Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच १५ जून २०२५ पासूनच शैक्षणिक साहित्यांचा समावेश असणारे एक किट देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्यामुळे अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर शैक्षणिक किटचे वितरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक किट वितरण प्रक्रिया ई-रुपी (e-Rupi) या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यामध्ये ई-रुपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये सुशोभिकरणावर भर देण्यापेक्षा प्रदूषण होणार नाही, अशा प्रकल्पांचा समावेश करावा. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. नदी प्रदूषण आणि महानगरपालिकेचा नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी याबाबत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, पर्यावरण प्रेमींनी सूचवलेले मुद्दे रास्त असून, त्याचा अंतर्भात नदी सुधार प्रकल्पामध्ये करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पिंपरी-चिंचवड…

Read More

अ‍ॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफले व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२५: नवा अभ्यासक्रम, नवी दिशा, यशासाठी नवी रणनिती’ या विशेष व्याख्यानमालेला बुधवारी (१३ मे २०२५) उत्साहात सुरुवात झाली. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अ‍ॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, याबाबत मोलाचा सल्ला दिला. निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन १३ मे ते २२ मे २०२५ याकाळात शहरातील विविध भागात सकाळी ११ ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर २६ येथील ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनने विकसित केलेल्या ‘ऑक्सिजन पार्क’ उद्यानाला मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी भेट दिली. उद्यानात फिरून औषधी वनस्पती, पक्ष्यांची माहिती घेतली. शहरातील इतर सोसायट्यांनी अशा प्रकारचे उद्यान विकसित करण्याचे आवाहनही खासदार बारणे यांनी केले. यावेळी राजेंद्र बाबर, ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनचे अध्यक्ष  विजय कुमार नाईक, सचिव धनंजय कदम, देवेंद्र खडसे, सोनल कुमार सिंधी उपस्थित होते खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ऑक्सिजन पार्क रेजीडेंसी असोसिएशनने मोकळ्या जागेचा सदुपयोग केला आहे. या जागेत ऑक्सिजन पार्क विकसित केले आहे. या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती आहेत. विविध प्रकारची १७०० झाडे…

Read More

नक्षत्राचं देणं काव्यमंचचे २५ रौप्य महोत्सवी वर्ष महाकाव्यसंमेलनाने संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – नक्षत्रचं देणं काव्यमंच,मुख्यालय ,भोसरीच्यावतीने नुकतेच ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५’ अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे साजरे झाले. या महाकाव्यसंमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवी कवत्रिंनी आपली उपस्थिती दाखवून, हे महाकाव्यसंमेलन यशस्वी केले. संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षे असल्याने या आठव्या महाकाव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसाच्या या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ बोल्ड कवी म.भा. चव्हाण पुणे हे उपस्थित होते. तसेच या महाकाव्यसंमेलन च्या व्यासपीठावरून शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव, प्रा. तुकाराम पाटील, श्रीकांत चौगुले, डॉ.शांताराम कारंडे, डॉ. अलका नाईक, सुखदेव तात्या…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व मुद्देसूद चर्चा झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रातील बाबींवर चर्चा करताना दिशाभूल करणारी विधाने करण्याऐवजी वस्तुनिष्ठतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने संवाद साधणे अपेक्षित आहे.” डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्यास निवडणूक खर्चात बचत होईल आणि आचारसंहितेमुळे थांबणारी विकासकामे सुरळीत पार पाडता येतील. या दृष्टीने समितीमध्ये सकारात्मक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-  लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न,  चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या टर्ममध्ये ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील दोन टर्ममध्ये आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने बारणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सभोवतालच्या छोट्या – छोट्या गोष्टीत आनंद आहे; पण तो शोधायची दृष्टी पाहिजे. तसेच आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ असे प्रतिपादन प्रा. डाॅ. संजय कळमकर यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाच्या वाटा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना संजय कळमकर बोलत होते. सर्जेराव भोसले अध्यक्षस्थानी होते; तसेच समन्वयक राजेंद्र घावटे, शैलेश मोरे, श्रीकांत करवले, सोपान खेडकर, विजय महल्ले, राजू वसुले, संजय काकड, सतीश भेंडे, सुनील कदम, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक कुटुंबदिनाचे औचित्य साधून कर्मयोगिनी महिला संस्था – पिंपरी चिंचवड आणि आर्य समाज मंदिर, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘घर असावे घरासारखे…’ या विशेष कविसंमेलनाला कवी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आर्य समाज मंदिर सभागृह, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे अध्यक्षपद कवयित्री सुनीती लिमये यांनी भूषविले; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, सामाजिक कार्यकर्त्या मीना पोखरणा, कर्मयोगिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा सीमा गांधी, आर्य समाज मंदिर ग्रंथालय सचिव दिनेश यादव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. गणेश आणि शारदास्तवन तसेच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आदर्श मुख्याध्यापक स्वर्गीय नटराज जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त लोकजागर ॲक्टिव्हिटिज (lokraj activitz) या चळवळीच्या माध्यमातून व खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाचे माजी विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते बालाजी मोरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय नटराज जगताप(natraj jagtap) विद्यार्थी विकास केंद्र स्थापन केले असून त्या अंतर्गत वीरपत्नी दुर्गाबाई चापेकर संस्कारवर्ग आणि अभ्यासिकेचे उद्घाटन शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी वेताळनगर, चिंचवडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य प्रकाश मीठभाकरे यांच्या हस्ते व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, जेजुरी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अनिल सौंदडे, प्रा. डॉ. हेमंत देवकुळे, केंद्र शाखाप्रमुख राजेश…

Read More