Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘झाडे लावा, झाडे जगवा!’ हा संदेश देत कर्मयोगिनी महिला संस्था (पिंपरी चिंचवड – पुणे) आणि आर्य समाज मंदिर (पिंपरी) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित ‘झाडावर बोलू काही…’ हे विशेष कविसंमेलन उत्साहात आर्य समाज मंदिर, पिंपरी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका ॲड. प्रार्थना सदावर्ते होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम दंडीमे, आर्य समाज मंदिर ग्रंथालय सचिव दिनेश यादव आणि कर्मयोगिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा सीमा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘झाडावर बोलू काही…’ या प्रातिनिधिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. काव्यस्पर्धेत पिंपरी – चिंचवड, पुणे, मुंबई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ‘अरे संसार संसार…’ ही कविता आजही समर्पक आहे! त्यांनी सांगितलेले जीवनाचे सत्य अनुसरून लेवा पाटीदार मंडळे पिंपरी – चिंचवडच्या प्रगतीमध्ये सातत्याने आपले योगदान देत आहे!’ असे गौरवोद्गार आमदार शंकर जगताप यांनी सांगवी येथे काढले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी, पुणे आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान आयोजित; तसेच पाटील टुर्स ग्रुप ऑफ कंपनी प्रायोजित ‘जीवनगाथा बहिणाबाईंची…’ या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील पन्नास कलाकारांनी सादर केलेल्या भव्यदिव्य रंगमंचीय आविष्काराचे उद्घाटन करताना आमदार शंकर जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे होते; तसेच पिंपरी – चिंचवड महापालिका…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ख्रिस्ती बांधवांद्वारे साजरा केला जाणारा ईस्टर संडे दापोडी येथील विनयार्ड वर्कर्स चर्चमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा पवित्र दिवस ख्रिश्चन श्रद्धेतील मूलभूत स्तंभ असून, आशा आणि नवजीवनाचे प्रतीक मानला जातो. यावेळी चर्चचे संस्थापक बिशप डॉ. पीटर डेव्हिड सिलवे आणि पास्टर डॉ. जयश्री पीटर सिलवे यांच्या नेतृत्वाखाली चर्चमध्ये उपस्थितांनी स्तुती-प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश येशू ख्रिस्ताने मृत्यूवर मिळवलेला विजय आणि अनंत जीवनाच्या आशेवर आधारित होता, असे बिशप पीटर यांनी यावेळी सांगितले. ईस्टर ही देवाने मानवाला दिलेली एक हमी आहे. जीवनात कितीही अडचणी, दुःख किंवा अपयश आले, तरी देवाच्या सामर्थ्याने…

Read More

चिखली ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने यमुनानगर रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय अग्निशमन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने १४ ते २० एप्रिल दरम्यान…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता. यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्युट या भोवती गुंफन्यात आलेला होता. एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम,चिंचवड, पुणे​ येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू पराग काळकर, विद्यापीठाच्या कुलसचिव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोेकसभा मतदारसंघात असलेल्या लोहगड किल्यावरील कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी पाहणी केली. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोहगडाचा जागतिक वारसा स्थळात लवकरच समावेश होणार असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी लोहगड किल्याला भेट दिली. पूर्ण गडावर फिरुन पाहणी केली. गडावर चाललेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन टेकाळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी सभापती गणेश धानीवले, अलका धानीवले, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत बोते, अमित कुंभार, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल…

Read More

पिंपरी,(महाराष्ट् ब्रेकिंग न्यूज) – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एआय मुळे रोजगाराच्या संधी जातील अशी भीती व्यक्त केली जाते; परंतु हे खरे नाही. यामुळे रोजगारांच्या संधी, संकल्पना यामध्ये बदल होणार आहे. नव अभियंत्यांनी नोकरी च्या मागे धावण्याऐवजी स्टार्टअप सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे गुगल डेव्हलपर ग्रुपच्या पुणे विभागाचे प्रमुख महावीर मुथा यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे नेक्स्ट जनरेशन डेव्हलपमेंट क्लब च्या सहकार्याने ‘देव कार्निवल’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी कुशल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते, वडगाव मावळ येथे विविध उपक्रम राबवून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. पीसीयू ग्रंथालय विभाग आणि पीसीयू स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भेट दिली. उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ. मणिमाला पुरी आणि प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख, शाळा विभाग प्रमुख उपस्थित होते. या प्रदर्शनाचे आयोजन पीसीयू लायब्ररी डॉ. मतलूब अली खान आणि…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी एमएस-सीआयटी कोर्स शिकवला जातो, परंतु आळंदी येथील मल्टीटेक कॉम्प्युटर सेंटरने आपल्या विद्यार्थ्यांना केवळ बेसिक संगणक शिक्षण देण्यापली कडे जाऊन, थेट “कॉम्प्युटर गेम डेव्हलपमेंट” सारख्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतल्याने, संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळाच प्रेरणादायी आदर्श निर्माण केले आहे. “कॉम्प्युटर गेम क्रिएशन स्पर्धा”च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन मल्टीटेक कॉम्प्युटर आळंदीत उत्साहात झाले. या कार्यक्रमात फक्त एमएस-सीआयटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच सहभाग घेतला होता आणि त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने थ्रीडी, HTML, अ‍ॅनिमेशन इ. तंत्रज्ञान वापरून गेम्स तयार केले. या प्रसंगी शिवव्याख्याते संदीप तापकीर यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिवाजी महाराजां प्रमाणेच…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने पुणे जिल्हा महिला आघाडीची भव्य व सुसंघटित आढावा बैठक पुणे येथील शिवसेना भवन, मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन चारही लोकसभा मतदारसंघांतील पक्षस्थिती, महिला आघाडीची बांधणी, सदस्य नोंदणी अभियान व आगामी निवडणुकांच्या रणनीती यावर लक्ष केंद्रित करून करण्यात आले होते. या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेना नेत्या मीना कांबळी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, आणि पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांची प्रमुख उपस्थिती…

Read More