- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ज्ञानेश्वरमाउलींचे पसायदान ही सकारात्मक विचारांची विश्वप्रार्थना आहे!’ असे प्रतिपादन डाॅ. चंद्रकांत शेंडकर यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘सकारात्मक विचारांचा प्रभाव’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. चंद्रकांत शेंडकर बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ – चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, ‘संवाद अन् संपर्क यांच्यातील उत्तम समन्वयातून ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड विविध दर्जेदार उपक्रम राबवित असतो. २९ वर्षांपासून सुरू असलेली वासंतिक व्याख्यानमाला हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजीमहाराज यांनी जगाला दाखवले; तर देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांनी शुक्रवार, दिनांक ०९ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना प्रा. नितीन बानगुडे – पाटील बोलत होते. बांधकाम व्यावसायिक सागर धुमाळ अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक भगवान पठारे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नरेंद्र बनसोडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासनाची प्रस्तावित TP Schem अखेर रद्द होणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भूमिपुत्र आणि ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली. सुमारे तीन तास सुरू असलेल्या बैठकीमध्ये लांडगे यांनी ग्रामस्थ, भूमिपुत्रांची भूमिका ठामपणे मांडली. पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून 3 ते 4 वेळा आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. 1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘पीसीएमसी @ 50’ व्हिजन मोहिमेंतर्गत नागरिक सर्वेक्षणाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये झाली आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या २५० हून अधिक प्रशिक्षित महिलांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. २०३२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. महापालिकेच्या या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास धोरणासाठी जवळपास २० हजार नागरिकांचा फीडबॅक गोळा करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने सक्षमा उपक्रमा अंतर्गत ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचा सिटी ट्रान्सफॉर्मेशन उपक्रम (सीटीओ) सहकार्य करीत आहे. या सर्वेक्षणात निवासी व्यक्ती, व्यावसायिक आस्थापने आणि…
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळवासीयांच्या आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी आंबी येथे उभारण्यात आलेले ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’ लवकरच सुरु होणार आहे. आज या हॉस्पिटलला आमदार सुनील शेळके यांनी भेट दिली आणि या प्रकल्पाबद्दल विश्वास व्यक्त केला की, हा प्रकल्प मावळवासीयांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरेल. वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांप्रमाणेच, हे नवीन आणि सुसज्ज हॉस्पिटल मावळमधील नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच खुले होणार आहे, ही आनंदाची बाब आहे, असे आमदार शेळके यांनी भेटी दरम्यान सांगितले. या अत्याधुनिक रुग्णालयात रुग्णांसाठी तब्बल ६५० बेड्सची सोय असणार आहे. यासोबतच, येथे ९ सुपर स्पेशालिटी ऑपरेशन थिएटर्स, ६४ अत्याधुनिक आयसीयू बेड्स आणि…
पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जशी शहर वाढत गेली तशी लोकसंख्या वाढली आणि त्या सोबत वाढली कचऱ्याची समस्या आणि शहरात कचऱ्याचे ढीग उभे राहू लागले.त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास सुरू झाला आणि यावर कोणतीही उपयोजना पालिकेकडे नव्हती. पालिका प्रशासन नेहमीच या बाबतीत आपली अनास्था दाखवत आलीच आहे आणि आता ही दाखवतेच आहे यावर प्रत्युत्तर म्हणून हीच बाब रविराज काळे यांनी हेरली आणि विचार सुरू झाला हे कस सुधारता येईल आणि जन्म झाला कचऱ्यातून सेल्फी पॉईंट या संकल्पनेचा शहरातील कचऱ्याचे ढीग बाजूला सारून तेथील जागा व्यवस्थित रंग रांगोटी करून तिथे सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले. याची सुरुवात पिंपळे निलख बस स्टॉप च्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आज महाराष्ट्र देशामध्ये शेती, शिक्षण, उद्योग क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या या सर्वांगीण प्रगतीमध्ये देश, परदेशात विखुरलेल्या मराठी जणांचे योगदान उल्लेखनीय आहे. उद्योग, रोजगार निमित्त दुबई मध्ये स्थायिक झालेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुबई येथे रविवारी (दि.४ मे) मराठी प्रोफेशनल्स या संस्थेच्या वतीने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पध्दत वेगळीच आहे. सर्वसामान्य लोकांसाठी 18-18 तास काम करणार नेता महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदेच्या रूपाने पहिलांदाच बधितला असेल. त्यामुळे आज त्यांना जो श्रम महर्षी पुरस्कार देण्यात येत आहे. ही त्याच कार्याची पावती आहे, असे उद्गार राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काढले. पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, डमार्क मल्टीवेंचर कंपनीचे संचालक गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे सुरू होणाऱ्या या अभ्यासवर्गात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सप्टेंबर २०२५ मधील पूर्वपरीक्षेची तयारी केली जाणार आहे. शनिवारी दुपारी ३:०० ते रात्री ९:०० आणि रविवारी सकाळी ७:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अभ्यासवर्गात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती, एस. एस. बी. प्राथमिक ओळख, व्यक्तिमत्त्व विकास, एकत्रित चर्चा, व्यायाम असे उपक्रम राबविले जातील. सुमारे ३९ वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारून ग्रंथालय आणि…
