Author: maharashtrabreakingnews.com

अत्याचारी प्रवृत्तीला वचक बसली पाहिजे;’फास्टट्रॅक कोर्टात’ खटला चालवा! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खेड तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (धर्म) येथील महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमधील आरोपी अटक आहे. मात्र, पालक तसेच परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत आहेत. या घटनेतील आरोपीचा खटला तात्काळ ‘फास्टट्रॅक कोर्टात’ चालविण्यात यावा. सदर गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. महिला भगिनींवर वाकडी नजर ठेवत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जरब बसावी यासाठी, अशी शिक्षा गरजेची आहे असेदेखील आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पीडित कुटुंबीयांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गिर्यारोहणाची प्रचंड आवड असलेले पिंपळे गुरव येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच जगातील सर्वोच्च शिखर, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी ट्रेकिंग करून पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माऊली जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर नियमितपणे ट्रेकिंग करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी यशस्वी चढाई केली आहे. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पसारख्या खडतर ट्रेकला गवसणी घातली आहे. नेपाळमधील खुंबू हिमनदीजवळ ५ हजार ६०० मीटर उंचीवर असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प हा जगातील गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. या बेस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता नेहमीप्रमाणे मालमत्ता कर सवलतीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार ८६३ मालमत्ता असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त कर संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांना कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास ५ टक्के आणि तो ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरला तर अधिक ५ टक्के अशी एकूण १० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये ३ लाख…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विनीयार्ड वर्कर्स चर्च, दापोडी येथे गुड फ्रायडे भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभु येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या उद्धारासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करण्यासाठी ख्रिस्ती नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी संस्थापक बिशप डॉ. पीटर डेव्हिड सिलवे आणि पास्टर डॉ. जयश्री पीटर सिलवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष सभेमध्ये दिलेल्या संदेशाद्वारे “गुड फ्रायडेचा आध्यात्मिक अर्थ विशद करण्यात आला. बिशप पीटर म्हणाले, की प्रभु येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानामध्ये दैवी प्रेम आणि उद्धाराची आशा कशी दडलेली आहे. क्रूस हे केवळ वेदनेचे प्रतीक नसून, देव आणि माणसामधील पुनर्मिलनाचा एक पवित्र आणि दैवी सेतू आहे. सभेचा समारोप येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित…

Read More

देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मी एक लाख दहा हजार मतांनी निवडून आलो… आता त्याच प्रमाणात म्हणजे एक लाख दहा हजार झाडे लावणार!”, असा ठाम आणि प्रेरणादायी संकल्प मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थित नागरिकांना ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’, हा संदेश दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात तिसरी म्हणून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. तसेच या निर्णयाचा निषेध सदर हिंदी भाषा सक्तीचा जिआर फाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले की,देशातील शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असणाऱ्या नव्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ची अंबलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने १६ एप्रिल २०२५ रोजी काढलेल्या निर्णयानुसार इयत्ता १ली ते ५ पर्यंत हिंदी भाषा हि तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आलेली आहे. सदर निर्णयाबाबत लोकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळामधून…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चिंचवड गावातील चापेकर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्त्याच्या बाजूला, फुटपाथ वर , नालामध्ये, किंवा इतरत्र कचरा फेकणाऱ्यांवर होणार कारवाई ही कारवाई ग क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचारी प्रशांत पवार व विशाल यादव यांच्यामार्फत करण्यात आली.डांगे चौक गुजर नगर परिसरात कारवाईची धडक कारवाई करण्यात आली.

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील खाजगी बांधकाम व्यवसायिकांची सर्वोच्च संस्थाअसलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी २०२५-२७ या कार्यकाळासाठी मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व प्लांट बायोटेक्नॉलॉजीक्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनीयुनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न मिसिसिपी येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.   क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनीष जैन म्हणाले, “ही भूमिका स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि पुण्याच्या रिअल इस्टेटक्षेत्राच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. क्रेडाई पुणे मेट्रोकडून विकासक, घर खरेदीदार आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी चांगले भविष्यघडविण्यासाठी नावीन्यपूर्णता, पारदर्शकताआणि सहयोगी प्रयत्नांवर भर दिला जाईल.”  त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक महत्त्वाच्या विषयांवरलक्ष केंद्रित करणार…

Read More

निगडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने अप्पर तहसील कार्यालय, निगडी येथे मोदी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. या विरोधात संपूर्ण देशात निषेध आंदोलन सुरू आहेत. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशान्वये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध आंदोलन…

Read More