Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम नगर येथून निघालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. तसेच कामगार नगर व संत तुकाराम नगर परिसरात पायी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये भोसरी, चाकण, आळंदी, पिंपरी,चिंचवड, सणसवाडी,शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील हजारो कामगार व नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला साम टीव्ही चे पत्रकार गोपाळ मोटघरे,पीटीआय…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आला.फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जी चळवळ झाली व त्यात 106 लोकांना होताम्य प्राप्त झाले त्या सर्वांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सलीम सय्यद यांनी प्रस्थाविक केले. या वेळी प्रमुख पाहुणे सचिन कांबळे यांनी उपस्थित राहून कामगार दिनाचे महत्व व अन्य माहिती दिली. ज्यांचा नेहमी समाजाला उपयोग होतो,समाजाप्रती आस्था असते,दायित्व घेतात,समाजाप्रती काहीतरी देणे आहोत अशी प्रतिमा असणारे आरोग्य,मैकेनिक,वर्कशॉप,अनाथ आश्रम,वृद्धाश्रम,इंडिस्ट्रिज,हॉस्पिटल. आदी विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ने महापालिका श्रेणीत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे स्थान पटकावले आहे. गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India – QCI) घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५. ७१ गुण मिळाले असून, उल्हासनगर महापालिका अवघ्या काही गुणांनी (८६. २९) प्रथम क्रमांकावर राहिली. महानगरपालिकेची ही कामगिरी म्हणजे राज्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा व नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखड्यात राज्यातील ४८ विभाग…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने परशुराम जयंतीचे औचित्य साधून चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ अतिशय जोरदारपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ४०० महिला उपस्थित होत्या. चैत्रगौर सजावट अतिशय व सुंदर आरास केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पेहेलगाम येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विष्णुसहस्त्रनामाचे पठण आणि परशुरामांचे स्तोत्रही पठण करण्यात आले. शृंगेरी मठ येथे जाऊन भगवतगीता कंठस्थ करून संपूर्ण गीता पठण करण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्रिया जोग यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वच्छंदी…

Read More

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून ध्वजारोहणाचा सन्मान मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना लाभला. राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, समृद्ध सांस्कृतिक वारशाला, आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता. या राज्याने आपल्याला ओळख, संधी आणि अभिमान दिला असून, त्याच्या उज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा अशा प्रसंगी मिळते, असे आमदार शेळके यांनी सांगितले. कार्यक्रमास वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, पंचायत समितीचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिजाऊ रथयात्रे’चे पिंपरी-चिंचवड शहरात भव्य आयोजन करण्यात आले. सर्व जातीधर्मात सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या रथयात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील मैदानावर सायंकाळी आठ वाजता झाला. या ऐतिहासिक सोहळ्यात आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अर्जुन तानपुरे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड आणि जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रेची सुरवात १८…

Read More

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गौरव महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रे’चे मावळ तालुक्यात भव्य आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्राभिमान, सांस्कृतिक गौरव आणि ऐतिहासिक जाणीवेचा संगम पहायला मिळाला. वडगाव मावळ येथे दुपारी चार वाजता आणि त्यानंतर लोणावळा शहरात संध्याकाळी पाच वाजता रथयात्रेचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी “तोच उत्साह, तोच जयघोष, आणि आपल्या मातृभूमीच्या गौरवासाठी तोच अभिमान!” अशी भावना प्रत्येकाच्या मनात दिसून आली. या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार व उच्च शैक्षणिक मूल्य जपत नावलौकिक प्राप्त केला आहे. (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) च्या टीम मेव्हरिक इंडिया संघाने अमेरिकेत व्हॅन नुयस, कॅलिफोर्निया येथे चार ते सहा एप्रिल दरम्यान जागतिक स्तरावरील एअरोडिझाईन स्पर्धेत आशिया खंडात द्वितीय क्रमांक तर जागतिक स्तरावर सहावा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जगभरातील सत्तरहून अधिक विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.      टीम मेव्हरिक इंडियाने डिझाईन रिपोर्ट विभागात सर्वाधिक गुण मिळवत जगात दुसरे स्थान पटकावले. तसेच मिशन परफॉर्मन्स मध्ये सहावा क्रमांक मिळवून भारतीयांच्या शैक्षणिक, अभियांत्रिकी कौशल्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शिवसेनेतील पक्ष प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. पिंपरी- चिंचवड मधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना महिला उपनेत्या सुलभाताई उबाळे,  युवासेना पुणे जिल्हा समन्वय सागर पाचरणे यावेळी उपस्थित होते. गंगाबाई हवालदार,अश्विनी सोपान पुनावडे, शुभम कदम , रोहित चिलवंत, सूरज भोईर, सागर दसवते, सौरभ गावडे, पियुष राजगुडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. खासदार बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘कामगार चळवळ अतिशय क्षीण झाली असून कंत्राटी आणि असंघटित कामगार आपला लढा कसा देणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ असे विचार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. राजा दीक्षित यांनी  चिंचवड येथे व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित तेहतिसाव्या श्रम – उद्योग परिषदेत विविध पुरस्कार प्रदान करीत असताना डाॅ. दीक्षित बोलत होते. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी परिषदेचे उद्घाटन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डाॅ. सुनीताराजे पवार…

Read More