- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारची ५० टक्के हिश्याची रक्कम तातडीने द्यावी. त्यामुळे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल. निधी तत्काळ देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना तिस-या आणि चौथ्या ट्रॅकची सविस्तर माहिती दिली. त्यासाठीचा राज्य सरकारचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी केली. खासदार बारणे म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून पुणे, लोणावळा दरम्यान तिसरा व चौथा ट्रॅक व्हावा यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मागणी आहे. २०१४ मध्ये मी निवडून आल्यानंतर त्यासाठी…
इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर , प्रदूषण मुक्त करणार :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदी भक्त निवासासाठी २५ कोटी जाहीर ; ज्ञानभूमी प्रकल्पास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक, भाविकांचे श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्रे सरकार, राज्य शासन तसेच सर्वांचे सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याची ग्वाही देत….आळंदी देवस्थानचे ज्ञानभूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास २५ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाचे माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील 42 ‘मिसिंग लिंक’ साठी दि. 25 मे पूर्वी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कालबद्ध नियोजन केले जाईल. त्या अनुशंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यवाही करणार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ मुळे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवड शहराशी निगडीत विविध मुद्यांवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी यांच्यासोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘मिसिंग लिंक’, भूसंपादन, डुडुळगाव इको टुरिझम पार्क, महावितरण संबंधित कामांकरीता निधीची उपलब्धता, गायरान जमीन महापालिका हस्तांतरण प्रकरणे आदी मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना किरण माने बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते; तसेच पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, संदीपान गायकवाड, शिवलिंग ढवळेश्वर, प्रताप गुरव, अनिल सूर्यवंशी, गणेश लंगोटे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, ‘आपल्या देशातील राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकहिताच्या दृष्टिकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्यात यावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रशासनाचे संचालक कार्य. अतुल गाडगीळ यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत सचिन चिखले यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला लागून मावळ हा भाग येतो. सध्या पिंपरी ते भक्ती-शक्ती, निगडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर चालु आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी महामेट्रोचे बजेट सादरीकरण झाले. या दरम्यान, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले तसेच बजेट विषयी व त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट विषयी चर्चा करण्यात आली. पुणे व…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्यात चाराटंचाई भासल्याने दिनेश यादव यांनी शेतातील चारा गोशाळेसाठी उपलब्ध करून दिला.छत्रपती शंभूराजे गोशाळा भोसरी व चंद्रभागा गोशाळा चिखली येथे चारा देऊन गोमातेची पूजा केली, चारा टाकला व तिचे दर्शन घेतले. गोमातेची सेवा ही केवळ परंपरा नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे अनेक ठिकाणी गोशाळेसाठी चारा मिळत नाही त्यात हिरवा चारा मिळणे अवघड आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून दिनेश यादव मित्रपरिवार वतीने जेवढा शक्य होईल तेवढा चारा गोशाळा उपलब्ध होईल तो देण्याचा प्रयत्न करीत आहेत स्वतःच्या शेतातील हिरवा चारा गोशाळेसाठी देण्यात आला.भारतीय समाजामध्ये गोमातेचं स्थान मातेसमान आहे. तिची सेवा केल्याने केवळ पुण्यच…
सांगली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने सांगली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना भवाळकर म्हणाल्या की, ”नारायण सुर्वे यांनी साध्या भाषेत सामान्यांच्या दुःखाची कविता लिहिली. त्यांनी फक्त कष्टकऱ्यांवर कविताच लिहिली नाही तर कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष काम केले.” अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, ”यंदाचे वर्ष हे नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने अकादमीच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम…
टीपी स्कीम तातडीने रद्द करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा चिखली ग्रामस्थांचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन शहराचा डीपी आराखडा अंतिम टप्प्यात असतानाही चिखली आणि चऱ्होली गावांमध्ये टीपी स्कीम राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सदर टीपी स्कीम तातडीने रद्द करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. टाळगाव चिखली येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या वतीने आज ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्यासह चिखली गाव परिसर, जाधववाडी, कुदळवाडी, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती या भागातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, लोणावळा येथील माजी नगरसेविका कल्पना आखाडे,माजी नगरसेविका सिंधु परदेशी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव राजेश वाघोले, ठाकरे गटाचे मावळ तालुका संघटक मदन शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताशेठ केदारी, शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, शीलाताई भोंडवे,शिवसेना महिला शहर संघटिका शुभांगी काळंगे उपस्थित होते. ठाकरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या ताथवडेतील पशुसंवर्धन केंद्राच्या ६५ हेक्टर जागेत सेंट्रल पार्क उद्यान विकसित करावे. ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, ताथवडे परिसर पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ६५ हेक्टर जागा आहे. ही जागा ब्रिटिश काळापासून आरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. चारही बाजूंनी शहराचा विस्तार होत आहे. मोठं मोठ्या…
