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या समस्यांची दखल घेत आमदार जगताप यांनी महापालिका व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. यासोबतच नगरसेवक विनोद नढे यांनी मांडलेल्या उपसूचनेलाही मंजुरी मिळाल्याने हा प्रश्न अधिक वेगाने सुटण्यास मदत झाली. महापालिकेच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेत आरक्षण उठवण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली. यामुळे पवनानगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर परिसरातील मिलिटरी लगतचा बॅक साईडचा रस्ता अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत होता. स्थानिक शेतकरी आणि अल्को सोसायटी तसेच साई पर्ल सोसायटीतील रहिवाशांमध्ये झालेल्या गैरसमजुतीमुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी, दैनंदिन वाहतूक, शाळा-कामावर जाणे तसेच आपत्कालीन सेवांसाठी नागरिकांना पर्यायी लांब मार्गांचा वापर करावा लागत होता. या समस्येबाबत अल्को सोसायटी व साई पर्ल सोसायटीच्या कमिटी सदस्यांनी मा. विरोधी पक्षनेते व नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत नाना काटे यांनी या विषयाची तातडीने दखल घेतली. नंतर नाना…

Read More

वीजबिलाची माहिती, भरणास‍ह तक्रार नोंदविण्याचीही सोय पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दिवसेंदिवस महावितरण स्मार्ट होत चालले असून, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची ‘Ease of Doing Business’ ही संकल्पना महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सत्यात उतरवली आहे. ग्राहक दैनंदिन जिवनात जे माध्यम वापरतात त्याच ‘व्हॉट्सॲपवर’ आता महावितरणच्या सेवा अधिकृतपणे पोहोचल्या आहेत. अगदी वीजबिल पाहण्यापासून वीजबिल भरण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ग्राहकाला उपलब्ध झाले आहे. वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यात महावितरणचे ३ कोटी १२ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. तर पुणे परिमंडलात ग्राहकांची संख्या ३९ लाखांच्या घरात आहे. या सर्व ग्राहकांना १३ मार्चपासून महावितरणच्या व्हॉट्सॲप सेवेचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्याबद्दल पिंपरी गुरुद्वारा व देहूरोड गुरुद्वारा यांच्या वतीने महापौर रवि लांडगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुरिंदर सिंग, गुरुविंदर सिंग, गुरुचरण सिंग, लखविंदर सिंग, गोविंद सिंह यांच्यासह पिंपरी गुरुद्वारा व देहूरोड गुरुद्वारा चे पदाधिकारी, नागरिक तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात योगदान देणारे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी व शनिवार १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथील खारघर परिसरात…

Read More

सानिया मुंगारे हिला “लीजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर” हा विशेष पुरस्कार पीसीसीओइला वैयक्तिक १७ पारितोषिके पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथे झालेल्या ५२ व्या फिरोदिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओइ) मधील आर्ट सर्कल संघाच्या “अख़्तरी” या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच इतर वैयक्तिक १७ पारितोषिके मिळवली. तसेच तसेच सानिया मुंगारे हिला उत्कृष्ट लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि गायन बहुआयामी योगदानासाठी “लीजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.      “अख़्तरी” या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अनुष्का भोईटे आणि सानिया मुंगारे यांनी केले. यातील प्रमुख पात्र असलेल्या बिब्बी चा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून आजही कामगारांच्या संघर्षाला दिशा देणारे आहे.” कार्यक्रमास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव यांच्यासह मातोश्री पतसंस्था अध्यक्ष पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, अप्पा कौदरे, सर्जेराव कचरे, हनुमंत तरडे, पांडुरंग पठारे, अशोक साळुंखे, रायरेश्वर पतसंस्था अध्यक्ष सतीश कंटाळे,…

Read More