Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहलगाम, काश्मीर या ठिकाणी हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी जो अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ आज रविवारी (दि.२७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता साई चौक, पिंपरी येथून सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला ही घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सकल हिंदू समाज मोर्चा काढून निषेध करणार आहे. असे हल्ले…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्यात २८ एप्रिल रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त शहरात प्रशासन सेवेत नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा हक्क दिनानिमित्त शहरातील नागरिकांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, राज्य सेवा हक्क आयोग व आपले सरकार या पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध सेवांचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधीना या अधिनियमाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील महानगरपालिका…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशभरातून पर्यटक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. मासूम, निष्पाप, बेगुना पर्यटकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात सत्तावीस पर्यटक मृत पावले. त्यांच्या चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून, मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. हा संदेश सामुहीकरित्या एकत्रित येवून मेणबत्ती पेटवून त्यांना श्रद्धांजली आज संध्याकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर वाहन्यात आली. प्रवासीयांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला . यावेळी चिंचवड रेल्वे स्थानकाच्या प्रमुख शोभा वर्मा, प्रवासी , सीजीएस विभागाचे सतीश गायकवाड, प्रमोद काळे, आरपीएफ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मूळचंद चौरासिया, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार ,पदाधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे स्वामी विज्ञानानंद’ या विषयावर तृतीय पुष्पाची गुंफण करताना वर्षा तोडमल बोलत होत्या. माजी महापौर अपर्णा डोके अध्यक्षस्थानी होत्या; तसेच गीतल गोलांडे, चंद्रकला शेडगे, प्रभा इंदलकर, मंदाकिनी चोपडे, कस्तुरी जमखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हेमा सायकर यांनी प्रास्ताविकातून, ‘शिवबांना घडविणाऱ्या जिजाऊ या आजही समाजाला प्रेरक आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गांधीपेठ तालीम मित्रमंडळ विविध उपक्रमांचे आयोजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष इकबाल खान होते. श्रद्धांजली अर्पण करताना मृत व्यक्तींच्या शोकाकूल परिवाराच्या दुःखात आम्हीही सहभागा आहेत, अशी भावना प्रकट करण्यात आली. बीना एज्युकेशनल सोसायटीचे कोषाध्यक्ष हमजा खान, सरचिटणीस आजम खान, सहसचिव अकमल खान, विश्वस्त अब्दुल्लाह खान, मतलूब उस्मानी, बीना इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका समीना मोमीन, उपमुख्याध्यापिका हेरा अकमल खान, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघाकडून काश्मीरमधील पहलगाम येथील अलीकडील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी’मुस्लिम शिकलगार समाज नेहमीच देशाशी आणि महाराष्ट्र राज्याशी एकनिष्ठ राहिला आहे. या क्रूर कृत्यामुळे अनेक निरपराध नागरिक आणि आपले शूर बंधू शहीद झाले असून, या घटनेमुळे आम्हाला तीव्र दुख: आणि संताप झाला आहे. आम्ही या हल्ल्यात शहीद झालेल्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति गहिर्‍या संवेदना व्यक्त करतो. या दु:खदायी प्रसंगी आम्ही शहिदांच्या कुटुंबीयांच्या आणि जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत!’ अशी भावना व्यक्त करण्यात आली. या दुःखद प्रसंगी, सर्व उपस्थितांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरातील व महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवले जात नाहीत घरेलू कामगार म्हणून अधिकृत मान्यता दिली जात नाही घरेलू कामगारांचे संकटमयी जीवन पाहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कायदा करण्याचा आदेश दिले मात्र केंद्र सरकारकडून अजूनही कुठल्याही प्रकारची पावले उचलली गेली नाहीत. राज्य शासन असलेल्या कायद्यांमध्ये निधी न दिल्याने मंडळ मृत अवस्थेत आहे ते पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघ प्रयत्नशील राहून त्यांच्यासाठी कायदा व अंमलबजावणी नाही झाल्यास देशव्यापी लढ्याची सुरुवात महाराष्ट्रातून करण्याचा निर्धार आज हजारोंच्या संख्येने मुंबई येथे झालेल्या देशातील पहिल्या घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत…

Read More

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला. यावेळी दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) मध्ये यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांनी संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करत शोकाकुल परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असा संवेदना यावेळी व्यक्त केल्या. संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा , संचालिका तेजल शहा समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्‍हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, सीबीएसईच्या प्राचार्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारच्‍या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्‍या जात आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करताना काही अडचणी आल्‍यास संपर्क साधण्याचे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले आहे. बांधकाम कामगारांच्‍या योजनांची जनजागृती करून योजनांचा लाभ कामगारांना मिळावा म्‍हणून कष्टकरी कामगार पंचायतच्‍या वतीने शहरात बांधकाम मजून जनजागृती विशेष अभियान राबविले जात आहे. या योजनेअंतर्गतन कामगारांमध्ये योजनांची जनजागृती केली जात आहे. पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात या अभियांनातर्गत बाबा कांबळे यांनी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी कष्टकरी कामगार पंचायतचे जिल्हा अध्यक्ष राजू सावळे,…

Read More