- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आमच्यावर सोपवली. या सात वर्षांच्या कार्यकाळात पक्ष तसेच जनता जनार्दनाचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला महापालिकेत ‘नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष, स्मार्ट सिटी संचालक, गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही संधी माझ्यासाठी केवळ सन्मानाची नाही, तर जबाबदारीचीही होती. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यानुसार, मंडळाने सोमवारी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसर्या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल. कुठे पाहता येईल निकाल? https://results.digilocker.gov.in https://sscresult.mahahsscboard.in http://sscresult.mkcl.org…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व सेलिब्रिटी होण्याचा हट्ट सोडून शेवटपर्यंत स्वतःतील कलाकार जिवंत ठेवून अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे मत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते संतोष जुवेकर यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सवकारी-२०२५” च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव प्रा.डाॅ.महेश चोपडे, अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक डाॅ.मुक्ता अवचट, समन्वयक…
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन लोगोचे अनावरण भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी पुणे आयोजित शनिवार दि. १७ मे रविवारी १८ मे २०२५ रोजी पुणे येथे होणार्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५ चे ( Marathi Language Minister Uday Samant unveils the Epic Poetry Conference logo) उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना महाकाव्यसंमेलन सस्नेह निमंत्रण पत्रिका देण्यात आली .त्यांना आमंत्रित करताना नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे (वादळकार), सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, आमदार तुकाराम काते, सचिव प्रीती सोनवणे व डॉ.अलका नाईक,संदीप लिंगायत,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ(shree swami samarth) सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिंचवड यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ पासून तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेचा ( Shri Swami Samarth Lecture Series to begin from May 15) प्रारंभ होत असून श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे रोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यान सुरू होईल. व्याख्यानमालेत गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी ज्येष्ठ समुपदेशक दत्ता कोहिनकर ‘मनाची अमर्याद शक्ती व समाजस्वाय्थ’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. शुक्रवार, दिनांक १६ मे २०२५ रोजी प्राचार्य प्रदीप कदम ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक…
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ(dagdusheth) हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला ( Mahanaivediya of 5 thousand jackals to Bappa) दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक…
सांगुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंदोरी ते सांगुर्डी (indori to sangurdi) या मुख्य रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके(mla sunil shelke) यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडले. मावळ व खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार शेळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे PMRDAच्या माध्यमातून ₹ ७.६४ कोटींचा निधी मंजूर होऊन कामाला गती मिळाली आहे. हा रस्ता तयार झाल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सांगुर्डी व इंदोरी गावांमध्ये सुरक्षित, सुगम आणि सक्षम दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे. कार्यक्रमात मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, PMRDA सदस्य वसंत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहू- आळंदी रस्त्यावर चिखली-पाटील नगर येथील अत्यंत रहदारीच्या ठिकाणी महावितरण प्रशासनाचा जुना ट्रान्सफॉर्मर (old tranfarmer) होता. त्यामुळे रस्त्यात अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडीची समस्या नियमित भेडसावत होती. याची दखल घेत आमदार महेश लांडगे (mla mahesh landge)यांच्या सूचनेनुसार, ट्रान्सफॉर्मरस्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ट्रान्सफार्मर स्थलांतरीत करण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, समाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, अंकुश मळेकर, मोरे काका, जितेंद्र यादव, संतोष मोरे, दिनेश यादव, योगेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली- पाटीलनगर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती(punyshlok ahiyadevi holkar jayanti mahotsav samiti) पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होणाऱ्या मध्यवर्ती जयंती महोत्सवासाठी तसेच पुढील वर्षभरातील सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. वीणा दत्तानंद सोनवलकर (veena sonvlkar) यांची नियुक्ती सर्व समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. आज रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी काळेवाडी येथील आरंभ बँकव्हेट हॉल या ठिकाणी सकाळी 11 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व समिती सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मावळते अध्यक्ष श्री धनंजय…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘इतना तो याद हैं मुझे…’ या संस्मरणीय हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) शुक्रवार, दिनांक ०९ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, ॲड. अंतरा देशपांडे, मोहनकुमार भस्मे, नीलेश भिंगारे, विनिता भिंगारे, मल्लिकार्जुन इंगळे, साहेबराव कावळे, तुषार कदम, राजेंद्र पगारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विनायक कदम, नंदकुमार कांबळे, अनिल जंगम, अरुण सरमाने, डॉ. सायली बांबुरडे, नेहा दंडवते, डॉ. किशोर वराडे, पिनाक…
