- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार आणि मराठी साहित्य याचा अनुबंध साधण्याच्या सफल प्रयत्नातून महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित कामगार सत्कार आणि कविसंमेलनात २२ कवी कवयित्रींनी कामगार आणि मी मराठी या विषयांवर विविध कवितांचे सादरीकरण केले आणि मालक आणि कामगार यांचे संबंध कसे असायला हवे याबाबत कामगार या कवितांमधून आपली भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात जालिंदर कांबळे, सायली थोरात, स्वानंद राजपाठक, समाधान शिंदे, संजय भगत आणि विजय चव्हाण या कामगारांचा शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर उद्योजक विक्रम माने, अतुल इनामदार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिपंरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संरक्षणासाठी यापुढील काळात हरित इमारती बांधणे आवश्यक आहे. हरित इमारत बांधकाम जमीन, सामग्री, ऊर्जा , पाण्याचा कार्यक्षम वापर करते. तसेच यात ऊर्जा कार्यक्षमता वाढ, पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे हरित इमारती या पर्यावरणपूरक असतात. वास्तू रचनाकार आणि स्थापत्य अभियंता यांनी हरित इमारती बांधणीवर भर दिला पाहिजे असे मत स्प्राउट कन्सुलन्सीच्या संचालक नम्रता धामणकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) यांच्या संयुक्त विद्यामानें “इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे उद्दिष्टे आणि हरित…
– कोणत्याही परिस्थितीत TP Scheme होवू देणार नाही! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘भूमिपुत्रांचा स्वाभिमान आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष’’ हेच माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासन TP Scheme लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये TP Scheme होवू देणार नाही, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी ग्रामस्थ, भूमिपुत्रांना दिला आहे. टाळगाव चिखली येथे श्री गणेश मंदिरामध्ये आज श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, भूमिपुत्रांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक आमदार महेश लांडगे यांना मागणीचे निवेदन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही आठवड्यापासून नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे संभाव्य पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे दरम्यान सद्यस्थितीत जुलै पर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. शहरातील बोअरवेलचे पाणी देखील आटले आहे. त्यात टँकरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोसायट्यामधील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा देखील बंद आहेत, अनधिकृत नळ कनेक्शन वाढले आहेत. शुद्ध पाण्याचा गाड्या धुण्यासाठी वापर केला जात आहे. या सर्व गोष्टीना आला आला घालण्यासाठी आणि नागरिकांना पावसाळ्यापर्यंत शुद्ध पाणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्वाच्या उपाय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबईतील कामगारांनी 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा पुरस्कार दिला व त्यानंतर ज्योतिराव फुले हे महात्मा ज्योतिराव फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आता 137 वर्षांनंतर 11 मे या दिनांकचे औचित्य साधत दिनांक 9 मे 2025 रोजी कामगार कष्टकरी श्रमिक शेतकरी व उद्योजकांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार बहाल करत आहे. पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेच्या वतीने दिनांक 9 मे 2025 रोजी ग दि माडगूळकर नाट्यगृहात दुपारी २.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभुराजे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यंत्रणेची महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी कार्यालयात मंगळवारी (दि.६) आढावा बैठक झाली. यात महानगर आयुक्त यांनी संभाव्य आपतकालिन परिस्थितीचा विचार करून पीएमआरडीएची यंत्रणा अलर्ट ठेवत नालेसफाईची मोहीम तातडीने हाती घेण्याचे निर्देश विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. मान्सूनपूर्व रस्त्यांची कामे, दुरुस्ती तातडीने करत मोकळ्या जागांवर टाकलेल्या डेब्रिज न उचलणाऱ्या संबंधित जागा मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी बैठकीत दिले. पीएमआरडीए हद्दीतील काही भागात सर्रासपणे डेब्रिज टाकण्यात आले आहे, अशा जागा मालकांनी ते तातडीने उचलून घ्यावे, अन्यथा संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुणे महानगर आपत्ती…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024-2025 रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. इंद्रायणी महाविद्यालयच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून, कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे या विद्यार्थिनीने 94.83% इतके गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकवला. वाणिज्य शाखेतून श्रुतिका जाधव या विद्यार्थिनीने 90.5% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कला शाखेतून कुंदन बोरे या विद्यार्थ्याने 86.17 % गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर तंत्रशिक्षण विभागातून विनायक होटकर या विद्यार्थ्याने 76.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27 टक्के इतकं आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, 2021 साली महाराष्ट्र निवडणूक आयोगानं वाशिम, अकोला, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आणि एससी/एसटींना 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देणारं नोटिफिकेशन जारी केलं होतं. याविरोधात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द करत इथल्या ओबीसी उमेदवारांसाठीची निवडणूकही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली होती. यानंतर 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारनं आव्हान दिलं होतं. मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका फेटाळून लावली…
पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षक चौक पिंपळे निलख येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून सबवेचे काम चालू आहे. या सबवेला पिंपळे निलख येथिल प्रथम नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कै प्रभाकर साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी आपचे रविराज काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 1986 साली त्यांनी पिंपळे निलख येथिल नागरिकांना येण्या – जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.रस्ता मिळवण्यात त्यांचा अग्रेसर सहभाग होता.त्यामुळे त्यांचे नाव या सबवेला देणे हा त्यांचा सन्मान असेल.त्यांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांचे नाव या सबवेला द्यावे.अशी मागणी आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षाच्या परीक्षेत चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी संचलीत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. सालाबाद प्रमाणे या वर्षीही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल एकूण निकाल 96 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, संचालिका डॉ.तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा ,प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी यशस्वी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे…
