- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण येथील मेदनकरवाडी भागामध्ये कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तीच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहा वाजता घडली. या पिडीतेला न्याय मिळावा आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी.यासाठी फास्टट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात यावा.तसेच एमआयडीसी भागातील महिला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने योग्य सुरक्षा पुरवाव्यात. यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्योगमंत्री, पोलीस प्रशासनाला पत्र देत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांनी केली आहे. याबाबत सुलभा उबाळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर…
वेदिका सिद्धवगोल ९७.६० टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विशेष म्हणजे अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या पुढे गुण संपादन केले आहेत. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वेदिका सिद्धवगोल हिने ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर रिद्धीश तोरवणे याने ९६.०० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर श्लोक शिंदे याने ९५.८० टक्के मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. प्रज्ञा कोतवाल हिने ९५.६० टक्के गुण मिळवत चौथा आणि श्रेया काला व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) स्वागत केले आहे. काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी सर्वप्रथम संघाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अखंड भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे आणि पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन काटे यांचे अभिनंदन केले याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समन्वय समितिचे सर्व प्रमुख पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.…
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी प्रमाणेच पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलने यंदाही सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के तर, बारावीचा ९८ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. चॅलेंजर पब्लिक स्कूलने दहावीत सतत पाच वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता बारावीतील सिद्धी पाटिल हिने ९९.४० टक्के गुण मिळवीत प्रथम तर, अमन किशोरे याने ९७.८० टक्के गुण मिळवीत द्वितीय, परी अग्रवाल ९७.६० टक्के मिळवीत तृतीय आणि पलकप्रीत भुल्लार ९७.२० टक्के, सारा देशपांडे ९५.६० टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने चौथा आणि पाचवा क्रमांक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लाईटहाऊस प्रकल्प हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून, युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे परिवर्तनाचे व्यासपीठ आहे. येथील प्रशिक्षणामुळे तरुणांच्या सुप्त गुणांना चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सशक्त पाया उभारण्यात मदत होत आहे. प्रत्येक युवकामध्ये प्रचंड ऊर्जा आणि कल्पनाशक्ती असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची गरज आहे. लाईटहाऊस हे याच संधीचे दार आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी आज निगडी येथील कौशल्यम – लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्राला भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वीरित्या नोकरी मिळविलेल्या युवक युवतींशी आयुक्त सिंह यांनी थेट…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड मधील कामगार एकनाथ रमेश उगले यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ३६व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ या सोहळ्यात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करून कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते; तसेच राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार मनोज जामसुतकर, मनीषा कायंदे, प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डाॅ. एच. पी. तुम्माडे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. अध्यात्म, साहित्य, समाजकारण, पर्यावरण या क्षेत्रांत सक्रिय योगदान देणाऱ्या एकनाथ उगले यांनी ‘सुवर्णसुखाचा निर्झरू’…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमृत भारत योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे या चार स्टेशनचा कायापालट केला जात आहे. कामात काही ठिकाणी त्रुटी आहेत. त्यात सुधारणा करावी. कामाचा दर्जा राखावा, दर्जेदार काम करावे. मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. खासदार बारणे यांनी गुरुवारी रेल्वे स्टेशनवर जाऊन कामाची माहिती घेतली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रेल्वे स्टेशन सुधार अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती प्रवाशांना दिली. यावेळी पुणे अप्पर रेल्वे उपप्रतबंधक पद्मसिंह जाधव, पुणे मुख्य परियोजना प्रतिबंधक गती शक्ती युनिट संजय लोहत्रे, वरिष्ठ मंडल अभियंता विजय कुमार राय, वरिष्ठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकताच महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर), रावेत येथे एका दिवशी ६५ पेटंट्सची नोंदणी करत महाराष्ट्र दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत एक नवीन विक्रम केला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पेटंट्स पीसीसीओईआर मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नोंदवले आहेत. एकूण १३० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ६५ पेटंट्सचे लेखन करून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने बौद्धिक संपदा कार्यालय (पेटंट ऑफिस) मुंबई येथे यांची नोंद केली गेली. या उपक्रमाचे नियोजन बौद्धिक संपदा हक्क विभागाचे समन्वयक डॉ. राहुल बावणे यांनी केले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवठा करणे, महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नेहरूनगर, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक एअर पोल्युशन कंट्रोल यंत्रणा बसविणे, कै. वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव, केशवनगर भाडे तत्वावर चालविण्यास देणे, महापालिकेच्या नर्सरीमध्ये वृक्षारोपणासाठी रोपे तयार करणे, प्रभाग क्र. ३ मोशी येथील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचा एकत्रित प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी हरकती व सूचना मांडण्या करिता 60 दिवसांची मुदत दिली आहे. शहराच्या भविष्यातील 50 वर्षांचा विचार करुन शाश्वत विकासाचा आमचा संकल्प आहे. त्या अनुशंगाने प्रशासाने सर्वसामावेशक ‘रोल मॉडेल डीपी’ (roll model dp)करावा. यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वोताेपरी प्रयत्न करणार आहे, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे( bjp mla mahesh landge) यांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. 14)झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाअन्वये आराखडा प्रसिद्ध केला. भारतीय जनता पार्टी आणि…
