Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चने (पीसीसीओईआर) शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले असून उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. पीसीसीओईआरने एकाच दिवसात ७८ कॉपी राईटची नोंद करून आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागाने बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (आयपीआर) एक उल्लेखनीय टप्पा गाठला. आयटी विभागाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) निर्मितीचे संरक्षण कसे करतात आणि योग्य मान्यता कशी सुनिश्चित करतात. आयपीआर व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या अद्वितीय कल्पना, शोध आणि कार्यांचे संरक्षण कसे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिमबर, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी केली. या…

Read More

छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘धर्मग्रंथांचे केवळ पारायण करण्यापेक्षा जागरूकपणे आत्मसात केलेली समर्थ रामदासस्वामी रचित दासबोधातील एक ओवीदेखील आयुष्य समृद्ध करेल!’ असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०४ मे २०२५ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘श्री समर्थांचे नेटवर्किंग’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना समीर लिमये बोलत होते. स्टर्लिंग हॉस्पिटलचे संचालक डाॅ. अभिषेक करमाळकर, उद्योजक अजय मुंगडे, विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून, ही कारवाई धाडसी आणि ऐतिहासिक ठरली आहे, अशी ठाम भूमिका भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने दाखवलेले धैर्य आणि कौशल्य देशासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. “पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारताने शांततेच्या मार्गावर न चालता ठोस आणि थेट कारवाई केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त लष्करी अभियान नव्हते, तर भारताच्या स्वाभिमानाचे ज्वलंत उत्तर होते,” असे आमदार जगताप म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला या…

Read More

महानगरपालिकेच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्वीकारले प्रमाणपत्र, मंत्रालयात पार पडला विजेत्यांचा गुणगौरव सोहळा मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त श्रेणीत’ संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आज, बुधवारी (७ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. मुंबई येथील मंत्रालयात मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त विठ्ठल जोशी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संत साहित्य, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सर्वाना सहज अल्पदरात उपलब्ध व्हावी. यासाठी आळंदी देवस्थानला ग्रंथराज ज्ञानेश्वरी छपाईस १ कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देत आहे. मराठी भाषा विभागाचे वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. पावन , इंद्रायणी नदीचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी उदयॊजकांचे सहकार्याने शासनाचे माध्यमातून नद्या प्रदूषण मुक्त करणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी आळंदी येथे केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आळंदी ग्रामस्थ आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात मंगळवारी ( दि. ६ ) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह अन्नदान, ज्ञानदान यज्ञाचे आयोजन उत्साहात हरिनाम गजरात करण्यात आले. यामध्ये सकाळी सहा ते दहा या वेळात एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात पारायण सोहळा हरिनाम जयघोषात झाला. पहिल्या सत्रात प्रसाद महाराज बडवे, दुसऱ्या सत्रात कीर्तन सेवा पांडुरंग महाराज घुले यांनी सेवा रुजू केली. दरम्यान चार वाजता रामकृष्ण महाराज लहवितकर यांची प्रवचन सेवा झाली. चरित्र चिंतन सेवेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चरित्र…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र धुरांचे लोळ..सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे फोन खणाणले… लगेच सर्वत्र सायरनचा आवाज…यावेळी उपस्थित दोन हजार नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….सर्वत्र धावाधाव सुरु… काहीतरी आपत्ती जनक घटना घडली म्हणून सुरक्षा यंत्रणेने तत्काळ चक्रे फिरवली…आणि अग्निशमन विभागाची वाहने त्वरीत पोहोचली आणि प्रशासकीय भवनात असलेल्या २ हजारांहून अधिक कर्मचारी,नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. या घटनेत ८ पुरुष व २ महिला जखमी झाल्या त्यांना ॲम्ब्युलन्सच्या मदतीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. अवघ्या १५ मिनिटात भयावह परिस्थिती आटोक्यात आणली गेली,तेव्हा नागरिक व कर्मचाऱ्यांनी सोडला निश्वास.. या घटनेला निमित्त होते केंद्रीय गृह विभागाने…

Read More

– सांगवीतील उद्यानांतील असुविधेबाबत नाराजी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी परिसरातील शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी या उद्यानांना आमदार शंकर जगताप यांनीमहापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. उद्यानातील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे, उद्यान परिसरात दारुड्याचा वावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, सारिका भंडलकर, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, गणेश सहकारी बॅक संचालक प्रमोद ठाकर, हेमंत निगुडकर, महानगर बॅंक संचालक नितीन खोडदे, शारूख सय्यद, अमोल गायकवाड,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सायबर गुन्हेगार हे बहुतांश वेळा सुशिक्षित लोकांना, मध्यम वयातील व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात. घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवणे, बक्षीस देणे, मोफत कर्ज देणे असे आमिष दाखवून फसवितात. बँकेतून, सरकारी कार्यालयातून, विद्युत विभाग किंवा एमएनजीएल येथून बोलत आहे असे सांगून बोलण्यामध्ये गुंतवून लिंक क्लिक करायला सांगितले जाते. मोबाईलवर ओटीपी किंवा सायबर फ्रॉड करणाऱ्या लिंक पाठवून माहिती विचारली जाते ही माहिती किंवा आलेला ओटीपी त्यांना देऊ नये. कोणत्याही लिंक वर क्लिक करून बक्षिसाच्या आमिषाला बळी पडू नये. आपले आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नये, नेहमी सतर्क रहावे. आपण सतर्क राहिलो तर स्वतःला व कुटुंबाला सायबर गुन्हेगारी…

Read More