Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मंगळवार श्रीक्षेत्र ओतुर, ता. जुन्नर, जि., पुणे येथे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह ३७५ वा वैकुंठगमन सांगता सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयोजक समस्त जुन्नर, आंबेगाव, शिरुर, पारनेर, संगमनेर, अकोले, खेड, पुणेकर व मुंबईकर मंडळी आशीर्वाद श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू , श्री भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट, मावळ या सोहळ्यात उपस्थित राहण्याचा योग लाभला आयोजकांकडून माझा आणि माऊली भक्त ह . भ . प मा . अध्यक्ष मारुती माऊली कोकाटे संत्त ज्ञानेश्वर माऊली पंढरपूर वारी सोहळा यांचाही तसेच तुकोबारायांचे वणवश ह .…

Read More

कृपया प्रसिद्धीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत थेरगाव येथील महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या १०० बेडेड मल्टी- डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट मल्टी स्पेशालिसटी कॅन्सर रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागीदारी (पी.पी.पी.) तत्वावर सुरु करणे बाबत , क्रांतीवीर चापेकर स्मारक लोकार्पण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघ राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता – भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे. भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी आज क्रांतिवीर चापेकर बंधू चौक ते महासाधू मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर अशी चिंचवडगाव परिसरात तिरंगा रॅलीचे ‘राष्ट्रप्रेमी चिंचवडकर’ नागरिकांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या रैलीला चिंचवडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीत चिंचवडगावातील स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे व माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, सामाजिक कार्यकर्ते हर्षद नढे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना अभिवादन करण्यासाठी काल (दि. २१ मे) रोजी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात गोकुळ हॉटेल ते पिंपरी चौक येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, सेना हमारी शान है किसान हमारी जान है, अशा घोषणा देऊन सैनिकांच्या शौर्याचं स्मरण करत यात्रेचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी चौक येथे करण्यात आला. पहेलगाम येथे निष्पाप भारतीयांना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळ्या चालवून मारण्यात आले. यासाठी भारत सरकारने भारतीय सैन्याच्या परक्रमाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा  ( Pre-monsoon preparedness review meeting ) बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहर व परिसरात २० व २१ मे याकाळात झालेल्या पावसामुळे ६६ ठिकाणी झाडे पडल्याची ( Trees fell in 66 places due to rain ) घटना घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी व अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ ही झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. शहरामध्ये मंगळवारी (२० मे) व बुधवारी (२१ मे) जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहर परिसरातील वेगवेगळ्या भागांत झाडे, फांद्या कोसळल्या. झाडे, फांद्या कोसळल्याची माहिती महानगरपालिकेचा उद्यान विभाग तसेच अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर उद्यान विभागातील कर्मचारी व शहरातील वेगवेगळ्या भागातील अग्निशमन केंद्रातील…

Read More

वडीवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे बंदिस्तीकरण तसेच आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. वडीवळे धरणाच्या कालव्यांद्वारे सुमारे ४४०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र या उघड्या कालव्यांतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकीस सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे कालव्यांचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती. यामुळे पाणीटंचाईवर मात करत सिंचनक्षेत्रात…

Read More

तळेगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्पाबाबत आता शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरूवात होणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिलेले सहकार्य आणि पाठबळ खरोखरच महत्त्वाचे ठरले. तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील रस्ते विकासाला गती मिळणार आहे.” या प्रकल्पांतर्गत…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात औद्योगिक किंवा MIDC च्या जागा शिल्लक नसल्याने याच औद्योगिक परिसरातील उद्योजक हे चाकण औद्योगिक परिसर जवळ असल्याने याच औद्योगिक परिसरात उद्योगाचे नवीन जागेत विस्तारीकरण करत आहेत. तसेच नवीन आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या संख्येत वाढ होत आहे. या परिसरात उद्योगांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम हा महावितरणवर वीज पुरवठा करण्याकरिता अधिक भार पडत आहे. त्यांच्याकडून सुरळीत वीज पुरवठा केला जाऊ शकत नाही. कारण या चालू मे महिन्यात चाकण औद्योगिक परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. दि 19 व 20 मे 2025 या दोन दिवसांत महावितरण कडून पूर्णवेळ म्हणजे 48 तास…

Read More