- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने चिंचवड येथील चापेकर स्मारकासमोर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या. शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहराच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारकासमोर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, संतोष सौंदनकर, शहर प्रमुख निलेश तरस, राजेंद्र तरस, माऊली जगताप, प्रशांत कडलक, ॲड. दिलीप पाटील, नारायण लांडगे, हरि नारायण डोंबाळे पाटील, दिलीप कुसाळकर, महादेव पाटील, शंकर गौडा पाटील, हेमचंद्र जावळे, सुदर्शन देसले…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या संस्थेच्या पंचम झोन – मुंबई पुणे प्रांत चे अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी- महिला शाखेच्या अध्यक्ष कल्पनाजी कर्नावट, आणि त्यांची कार्यकारिणी ,युवा शाखेचे अध्यक्ष देवेंद्र पारख आणि त्यांची कार्यकारिणी ,या सर्व एकूण 200 पेक्षा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचा शपथविधी आकुर्डी प्राधिकरण येथील ग दि माडगूळकर सभागृहामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अमित राय जैन , राष्ट्रीय चेअरमन विजय जी जैन, पूर्व अध्यक्ष अविनाशजी चौरडिया, पूर्वाध्यक्ष श्री पारसजी मोदी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच पर्यटकांच्या मनात भीती राहू नये, तसेच पर्यटकांना मदत व्हावी म्हणून साउथ काश्मीर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक 23 आणि 24-4- 2025 दोन दिवस मोफत टुरिस्ट टॅक्सी सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत काश्मीर येथील टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी यांनी,ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याशी संपर्क करून या बाबत माहिती दिली आहे, पर्यटकांनी मोफत टॅक्सी सेवा घेण्यासाठी कश्मीर येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. ” बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. पहलगाममध्ये आज(22 एप्रिल 2025) पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 27 पर्यटकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. दहशतवादी संघटना TRF ने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या घटनेनंतर भारतीय लष्करासह केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून, दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तात्काळ श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी आयबी आणि रॉ प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, नव्याने विकसित करण्यात आलेल्या महापालिकेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे संकेतस्थळ आता सर्व नागरिकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहे. चौकट – नवीन संकेतस्थळाची प्रमुख वैशिष्ट्ये – • ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड: दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ असलेले संकेतस्थळ, डब्ल्यूसीएजी च्या डबल-ए (AA) मानांकनासह सुसज्ज आहे. • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सर्च: चॅट जीपीटीचा वापर करून माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून नागरिकांचे प्रश्न अधिक वेगात आणि अचूकतेने हाताळण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. • प्रणालीमध्ये सुरक्षितता…
पिंपर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरासह समाविष्ट गावांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांना भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे तब्बल 42 ठिकाणी ‘‘मिसिंग लिंक’’ आहेत. संबंधित रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ‘कृती आराखडा’ तयार करावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो सिटी’ अशी ओळख असलेल्या या शहरामध्ये 2014 नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीतील पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली. परिणामी, गेल्या १० वर्षांमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये नागरीकरण आणि गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतूक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मधील रहिवासी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदा तुळसे व लक्ष्मण तुळसे यांची कन्या डॉ. वर्षा तुळसे (खिराडे) या लंडन मधील ब्रूक लेन डेंटल सर्जरी, फेलिक्सस्टोव्हच्या संचालिका आहेत. यांना नुकताच डॉकलँड एक्सएल, लंडन येथे इंग्लंडचे मुख्य दंत अधिकारी जेसन वाँग यांच्या हस्ते ‘नॅस्डॅल डेंटल चेक बाय वन (DCby1) प्रॅक्टिस ऑफ द इयर २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इंग्लंडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. वर्षा तूळसे या एकमेव भारतीय डॉक्टर आहेत. यावेळी एनएएसडीएएल चे प्रमुख हैदी मार्शल, बीएसपीडीचे अध्यक्ष शन्नू भाटिया, डॉ. किरण तुळसे, व्यवस्थापक…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नोलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने जपानमधील जी-प्लेस कॉर्पोरेशन आणि पुण्यातील क्रिस एअरो सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यासोबत एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील एक नविन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत जी-प्लेसने विकसित केलेली ‘डोमेस्टिक मल्टी-रिसायकलर’ (DMR) तंत्रज्ञान प्रणाली – ज्याला ‘जहकासो’ या नावानेही ओळखले जाते – ती एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात पर्यावरणीय परिस्थितीत चाचणीसाठी बसविण्यात येणार आहे. करार समारंभप्रसंगी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप तसेच एसओईएसचे संचालक…
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा इशारा ” रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी जनजागृती अभियान सुरू पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्याने रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. रिक्षा चालकांचा व्यवसाय वाचविण्यासाठी एकजुटीतून टू व्हीलर टॅक्सीला विरोध करू, महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टाकीला दिलेली परवानगी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष गोरगरिब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पुण्यातील रिक्षा चालकांना केले. या साठी पुणे शहरात जनजागृती करून सर्व रिक्षा चालक-मालक व रिक्षा संघटनांना एक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले. “टू व्हीलर टॅक्सीला विरोध करण्यासाठी तसेच,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु.कराड यांच्या ५९व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १११ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस. यांच्या हस्ते तर प्र.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण, डाॅ. रजनीश कौर सचदेव बेदी, डाॅ.विपुल दलाल, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.सुदर्शन सानप, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा.हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी बोलताना, डाॅ.राजेश एस. यांनी म्हटले…
