- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे स्वीकृत संचालक पदी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवा निवृत्त सचिव सतीश चांभारे ( सुपेकर ) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, संचालक हिरामण सातकर, दत्तात्रय सातपुते, आनंदराव काळे, साहेबराव दुंडे, कार्यकारी संचालक नानासाहेब टाकळकर, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संजय घनवट, संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे, भास्कर जगदाळे यांचे उपस्थितीत सतीश चांभारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातून आलेले चांभारे हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० वर्षे सचिव पदावर सेवाभाव वृत्तीने कार्यरत होते. खेड…
श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज),- ‘केवळ घटनांची यादी म्हणजे इतिहास नव्हे; तर इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो!’ असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप कदम यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्राचार्य प्रदीप कदम बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते भास्कर रिकामे अध्यक्षस्थानी होते; तसेच व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव, गोरख पाटील, बापू शिंदे, गोपीचंद जगताप, अनिल मुळे, राजाराम वंजारी, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे…
पूर्णानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पि. चि. म. न. पा व पूर्णानगर विकास कृती समिती यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुल येथे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्या प्रसंगी राजेंद्र घावटे, पि. चि. शहर, कार्याध्यक्ष व्याख्यान्माला समिती अंकुश सुद्रिक, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष, श्रीकांत करोली, उधोगपती संजय नाना पठारे, उद्योजक पप्पू शेठ लोढा, सामाजिक कार्यकर्ते टाकळकर,जेष्ठ नागरिक, पालिकेचे सुभाष कांबळे, आरोग्य सहाय्यक निरीक्षक, सुरेखा हिंगडे, सहाय्यक अधिकारी, कैलास जगताप, पर्यवेक्षक अधिकारी, आदित्य पवार, पर्यवेक्षक अधिकारी, महेश सांगडे, पर्यवेक्षक अधिकारी अन्य सहकारी व नागरिकांचा देखील उस्फुर्त सहभाग होता. “स्वच्छता ही बाब आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते” या संकल्पनेवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर परिचारिकांची प्रतिज्ञा, प्रार्थना गीत आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी परिचारिकांसाठी सर्वोत्तम इन्फ्युजन पद्धती यावरील एका हँडबुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेमधील सहभागी विजेत्याना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त रुग्णालयाने नर्सिंग कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यात पुरुष कर्मचाऱ्यांची क्रिकेट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर क्षेत्रातील ११ लाख पीएमपीएमएल प्रवाशांपैकी सुमारे २२ टक्के प्रवासी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस कॉरिडॉरचा वापर करीत आहेत. पीएमपीएमएलच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या बीआरटीएसमार्फत दररोज २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे ही सेवा पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा ठरली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निगडी-दापोडी, दिघी-आळंदी, सांगवी-किवळे, काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड असे पाच बीआरटीएस कॉरिडॉर कार्यरत आहेत. हे कॉरिडॉर शहराच्या पूर्व – पश्चिम व उत्तर – दक्षिण भागांतील महत्त्वाच्या जवळपास १११ मार्गांना जोडतात. त्यामुळे ही सेवा एकप्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक रचनेचा…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सन २०२१ च्या पदव्युत्तर एम.डी./एम.एस. या अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या अभ्यासक्रमातील एकूण ३३ पैकी २१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यात अव्वल क्रमांक पटकावत डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी हे ‘गोल्ड मेडलिस्ट’ ठरले आहेत. यानिमित्ताने सन २०२१ बॅचचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी बोलताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व यशस्वी डॉक्टरांचे विशेष अभिनंदन केले. तसेच सर्जरी, मेडिसिन व बालरोग या तीन विभागांतील नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या डॉक्टरांचे विशेष…
– ग्रामीण हद्दीतील गावे शहरी नगर भूमापनला जोडणार! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी पुणे ग्रामीण हद्दीतील काही गावे शहरी नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील भूमि अभिलेख संदर्भातील कामकाजात गतीमानता आणि सूसुत्रता येणार आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भूमापन व भूमिअभिलेख कार्यालयाची सूसुत्रता करावी, अशी मागणी प्रलंबित होती. त्याला आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ग्रामीण हद्दीतील गावे नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करावी करावीत, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी…
आळंदी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते. डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तां सोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचने नुसार कार्यवाही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गत काही दिवसात नागरिकांसाठी उभारलेल्या उत्कृष्ट सेवा – सुविधांची शासनाने दखल घेत मुख्यमंत्री – १०० दिवस कृती आराखड्याच्या उपक्रमात पीएमआरडीएला महाराष्ट्रात तिसरे स्थान मिळाले. गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया QCI) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएला १०० पैकी ७६.०२ गुण मिळाले. पीएमआरडीएने अल्प कालावधीतच सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या अपेक्षित सोयी सुविधा आणि प्रशासकीय कामकाजातील गतीमानतेच्या आधारावर राज्य शासनाने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर शुक्रवारी (दि.१६) शिक्कामोर्तब केले. प्रशासकीय कामकाजातील नाविन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अशा काही मुद्द्यांच्या आधारे पीएमआरडीएने आपले वर्चस्व या विशेष कार्यक्रमातून सिद्ध करत…
पक्षात कोणाचीही नाराजी नाही; 20 दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर करणार पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी आज अधिकृतपणे शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समारंभात, पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक निरीक्षक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते मावळते शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले. मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक उंची गाठेल. त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य खूप चांगले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल,” असे आमदार शंकर जगताप म्हणाले.…
